
यूएईमध्ये 9 ते 28 सप्टेंबर दरम्यान एकूण 8 संघात आशिया कप स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. गतविजेता टीम इंडिया यंदाही आशिया कप जिंकणार, असा ठाम विश्वास क्रिकेट चाहत्यांन आहे. या आशिया कप स्पर्धेतील सहाव्या सामन्यात 14 सप्टेंबरला भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याची लगबग सुरु आहे. पहलगाम हल्ल्यानंतरही हा सामना होतोय. त्यामुळे भारतीयांचा या सामन्याला तीव्र विरोध आहे. या दरम्यान बीसीसीआयने मोठी घोषणा केली आहे.
बीसीसीआयने ऑस्ट्रेलिया ए विरुद्धच्या 3 एकदिवसीय मालिकेसाठी इंडिया ए टीमची घोषणा केली आहे. बीसीसीआयने सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती दिली आहे. इंडिया ए विरुद्ध ऑस्ट्रेलिया ए यांच्यात एकूण 3 एकदिवसीय सामने खेळवण्यात येणार आहेत. या मालिकेचं आयोजन हे 30 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर दरम्यान करण्यात आलं आहे. या 3 सामन्यांच्या मालिकेत इंडिया ए चं 2 खेळाडूं नेतृत्व करणार आहेत.
ऑस्ट्रेलिया ए विरुद्धच्या पहिल्या सामन्यात रजत पाटीदार भारताचं नेतृत्व करणार आहे. तर शेवटच्या 2 सामन्ंयात तिलक वर्मा भारत अ संघाच्या कर्णधारपदाची धुरा सांभाळणार आहे. या मालिकेतील तिन्ही सामने कानपूरमध्ये होणार आहेत. त्यामुळे दोन्ही संघांचा प्रवासाचा वेळ वाचणार आहेत. तसेच या तिन्ही सामन्यांना दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे.
पहिला सामना, 30 सप्टेंबर, कानपूर दुपारी दीड वाजता
दुसरा सामना, 3 ऑक्टोबर, कानपूर दुपारी दीड वाजता
तिसरा सामना, 5 ऑक्टोबर, कानपूर दुपारी दीड वाजता.
वनडे सीरिजसाठी इंडिया ए टीमची घोषणा
🚨 𝗡𝗘𝗪𝗦 🚨
India A squad for one-day series against Australia A announced.
All The Details 🔽https://t.co/V8QokLO6zr
— BCCI (@BCCI) September 14, 2025
पहिल्या एकदिवसीय सामन्यासाठी इंडिया ए टीम : रजत पाटीदार (कॅप्टन), प्रभसिमरन सिंग (विकेटकीपर), रियान पराग, आयुष बडोनी, सूर्यांश शेडगे, विपराज निगम, निशांत सिंधू, गुरजपनीत सिंग, युधवीर सिंग, रवी बिश्नोई, अभिषेक पोरेल (विकेटकीपर), प्रियांश आर्य आणि सिमरजीत सिंग.
दुसऱ्या आणि तिसऱ्या वनडेसाठी इंडिया ए टीम : तिलक वर्मा (कर्णधार), रजत पाटीदार (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, प्रभसिमरन सिंग (विकेटकीपर), रियान पराग, आयुष बदोनी, सूर्यांश शेडगे, विपराज निगम, निशांत सिंधू, गुर्जपनीत सिंग, युधवीर सिंग, रवी बिश्नोई, अभिषेक पोरेल (विकेटकीपर), हर्षित राणा आणि अर्शदीप सिंग.