Team India : बीसीसीआयकडून वार्षिक करार जाहीर, विराट-रोहितला मोठा झटका

भारत आणि श्रीलंकेत सध्या आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2026 स्पर्धेचा थरार सुरु आहे. या स्पर्धेत एकूण 20 संघामध्ये चुरस सुरु असताना भारतीय क्रिकेट वर्तुळीतून मोठी बातमी समोर आली आहे. बीसीसीआयने टीम इंडियाच्या वार्षिक कराराची घोषणा केली आहे. क्रिकेट चाहत्यांंमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून वार्षिक कराराची चर्चा पाहायला मिळत होती. मात्रा आता बीसीसीआयने करार जाहीर केल्याने चाहत्यांची प्रतिक्षा अखेर संपली आहे.

Team India : बीसीसीआयकडून वार्षिक करार जाहीर, विराट-रोहितला मोठा झटका
Team India : बीसीसीआयकडून वार्षिक करार जाहीर, विराट-रोहितला मोठा झटका
Image Credit source: PTI
| Updated on: Feb 09, 2026 | 9:10 PM

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धा सुरू असताना बीसीसीआयने वार्षिक कराराची घोषणा केली आहे. यात 30 खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. बीसीसीआयने ग्रेड ए मध्ये 3 खेळाडूंचा समावेश केला आहे. बी ग्रेडमध्ये 11 खेळाडूंना स्थान दिलंय. तर सी ग्रेडमध्ये सर्वाधिक 16 खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. पण माजी कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना धक्का दिला आहे. त्यांची ग्रेड ए मधून गच्छंती केली आहे. गेल्या काही दिवसांपासून सूत्रांच्या माध्यमातून ही माहिती समोर आली होती. अखेर त्यावर बीसीसीआयने शिक्क्कामोर्तब केलं आहे. ग्रेड ए मध्ये फक्त 3 खेळाडूंना स्थान मिळालं आहे. यात टीम इंडियाचा कसोटी आणि वनडे कर्णधार शुबमन गिल, जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा यांचं नाव आहे.

ग्रेड बी मध्ये कोणते खेळाडू?

ग्रेड बी मध्ये वॉशिंग्टन सुंदर, रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल, मोहम्मद सिराज, हार्दिक पांड्या, ऋषभ पंत, कुलदीप यादव, यशस्वी जयस्वाल, सूर्यकुमार यादव आणि श्रेयस अय्यरचा समावेश आहे.

ग्रेड सी मध्ये कोणते खेळाडू?

ग्रेड सी मध्ये अक्षर पटेल, तिलक वर्मा, रिंकु सिंह, शिवम दुबे, संजू सॅमसन, अर्शदीप सिंह, प्रसिद्ध कृष्णा, आकाश दीप, ध्रुव जुरेल, हर्षित राणा, वरूण चक्रवर्ती, नितीश कुमार रेड्डी, अभिषेक शर्मा, साई सुदर्शन, रवि बिष्णोई आणि ऋतुराज गायकवाड यांचा समावेश आहे.

बीसीसीआयकडून कामगिरीच्या आधारे खेळाडूंना ए, बी, सी आणि डी अशा 4 ग्रेडमध्ये विभागलं जातं. या ग्रेडनुसारच कोणत्या खेळाडूंना वार्षिक किती रक्कम मिळणार हे निश्चित होतं. नियमांनुसार ए प्लस ग्रेडमधील खेळाडूंना 7, ए मधील क्रिकेटपटूंना 5, बीमधील 3 तर ए मधील खेळाडूंना 1 कोटी रुपये मिळतात.

महिला क्रिकेटपटूंचा वार्षिक करार जाहीर

महिला क्रिकेटपटूंचा वार्षिक करार जाहीर करण्यात आला आहे. ए ग्रेडमध्ये हरमनप्रीत कौर, स्मृती मंधाना, जेमिमा रॉड्रिग्स आणि दीप्ती शर्मा यांचा समावेश आहे. तर बी ग्रेडमध्ये रेणुका ठाकुर, शफाली वर्मा, ऋचा घोष आणि स्नेह राणा यांचा समावेस आहे. सी ग्रेडमध्ये राधा यादव, अमनजोत कौर, प्रतिका रावल, क्रांती गौड, उमा छेत्री, अरुंधती रेड्डी, श्री चरणी, यास्तिका भाटिया, हरलीन देओल, कशवी गौतम, जी कमालिनी, वैष्णवी शर्मा आणि तेजल हसबनीस यांना समाविष्ट केलं आहे.