
भारतात सध्या आयपीएलच्या 17 व्या मोसमाचा थरार सुरु आहे. सर्व क्रिकेट चाहते आपल्या आवडत्या संघाला सपोर्ट करत आहेत. दररोज एकसेएक रंगतदार सामने होत आहेत. अशात भारतीय क्रिकेट वर्तुळातून एक मोठी अपडेट समोर आली आहे. आगामी टी 20 मालिकेसाठी बीसीसीआयने भारतीय संघांची घोषणा केली आहे. बीसीसीआयने सोशल मीडियावरुन पोस्ट करत याबाबतची माहिती दिली आहे. या मालिकेबाबत आणि टीममध्ये कोण कोण आहे, हे आपण जाणून घेऊयात.
बीसीसीआयने बांगलादेश विरुद्ध टी 20 मालिकेसाठी वूमन्स टीम इंडियाची घोषणा केलीय. बीसीसीआयने 16 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. वूमन्स क्रिकेट टीम इंडिया बांगलादेश दौऱ्यावर जाणार आहे. उभयसंघात एकूण 5 सामन्यांची ही मालिका असणार आहे. या मालिकेला 28 एप्रिपलपासून सुरुवात होणार आहे.तर अंतिम सामना 9 मे रोजी पार पडणार आहे. हरमनप्रीत कौर बांगलादेश विरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे.
बीसीसीआय निवड समितीने बांगलादेश दौऱ्यासाठी टीम इंडियात 2 नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. लेग-स्पिनर आशा शोभना आणि ऑलराउंडर सजीवन सजना यांची पहिल्यांदाच निवड करण्यात आली आहे. आरसीबीच्या शोभनाने नुकत्याच पार पडलेल्या वूमन्स प्रीमियर लीग अर्थात डब्ल्यूपीएल 2024 मध्ये यूपी वॉरियर्सविरुद्ध 5 विकेट्स घेत तिने आपली छाप सोडली होती.
टीम इंडियाची घोषणा
India have announced their squad for the five-match T20I series against Bangladesh later this month 🗓
Details 👇https://t.co/BpRlXO6qL7
— ICC (@ICC) April 15, 2024
पहिला सामना, 28 एप्रिल, रविवार.
दुसरा सामना, 30 एप्रिल, मंगळवार.
तिसरा सामना, 2 मे, गुरुवार .
चौथा सामना, 6 मे, सोमवार.
पाचवा सामना, 9 मे, गुरुवार.
वूमन्स टीम इंडिया : हरमनप्रीत कौर (कॅप्टन), स्मृती मंधानाा, शफाली वर्मा, दयालन हेमलता, सजना सजीवन, रिचा घोष (विकेटकीपर), यस्तिका भाटिया (विकेटकीपर), राधा यादव, दीप्ती शर्मा, पूजा वस्त्राकर, अमनजोत कौर, श्रेयंका पाटील, सायका इशाक, आशा शोभना , रेणुका सिंग ठाकुर आणि तीतस साधू.