IND vs SA: दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा! तिन्ही फॉर्मेटमध्ये एकच कर्णधार, ‘या’ दोन हुकमी खेळाडूंचं धडाकेबाज पुनरागमन
Team India Announced for South Africa Tour: बीसीसीआयने दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरील तिन्ही फॉरमॅटच्या मालिकांसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. भारतीय महिला क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा 9 डिसेंबरपासून सुरू होईल.

दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या एक कसोटी, तीन एकदिवसीय आणि तीन टी-20 सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. स्मृती मंधानाच्या नेतृत्वाखाली बीसीसीआयने एक मजबूत संघ निवडला आहे. महत्त्वाचे म्हणजे जेमिमा रॉड्रिग्जने तिन्ही फॉरमॅटसाठी संघात पुनरागमन केले आहे. दुखापतीमुळे जेमिमा भारतीय संघातून बाहेर होती. टी-२० संघात समावेश झाल्यामुळे अमनजोत कौरनेही संघात पुनरागमन केले आहे.
भारतीय आणि दक्षिण आफ्रिकी महिला संघांमधील एकमेव कसोटी सामना 9 डिसेंबर रोजी सुरू होईल. त्यानंतर 16 डिसेंबर रोजी पहिला एकदिवसीय सामना, 19 डिसेंबर रोजी दुसरा एकदिवसीय सामना आणि 22 डिसेंबर रोजी तिसरा एकदिवसीय सामना खेळला जाईल. त्यानंतर 26 डिसेंबर रोजी पहिला टी-20 सामना, 29 डिसेंबर रोजी दुसरा टी-20 सामना आणि 30 डिसेंबर रोजी तिसरा आणि अंतिम टी-20 सामना खेळला जाईल.
दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय संघ
टेस्ट संघ-
स्मृति मंधाना (कर्णधार), शेफाली वर्मा, प्रतीका रावल, हरमनप्रीत कौर, जेमिमाह रोड्रिग्स, हरलीन देओल, रिचा घोष (विकेटकीपर), यस्तिका भाटिया (विकेटकीपर), दीप्ति शर्मा (उपकर्णधार), श्री चरणी, स्नेह राना, क्रांति गौड़, नंदनी शर्मा, जिंतिमणि कलिता, सायली सातघरे
वनडे संघ-
स्मृति मंधाना (कर्णधार), शेफाली वर्मा, प्रतीका रावल, हरमनप्रीत कौर, जेमिमाह रोड्रिग्स, हरलीन देओल, रिचा घोष (विकेटकीपर), यस्तिका भाटिया (विकेटकीपर), दीप्ति शर्मा (उपकर्णधार), श्री चरणी, वैष्णवी शर्मा, क्रांति गौड़, नंदनी शर्मा, जिंतिमणि कलिता, सायली सातघरे
टी20 संघ-
स्मृति मंधाना (कर्णधार), शेफाली वर्मा (उपकर्णधार), जेमिमाह रोड्रिग्स, हरमनप्रीत कौर, निकी प्रसाद, रिचा घोष (विकेटकीपर), जी. कमलिनी (विकेटकीपर), अनुष्का शर्मा, दीप्ति शर्मा, श्री चरणी, प्रेमा रावत, अमनजोत कौर, क्रांति गौड़, नंदनी शर्मा, रेणुका सिंह ठाकुर, अरुंधति रेड्डी, सायली सातघरे
दक्षिण आफ्रिकेत भारतीय संघाची कामगिरी चांगली आहे. भारतीय संघाने शेवटची एकदिवसीय मालिका 2018 मध्ये दक्षिण आफ्रिकेत खेळली होती, ज्यात त्यांनी 2-1 ने विजय मिळवला होता. दक्षिण आफ्रिकेत भारतीय संघाने 11 पैकी सहा सामने जिंकले आहेत, चार गमावले आहेत आणि एक सामना अनिर्णित राहिला आहे. टी-20 मालिकेत भारतीय संघाला निश्चितच मोठा पराभव पत्करावा लागला होता, ज्यात ते 1-4 ने मालिका हरले.
यावेळी त्या पराभवाचा बदला घेणे हे एक मोठे ध्येय असेल. भारतीय संघ 2002 नंतर प्रथमच दक्षिण आफ्रिकेत कसोटी सामना खेळणार आहे. भारतीय महिला संघाचा दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवरील हा केवळ दुसरा कसोटी सामना असेल. 2002 मध्ये दोन्ही संघांमध्ये पार्ल येथे कसोटी सामना झाला होता, ज्यात भारताने 10 गडी राखून विजय मिळवला होता.