आयपीएलचा थरार प्रेक्षकांना थेट मैदानातून अनुभवता येणार का?, बीसीसीआयची महत्त्वाची माहिती

| Updated on: Aug 18, 2021 | 12:55 PM

कोरोनाचा शिरकाव झाल्यामुळे मागील वर्षी मध्येच थांबवण्यात आलेली आय़पीएल आता भारताऐवजी युएईत पार पडणार आहे. बीसीसीआयने काही दिवसांपूर्वी याबद्दलची माहिती दिली होती.

आयपीएलचा थरार प्रेक्षकांना थेट मैदानातून अनुभवता येणार का?, बीसीसीआयची महत्त्वाची माहिती
आयपीएल 2021
Follow us on

मुंबई : आयपीएल 2021 (IPL 2021) कोरोनाच्या शिरकाव झाल्याने मध्येच थांबवण्यात आली. आता उर्वरीत स्पर्धा युएईमध्ये 19 सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. या स्पर्धे संबधी एक महत्त्वाची माहिती भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) दिली आहे. सामन्यांदरम्यान प्रेक्षकांना सामना पाहण्यासाठी मैदानात परवानगी मिळणार का? याबाबतची माहिती बीसीआयने दिली आहे.

बोर्डाचे कोषाध्यक्ष अरुण कुमार धूमळ यांनी आयएएनस या वृत्तसंस्थेशी बोलताना माहिती दिली की, “आम्ही या मुद्यावर सध्या चर्चा करत आहोत. आम्हाला आशा आहे की, यूएई सरकार प्रेक्षकांच्या उपस्थितीला परवानगी देईल. कारण त्याठिकाणी सर्वांचे लसीकरण झाले आहे. त्यामुळे आता नेमका युएई सरकार काय निर्णय देईल हे पाहावे लागेल. पण खेळाडूंची सुरक्षा सर्वात महत्त्वाची असल्याने त्याच्याशी कोणतीच तडजोड केली जाणार नाही.”

सहा दिवसांच कडक विलगीकरण

आयपीएलसाठी युएईत येणाऱ्या खेळांडूसह सपोर्ट स्टाफ अशा सर्वांना सहा दिवसांचा विलगीकरण कालावधी पूर्ण करावा लागणार आहे. तसेच बायो बबलमध्ये येण्यापूर्वी त्यांच्या तीन कोरोना चाचण्या होणे आणि त्या तीनही निगेटिव्ह येणे अनिवार्य आहे. इंग्लंडमधील भारतीय खेळाडूंना विलगीकरणाचे नियम पाळावे लागणार नसले तरी त्यांना बायो बबलचे नियम मात्र पाळावे लागणार आहेत.

उर्वरीत आयपीएल 2021 चे संपूर्ण वेळापत्रक

19 सप्टेंबर – मुंबई इंडियन्स VS चेन्नई सुपर किंग्स, संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून – दुबई
20 सप्टेंबर – कोलकाता नाइट रायडर्स VS रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून – अबू धाबी
21 सप्टेंबर – पंजाब किंग्स VS राजस्थान रॉयल्स, संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून – दुबई
22 सप्टेंबर – दिल्ली कॅपिटल्स VS सनरायझर्स हैदराबाद, संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून – दुबई
23 सप्टेंबर – मुंबई इंडियन्स VS कोलकाता नाइट रायडर्स, संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून – अबू धाबी
24 सप्टेंबर – रॉयल चँलेंजर्स बंगळुरू VS चेन्नई सुपर किंग्स, संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून – शाहजाह
25 सप्टेंबर – दिल्ली कॅपिटल्स VS राजस्थान रॉयल्स, दुपारी 3.30 वाजल्यापासून – अबू धाबी
25 सप्टेंबर – सनयारझर्स हैदराबाद VS पंजाब किंग्स, संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून – शाहजाह
26 सप्टेंबर – चेन्नई सुपर किंग्स VS कोलकाता नाईट रायडर्स, दुपारी 3.30 वाजल्यापासून – अबू धाबी
26 सप्टेंबर – पंजाब किंग्स VS मुंबई इंडियन्स, संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून – दुबई
27 सप्टेंबर- सनरायझर्स हैदराबाद VS राजस्थान रॉयल्स, संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून – दुबई
28 सप्टेंबर – कोलकाता नाइट रायडर्स VS दिल्ली कॅपिटल्स, दुपारी 3.30 वाजल्यापासून – शारजाह
28 सप्टेंबर – मुंबई इंडियन्स VS पंजाब किंग्स, संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून – अबू धाबी
29 सप्टेंबर – राजस्थान रॉयल्स VS रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून – दुबई
30 सप्टेंबर – सनरायझर्स हैदराबाद VS चेन्नई सुपर किंग्स, संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून – शारजाह
1 ऑक्टोबर – कोलकाता नाइट रायडर्स VS पंजाब किंग्स, संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून – दुबई
2 ऑक्टोबर – मुंबई इंडियन्स VS दिल्ली कॅपिटल्स, दुपारी 3.30 वाजल्यापासून – शारजाह
2 ऑक्टोबर – राजस्थान रॉयल्स VS चेन्नई सुपर किंग्स, संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून – अबू धाबी
3 ऑक्टोबर – पंजाब किंग्स VS रॉयल चँलेंजर्स बंगळुरू, दुपारी 3.30 वाजल्यापासून – शारजाह
3 ऑक्टोबर – कोलकाता नाइट रायडर्स VS सनरायझर्स हैदराबाद, संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून – दुबई
4 ऑक्टोबर – दिल्ली कॅपिटल्स VS चेन्नई सुपर किंग्स, संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून – दुबई
5 ऑक्टोबर – मुंबई इंडियन्स VS राजस्थान रॉयल्स, संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून – शारजाह
6 ऑक्टोबर – रॉयल चँलेंजर्स बंगळुरू VS सनरायझर्स हैदराबाद, संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून – अबू धाबी
7 ऑक्टोबर – चेन्नई सुपर किंग्स VS पंजाब किंग्स, दुपारी 3.30 वाजल्यापासून – दुबई
7 ऑक्टोबर – कोलकाता नाइट रायडर्स VS राजस्थान रॉयल्स, संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून – शारजाह
8 ऑक्टोबर – सनरायझर्स हैदराबाद VS मुंबई इंडियन्स, दुपारी 3.30 वाजल्यापासून – अबू धाबी
8 ऑक्टोबर – रॉयल चँलेंजर्स बंगळुरू VS दिल्ली कॅपिटल्स, संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून – दुबई
10 ऑक्टोबर – क्वालिफायर, संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून – दुबई
11 ऑक्टोबर – एलिमिनेटर, संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून – शारजाह
13 ऑक्टोबर – क्वालिफायर 2, संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून – शारजाह
15 ऑक्टोबर- अंतिम सामना, संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून – दुबई

इतर बातम्या

IPL 2021: राशिद खान आणि मोहम्मद नबी यांच्या आयपीएलमध्ये खेळण्याबाबत महत्त्वाची माहिती समोर, हैद्राबाद संघाच्या CEO ने दिली माहिती

IPL 2021: यूएईत 19 सप्टेंबरपासून घमासान, पहिल्या सामन्यात मुंबई VS चेन्नई भिडणार, पाहा संपूर्ण टाईमटेबल एका क्लिकवर

(BCCI hopes that UAE government will allow crowds for IPL 2021)