AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs ENG: ‘हा’ धुरंदर भारतीय फलंदाज दोन वर्षानंतर भारतीय संघात, इंग्लंड विरुद्ध कसोटीसाठी सज्ज, अशी असू शकते विराट सेना

भारत आणि इंग्लंड यांच्यात 4 ऑगस्टपासून पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होणार आहे. भारतीय संघ सध्या कोणत्या खेळाडूंना पहिल्या कसोटीसाठी खेळवायचं ही रणनीती आखण्यात व्यस्त आहे.

IND vs ENG: 'हा' धुरंदर भारतीय फलंदाज दोन वर्षानंतर भारतीय संघात, इंग्लंड विरुद्ध कसोटीसाठी सज्ज, अशी असू शकते विराट सेना
के एल राहुल
| Edited By: | Updated on: Aug 04, 2021 | 6:31 PM
Share

लंडन : भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरु होणाऱ्या कसोटी मालिकेपूर्वी दोन्ही संघाकडून पहिल्या टेस्टसाठी मैदानात उतरणारे अंतिम 11 खेळाडू कोण असतील? या चर्चेला चांगलेच उधाण आले आहे. भारतीय संघातील खेळाडू सतत दुखापतग्रस्त होत असल्याने संघ प्रशासनाला अंतिम 11 खेळाडू निवडणे कठीण झाले आहे. नुकताच संघाचा सलामीवीर मयांक अगरवाल (Mayank Agarwal) दुखापतग्रस्त झाल्याने भारतीय संघाला नवा सलामीवीरा लागणार आहे. यासाठीच भारताकडून दोन वर्षापूर्वी अखेरचा कसोटी सामना खेळलेल्या केएल राहुलचे (KL Rahul) नाव जवळपास निश्चित झाले आहे. रोहित शर्मासोबत सलामीवीर म्हणून राहुलला पाठवण्यात येऊ शकते.

केएल राहुलने नुकतीच काउंटी 11 संघासोबत झालेल्या तीन दिवसीय सराव सामन्यातही शतक ठोकले होते. राहुल शिवाय हनुमा विहारीला देखील सलामीला पाठवले जाऊ शकते. तर पृथ्वी शॉ अजूनही इंग्लंडला पोहोचला नसल्याने त्याचा सध्या विचार केला जात नाही. केएल राहुल आणि रोहित शर्मा हे आधीही एकत्र सलामीला उतरले आहे. राहुलने 2019 मध्ये वेस्टइंडीज विरुद्ध शेवटचा कसोटी सामना खेळला होता.

चार वेगवान गोलंदाजासह खेळू शकते टीम इंडिया

इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये भारतीय संघ दोन फिरकीपटूंची रणनीती बदलू शकतो. या रणनीतीने न्यूझीलंड विरुद्धच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये भारतीय संघाला पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे यावेळी भारतीय संघ चार वेगवान गोलंदाज खेळवू शकतो. तसेच पहिला सामना असलेल्या ट्रेंट ब्रिजच्या मैदानाही सध्या वेगवान गोलंदाजीसाठी उत्तम असल्याने भारतीय संघ मोहम्मद सिराजला संघात संधी देऊ शकतो. त्याशिवाय जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा आणि मोहम्मद शमी असणारच आहेत. तर फिरकीपटू म्हणून आर आश्विनला संधी देण्यात येईल.

इंग्लंड विरुद्ध पहिल्या टेस्टसाठी संभाव्य भारतीय संघ

केएल राहुल, रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), आर अश्विन, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, इशांत शर्मा, जसप्रीत बुमराह.

इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेचे वेळापत्रक

पहिली कसोटी, 4 ते 8 ऑगस्ट

दुसरी कसोटी, 12 ते 16 ऑगस्ट

तिसरी कसोटी, 25 ते 29 ऑगस्ट

चौथी कसोटी, 2 ते 6 सप्टेंबर

पाचवी कसोटी, 10 ते 14 सप्टेंबर.

हे ही वाचा 

IND vs ENG : सलामीवीर मयांक पहिल्या सामन्याला मुकणार, ‘या’ पर्यांयाचा वापर करु शकते टीम इंडिया

IND vs ENG : भारताविरुद्ध मालिकेसाठी इंग्लंडचा संघ जाहीर, चार दिग्गज खेळाडूंचे पुनरागमन

IND vs ENG : भारताचा नवखा गोलंदाज, 74 धावा देत 7 विकेट, 24 वर्षांनंतर लॉर्ड्सवर विजय

(In India vs England First Test mohammed siraj and kl rahul may Play in final 11)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.