PHOTO : क्रिकेटच्या पंढरीत पोहचली टीम इंडिया, दुसऱ्या कसोटीच्या सरावासाठी खेळाडू मैदानात

| Updated on: Aug 11, 2021 | 2:34 PM

भारत आणि इंग्लंड यांच्यात दुसरा कसोटी सामना 12 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. प्रसिद्ध आणि ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानात हा सामना खेळवला जाणार आहे.

1 / 5
भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यातील पहिला कसोटी सामना अनिर्णीत सुटल्यानंतर आता दुसरा सामना गुरुवारपासून (12 ऑगस्ट)  लॉर्ड्स मैदानावर सुरु होणार आहे. पण या मैदानावर भारतीय फलंदाजाचे रेकॉर्ड खास नसल्याने भारतीय संघावर तणाव आहे. त्यामुळे सर्व खेळाडू कसून सराव करत आहेत. बीसीसीआयने खेळाडूंचे फोटो ट्विटरवरुन शेअर केले आहेत.

2 / 5
सामन्यात सर्वांचे सर्वाधिक लक्ष असणार आहे ते भारताचा कर्णधार विराट कोहलीवर (Virat Kohli). सचिन, गावस्कर या दिग्गजांनी अनेक रेकॉर्ड आपल्या नावावर केले पण दोघेही कधीच लॉर्ड्स (Lord’s Test) मैदानात शतक ठोकू शकले नाही. सध्या जगातील आणि भारतातील अव्वल क्रमाकांचा फलंदाज असणाऱ्या विराट कोहलीने देखील लॉर्ड्सवर एकही शतक ठोकलेले नाही. दरम्यान आता इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात विराटला लॉर्ड्सवर शतक ठोकण्याची संधी चालून आली आहे. कोहलीने लॉर्ड्सवर आतापर्यंत चार डावांत केवळ 65 धावा केल्या आहेत. ज्यात 25 हा त्याचा सर्वोच्च स्कोर आहे.

3 / 5
विराटनंतर भारताचे इतर फलंदाजही लॉर्ड्सवर आतापर्यंत खास कामगिरी करु शकलेले नाहीत. यात सर्वात विश्वासू फलंदाज असणाऱ्या चेतेश्वर पुजाराही संध्या खास फॉर्ममध्ये नसून मागील 32 डावात एकही शतक ठोकू शकलेला नाही. त्याने लॉर्ड्सवरील दोन सामन्यांतील चार डावात केवळ 89 धावा केल्या आहेत.

4 / 5
पहिल्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात उत्कृष्ट 84 धावा ठोकणाऱ्या केएल राहुलकडूनही संघाला दुसऱ्या सामन्यात बऱ्याच आशा असतील. त्याने आतापर्यंत लॉर्ड्सवर एक सामना खेळला असून दोन डावात केवळ 18 धावा बनवल्या आहेत.

5 / 5
पहिल्या कसोटी सामन्यात भारताकडू अफलातून गोलंदाजी करत दोन्ही डावांत मिळून तब्बल 9 विकेट पटकावणाऱ्या बुमराहची जादू लॉर्ड्सवरही पाहायला मिळावी अशी सर्वांची इच्छा आहे. बुमराहने देखील सरावाला सुरुवात केली असून बीसीसआयने त्याचा फोटो आवर्जून शेअर केला आहे.