Cricket : 7 सामने-2 मालिका, ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी Bcci कडून टीमची घोषणा, कॅप्टन कोण?

Squad for India A Womens Tour of Australia 2025 : बीसीसीआय निवड समितीने आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्याठी वूमन्स इंडिया ए टीमची घोषणा केली आहे. पाहा कुणाला मिळाली संधी?

Cricket : 7 सामने-2 मालिका, ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी Bcci कडून टीमची घोषणा, कॅप्टन कोण?
Bcci
Image Credit source: PTI
| Updated on: Jul 10, 2025 | 6:33 PM

वूमन्स, मेन्स आणि अंडर 19 टीम इंडिया एकाच वेळेस इंग्लंड दौऱ्यावर आहेत. मेन्स टीम इंडिया इंग्लंड विरुद्ध 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. अंडर 19 टीम इंडियाने 5 सामन्यांची एकदिवसीय मालिका 3-2 अशा फरकाने जिंकली. तर दुसऱ्या बाजूला वूमन्स टीम इंडियाने 10 जुलैला चौथ्या टी 20I सामन्यात इंग्लंडचा धुव्वा उडवत मालिका आपल्या नावावर केली. वूमन्स इंडियाने चौथा सामना जिंकून मालिकेत 3-1 अशी आघाडी घेतली आहे. या चौथ्या सामन्यात 2 विकेट्स घेऊन मॅन ऑफ द मॅच ठरलेल्या राधा यादव हीला आनंदाची बातमी मिळाली आहे. राधा यादव हीला ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

बीसीसीआय निवड समितीने 10 जुलैला ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी वूमन्स इंडिया ए टीम जाहीर केली आहे. वूमन्स इंडिया ए टीम या दौऱ्यात ऑस्ट्रेलिया ए विरुद्ध भिडणार आहे. उभयसंघात टी 20I आणि एकदिवसीय मालिका खेळवण्यात येणार आहे. या दोन्ही मालिकेत प्रत्येकी 3-3 सामने होणार आहेत. त्यानंतर 4 दिवसांच्या सामन्याने या दौऱ्याची सांगता होणार आहे. राधा यादव या दौऱ्यात नेतृत्वाच्या भूमिकेत असणार आहे. तर मिन्नू मणी हीला उपकर्णधार करण्यात आलं आहे.

ऑस्ट्रेलिया दौरा

इंडिया वूमन्स टीमच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याची सुरुवात टी 20 मालिकेने होणार आहे. 3 सामन्यांच्या टी 20i मालिकेचा थरार 7 ते 10 ऑगस्ट दरम्यान रंगणार आहे. तिन्ही सामने एकाच मैदानात होणार आहेत.

त्यानंतर 13 ते 17 ऑगस्टदरम्यान वनडे सीरिजमधील 3 सामने खेळवण्यात येतील. तर 21 ते 24 ऑगस्टदरम्यान एकमेव 4 दिवसीय सामन्याचा थरार पाहायला मिळणार आहे.

वूमन्स इंडिया ए टीमचं ऑस्ट्रेलिया दौऱ्याचं वेळापत्रक

टी 20 मालिका

पहिला सामना, 7 ऑगस्ट, मॅके

दुसरा सामना, 9 ऑगस्ट, मॅके

तिसरा सामना, 10 ऑगस्ट, मॅके

वनडे सीरिजचं वेळापत्रक

पहिला सामना, 13 ऑगस्ट, नॉर्थ्स

दुसरा सामना, 15 ऑगस्ट, नॉर्थ्स

तिसरा सामना, 17 ऑगस्ट, नॉर्थ्स

मल्डी डे मॅच, 21-24 ऑगस्ट, अॅलेन बॉर्डर फिल्ड

ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील टी 20 मालिकेसाठी वूमन्स इंडिया ए टीम : राधा यादव (कर्णधार), मिन्नू मणी (उपकर्णधार), शफाली वर्मा, डी वृंदा, सजना सजीवन, उमा चेत्री (विकेटकीपर), रघवी बिस्त, श्रेयंका पाटील (फिटनेसवर अवलंबून), प्रेमा रावत, नंदिनी कश्यप (विकेटकीपर), तनुजा कंवेर, जोशिता व्हीजे, शबनम शकील, साईमा ठाकोर आणि तितास साधु.

वनडे आणि मल्डी डे मॅचसाठी वूमन्स इंडिया ए टीम : राधा यादव (कर्णधार), मिन्नू मणी (उपकर्णधार), शफाली वर्मा, तेजल हसबनीस, रघवी बिस्त, तनुश्री सरकार, उमा चेत्री (विकेटकीपर), प्रिया मिश्रा (फिटनेसवर अवलंबून), तनुजा कंवर, नंदिनी कश्यप (विकेटकीर), धारा गुज्जर, जोशिता व्हीजे, शबमन शकील, साईमा ठाकोर आणि तितास साधु.