Cricket : टीममध्ये वैभव सूर्यवंशी-आयुष म्हात्रेला संधी नाही, स्टार जोडीला का वगळलं? बीसीसीआयने सांगितलं कारण

Vaibhav Suryavanshi and Ayush Mhatre U19 Team India : भारताच्या आयुष म्हात्रे आणि वैभव सूर्यवंशी या 19 वर्षांखालील 2 स्टार खेळाडूंनी गेल्या काही महिन्यांत क्रिकेट विश्वाचं लक्ष वेधून घेतलंय. दोघेही सातत्याने चमकदार कामगिरी करतायत. मात्र बीसीसीआयने या दोघांना एका मालिकेतून वगळलंय. जाणून घ्या कारण.

Cricket : टीममध्ये वैभव सूर्यवंशी-आयुष म्हात्रेला संधी नाही, स्टार जोडीला का वगळलं? बीसीसीआयने सांगितलं कारण
Vaibhav Suryavanshi and Ayush Mhatre U19 Team India
Image Credit source: MB Media/Getty Images
| Updated on: Nov 11, 2025 | 9:13 PM

टीम इंडियाने ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील वनडे सीरिज गमावल्यानंतर टी 20i मालिका 2-1 अशा फरकाने आपल्या नावावर केली. भारताने या विजयासह ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा शेवट गोड केला. त्यानंतर आता टीम इंडिया मायदेशात वेस्ट इंडिजनंतर पुन्हा एकदा कसोटी मालिका खेळण्यासाठी सज्ज झाली आहे. येत्या 14 नोव्हेंबरपासून टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात कसोटी मालिकेचा थरार रंगणार आहे. त्याआधी भारतीय क्रिकेट वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. बीसीसीआय निवड समितीने 19 वर्षांखालील तिरंगी मालिकेसाठी इंडिया ए आणि इंडिया बी अशा 2 संघांची घोषणा केली आहे. बीसीसीआयने या दोन्ही संघात स्टार खेळाडू वैभव सूर्यवंशी आणि आुयष म्हात्रे या दोघांचा समावेश केलेला नाही. त्यामुळे चाहत्यांकडून आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. मात्र बीसीसीआयने या दोघांना कोणत्या कारणामुळे संधी दिलेली नाही? हे देखील स्पष्ट केलं आहे.

ट्रांयगुलर सीरिजचं आयोजन हे 17 ते 30 नोव्हेंबर दरम्यान करण्यात आलं आहे. या तिरंगी मालिकेत इंडिया ए, इंडिया बी आणि अफगाणिस्तान यांच्यात रंगत पाहायला मिळणार आहे. मालिकेतील सर्व सामने हे बंगळुरुतील सेटंर ऑफ एक्सीलेंसमध्ये होणार आहेत.

ज्युनिअर द्रविडला संधी

निवड समितीने टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि प्रशिक्षक राहिलेले राहुल द्रविड यांचा मुलगा अन्वय याला या तिरंगी मालिकेत संधी दिली आली आहे. अन्वयचा बी टीममध्ये समावेश करण्यात आला आहे.

अफगाणिस्तान विरुद्धच्या मालिकेसाठी इंडिया ए आणि बी टीम जाहीर

आयुषला संधी न मिळण्याचं कारण काय?

आयुष सध्या रणजी ट्रॉफी स्पर्धेत खेळतोय. आयुष दक्षिण आफ्रिका ए टीम विरुद्ध पहिल्या अनऑफीशियल टेस्ट मॅचमध्ये होता. तर दुसऱ्या बाजूला यशस्वी जैस्वाल रणजी ट्रॉफी स्पर्धेत मुंबईचं प्रतिनिधित्व करत होता. मात्र दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी यशस्वी याला मुंबई संघातून मुक्त करण्यात आलं. त्यामुळे यशस्वीच्या जागी आयुषला संधी देण्यात आली. सध्या आयुष म्हात्रे रणजी ट्रॉफी स्पर्धेत खेळत असल्याने त्याला तिरंगी मालिकेत संधी देण्यात आली नाही, असं स्पष्टीकरण बीसीसीआयने प्रसिद्धीपत्रकात दिलं आहे.

टी 20 रायजिंग स्टार आशिया कप 2025 स्पर्धेला 14 नोव्हेंबरपासून सुरुवात होत आहे. या स्पर्धेत एकूण 8 संघ खेळणार आहेत. या स्पर्धेसाठी वैभव सूर्यवंशी याची इंडिया ए टीममध्ये निवड करण्यात आली आहे. त्यामुळे वैभवचा त्रिकोणी मालिकेसाठी समावेश करण्यात आलेला नाही.