
मुंबई : वर्ल्ड कप 2023 स्पर्धा जवळ आलीय. त्याआधी टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलियामध्ये तीन सामन्यांची वनडे सीरीज खेळली जाणार आहे. वनडे सीरीजची सुरुवात 22 सप्टेंबरला होत आहे. टीम इंडियाने या सीरीजसाठी दोन टीम निवडल्या आहेत. पहिल्या दोन वनडे मॅचसाठी रोहित शर्मा, विराट कोहली सारख्या दिग्गजांना आराम देण्यात आलाय. कुलदीप यादव आणि हार्दिक पांड्या सुद्धा पहिल्या दोन सामन्यात खेळणार नाहीय. विराट कोहलीला आराम दिलाय, त्यावर बरेच प्रश्न उपस्थित होतायत. विराट कोहलीचे फॅन्स सातत्याने सोशल मीडियावर त्याच्याबद्दल प्रश्न विचारतायत. आता विराट कोहलीला आराम देण्यावरुन इतका वाद का निर्माण झालाय? विराट कोहलीला आराम देण्यावरुन इतका विरोध का होतोय, ते या आकड्यांमधून समजून घ्या.
विराट कोहली मागच्या 9 वनडे सामन्यात 6 वेळा फलंदाजी करु शकलेला नाही. एकतर त्याला आराम दिला किंवा त्याची बॅटिंग आली नाही. म्हणून त्याला आराम देण्यावरुन इतका गहजब होतोय. हे वाचून तुम्ही हैराण व्हाल पण विराट कोहलीने मागच्या 2 वर्षात 21 वनडे सामने मिस केलेत. 2011 ते 2020 दरम्यान तो फक्त 20 वनडे सामन्यात खेळला नाही. वर्ल्ड कपआधी विराट कोहलीला आराम दिला, तर त्यावर प्रश्न निर्माण होणं स्वाभाविक आहे. विराट कोहलीला आराम दिल्या काय नुकसान होऊ शकते, ते समजून घ्या. विराट कोहलीचा आराम टीम इंडियाचा खेळ बिघडवू शकतो.
ऑस्ट्रेलियन टीमची फुल स्ट्रेंथ
वर्ल्ड कपआधी विराट कोहली ऑस्ट्रेलिया विरुद्ध पूर्ण सीरीज खेळला, तर त्याला महत्त्वाच्या स्पर्धेआधी चांगला सराव मिळेल. ऑस्ट्रेलियन टीम आपल्या फुल स्ट्रेंथने आली आहे. त्यांचे सगळे टॉप बॉलर्स वनडे सीरीजमध्ये खेळताना दिसतील. क्वालिटी बॉलर्स विरुद्ध विराट कोहलीने धावा केल्या, तर निश्चितच त्याचा आत्मविश्वास वाढेल.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध सीरीजनंतर किती मॅच?
ऑस्ट्रेलिया विरुद्ध वनडे सीरीजनंतर टीम इंडिया वर्ल्ड कपआधी दोन वॉर्मअप मॅच खेळणार आहे. वॉर्मअप मॅच आणि आंतरराष्ट्रीय सामने यात मोठा फरक असतो. विराटसाठी ऑस्ट्रेलियापेक्षा चांगला विरोधक कोण असू शकतो.
विराट शेवटचा भारतात कधी खेळलेला ?
विराट कोहली मार्चनंतर भारतात एकही वनडे सामना खेळलेला नाही. शेवटचा सामना तो ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळला होता. तीन मॅचच्या त्या सीरीजमध्ये विराटची बॅट तळपली नव्हती. त्यामुळे विराटसाठी आगामी ऑस्ट्रेलिया विरुद्ध सीरीज महत्त्वाची आहे.
विराट कोहली सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. पण जास्त रेस्ट घातक ठरु शकते. विराट कोहलीने मागच्या 9 वनडे सामन्यात 3 इनिंगमध्ये बॅटिंग केलीय. यात एक शतक आहे. पण दोन मॅचमध्ये त्याची बॅट चाललेली नाही.