VIDEO | कॅचच्या नादात एकमेकांना धडकून पडले, मिठ्या मारल्या, पण कॅच सोडला नाय

| Updated on: Mar 15, 2022 | 10:57 AM

क्रिकेटच्या (Cricket) मैदानात अनेकदा चेंडू झेलताना (Catch) क्षेत्ररक्षकांमध्ये मिसकम्युनिकेशन होतं, क्षेत्ररक्षक एकमेकांना धडकतात आणि झेल सुटतो किंवा दोन्ही क्षेत्ररक्षकांपैकी कोणीच चेंडू झेलण्यासाठी पुढे येत नाही, अशा वेळी अनेकदा फलंदाजांना जीवदान मिळतं.

VIDEO | कॅचच्या नादात एकमेकांना धडकून पडले, मिठ्या मारल्या, पण कॅच सोडला नाय
असा कॅच तुम्ही याआधी पाहिला नसेल.
Image Credit source: VideoGrab
Follow us on

मुंबई : क्रिकेटच्या (Cricket) मैदानात अनेकदा चेंडू झेलताना (Catch) क्षेत्ररक्षकांमध्ये मिसकम्युनिकेशन होतं, क्षेत्ररक्षक एकमेकांना धडकतात आणि झेल सुटतो किंवा दोन्ही क्षेत्ररक्षकांपैकी कोणीच चेंडू झेलण्यासाठी पुढे येत नाही, अशा वेळी अनेकदा फलंदाजांना जीवदान मिळतं. परंतु नुकताच क्रिकेटच्या मैदानात एक अप्रतिम झेल पाहायला मिळाला आहे. यामध्ये दोन क्षेत्ररक्षक चेंडू झेलण्याच्या नादात एकमेकांना धडकले, दोघेही जमीनीवर पडले. परंतु दोघांनीही जमिनीवर पडत असताना एकमेकांना पकडलं, मिठी मारली. मात्र हे करत असताना चेंडूवरुन नजर हटू दिली नाही. दोघांनीही अप्रतिम टीम वर्कचं प्रदर्शन करत चेंडू अलगद झेलला. हे दृश्य युरोपियन क्रिकेट लीगमध्ये (European Cricket League) खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात पाहायला मिळाले. फलंदाजाने सीमारेषेच्या दिशेने मोठा फटका लगावला, चेंडू झेलण्यासाठी दोन क्षेत्ररक्षक चेंडूच्या दिशेने धावले. सीमारेषेजवळ त्यांनी एकमेकांना मिठी मारत चेंडू झेलला आणि फलंदाजाला पॅव्हेलियनचा रस्ता धरावा लागला.

एकात्मतेतच ताकद असते असे म्हणतात, या दोन क्षेत्ररक्षकांनीही मिठी मारून एकजुटीचा पुरावा दिला आणि झेल घेण्यात यश मिळविले. मात्र, हा झेल सामन्याचा निकाल त्यांच्या बाजून फिरवू शकला नाही कारण या सामन्याचा निकाल डकवर्थ लुईस नियमानुसार आला. ज्यामध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.

युरोपियन क्रिकेट लीगचा हा अंतिम सामना होता. पंजाब लायन्स निकोसिया आणि पाक आय केअर बादलोना हे संघ आमनेसामने होते. या सामन्यात पाक आय केअर बादलोना संघाने प्रथम फलंदाजी केली. दुसऱ्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर पहिली विकेट पडली. त्यांच्या डावातील तिसऱ्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर दोन खेळाडूंनी मिठी मारल्याचे दृश्य पाहायला मिळाले.

पंजाब लायन्स निकोसियाकडून सिकंदर अली फलंदाज तर सुशील कुमार गोलंदाजी करत होता. सुशलीच्या चेंडूवर सिकंदर अलीने जोरदार फटका लगावला. चेंडू सीमारेषेवर पकडण्यासाठी दोन क्षेत्ररक्षक धावले. आणि दोघेही एकमेकांना धडकले, दोघांनी मिठी मारली, परंतु त्यांनी कॅच ड्रॉप होऊ दिला नाही.

कॅच चांगला होता, पण त्याने सामन्याचा निकाल बदलला नाही.

सिकंदर अलीला बाद करण्यात पंजाब लायन्स निकोसियाचे खेळाडू यशस्वी झाले. सिकंदर बाद झाला तेव्हा त्याची धावसंख्या 6 इतकी होती आणि संघाच्या खात्यात 26 धावा होत्या. 10-10 षटकांच्या या सामन्यात त्यांच्या संघाने प्रथम खेळताना 9 गड्यांच्या मोबदल्यात 93 धावा केल्या.

प्रत्युत्तरात पंजाब लायन्स निकोसिया संघ 94 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरला तेव्हा पहिल्या 3 षटकात केवळ 18 धावांत 5 विकेट गमावल्या. त्यानंतर सामन्यात थोडा गोंधळ झाला, त्यानंतर सामन्याचा निकाल डकवर्थ लुईस नियमानुसार देण्यात आला. ज्यामध्ये पंजाब लायन्स संघाचा 14 धावांनी पराभव झाला.

इतर बातम्या

श्रीलंकेवरील मोठ्या विजयामुळे WTC Points Table मध्ये टीम इंडियाला मोठा फायदा

IND vs SL: ‘श्रेयसला माहितीय तो अजिंक्यच्या….’, रोहित शर्मा अय्यरबद्दल बोलला खास गोष्ट

दोन दिवसात ठरणार, हार्दिक पंड्या IPL 2022 मध्ये खेळणार की, नाही, परीक्षा द्यावीच लागेल