ENG vs NZ, 1st Test: Blundell-Michell ने न्यूझीलंडला सावरले; घेतली 227 धावांची आघाडी

| Updated on: Jun 04, 2022 | 7:25 AM

सामन्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवार, 3 जून रोजी पहिल्याच सत्रात न्यूझीलंडचा दुसऱ्यांदा दुसऱ्यांदा बॅटींगची संधी मिळाली. तर इंग्लंडला अवघ्या 141 धावा करता आल्या. त्यावेळी न्यूझीलंड केवळ 9 धावांनी पिछाडीवर होता.

ENG vs NZ, 1st Test: Blundell-Michell ने न्यूझीलंडला सावरले; घेतली 227 धावांची आघाडी
क्रिकेट
Image Credit source: tv9
Follow us on

ENG vs NZ, 1st Test: इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील लॉर्ड्स कसोटीत (Lord’s Test) अखेर क्रिकेट प्रेमींना फटक्यांची आतिशबजी पहायला मिळाली. तर लॉर्ड्स बरसणाऱ्या गोलंदाजांचा कहर हा थांबला. तथापि, यजमान इंग्लंडसाठी आणि त्यांच्या चाहत्यांसाठी ही लॉर्ड्स वरिल ही कसोटी काही संकंटीपेक्षा कमी नाही. कारण न्यूझीलंडच्या या दोन्हीही फलंदाजांनी चांगली फलंदाजी केली. तथापी कोणताही कसोटीचा (Test cricket) अनुभव नसताना. ते यजमान इंग्लंडच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई करताना दिसत आहेत. तसेच संघातील स्थान पक्के करण्याचा प्रयत्न करत आहेत. पहिल्या चार सत्रात 23 गडी बाद केल्यानंतर, डॅरिल मिशेल (नाबाद 97) आणि टॉम ब्लंड्स (Blundell) (नाबाद 90) यांनी अखेर न्यूझीलंडला दुसऱ्या डावात मजबूत स्थितीत आणले. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत न्यूझीलंडने अवघे 4 गडी गमावून 230 धावा केल्या होत्या आणि आता त्यांच्याकडे 227 धावांची आघाडी आहे.

सामन्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवार, 3 जून रोजी पहिल्याच सत्रात न्यूझीलंडचा दुसऱ्यांदा दुसऱ्यांदा बॅटींगची संधी मिळाली. तर इंग्लंडला अवघ्या 141 धावा करता आल्या. त्यावेळी न्यूझीलंड केवळ 9 धावांनी पिछाडीवर होता. मात्र, पहिल्या दिवसाप्रमाणे दुसऱ्या दिवशीही संघाची सुरुवात खराब झाली. न्यूझीलंडने अवघ्या 56 धावांत चार विकेट गमावल्या होत्या. या कसोटीत पदार्पण करणाऱ्या इंग्लंडचा वेगवान गोलंदाज मॅथ्यू पॉट्सने दुसऱ्या डावातही आपली चमक कायम ठेवली. त्याने दुसऱ्या डावात न्यूझीलंडच्या चारपैकी दोन विकेट्स घेतल्या, त्यात किवी कर्णधार केन विल्यमसनच्या विकेटचाही समावेश होता. पॉट्सने पहिल्या डावात विल्यमसनलाही बाद केले.

ब्लंडेल-मिशेलने फलंदाजीचे धडे गिरवले

अशा स्थितीत न्यूझीलंडला पुन्हा छोट्या धावसंख्येवर बाद होण्याचा धोका होता, पण इथून मिचेल आणि ब्लंडेल (टॉम ब्लंडेल) यांनी मिळून संघाला आणखी धक्का बसू दिला नाही. दोघांनी उपाहारापर्यंत संघाला 128 धावांपर्यंत नेले, या सत्रात फक्त डेव्हॉन कॉनवेची विकेट पडली होती, जो स्टुअर्ट ब्रॉडने बाद केला. तिसर्‍या सत्रात या दोन्ही फलंदाजांनी आपला डाव सावरत इंग्लंडच्या प्रत्येक प्रयत्नाला अपयशी केले.

हे सुद्धा वाचा

यादरम्यान ब्लंडेलने पहिले अर्धशतक पूर्ण केले, जे या सामन्यातील दोन्ही संघांचे पहिले अर्धशतक होते. 18 व्या कसोटीतील हे त्याचे पाचवे अर्धशतक ठरले. त्यानंतर लवकरच मिशेलनेही चौथे कसोटी अर्धशतक पूर्ण केले. दोघांनी सहज धावा केल्या आणि दिवसअखेर शतकाच्या जवळ पोहोचले. दोघांनी पाचव्या विकेटसाठी 180 धावांची नाबाद भागीदारी केली आणि आता ते तिसऱ्या दिवशी आपले शतक पूर्ण करण्यासाठी जातील.

इंग्लंडला केवळ 9 धावांची आघाडी

तत्पूर्वी, दिवसाची सुरुवात इंग्लंडच्या डावाने झाली आणि पहिल्या सत्राच्या 7 षटकांतच पहिल्या डावात इंग्लंडचा डाव अवघ्या 141 धावांवर आटोपला. त्यामुळे इंग्लंडला पहिल्या डावात केवळ 9 धावांची आघाडी घेता आली. इंग्लंडने सकाळची सुरुवात सात बाद 116 धावांवर केली, परंतु लवकरच शेवटच्या तीन विकेट गमावल्या, टीम साऊदीने दोन आणि ट्रेंट बोल्टने शेवटची विकेट घेतली, साऊथीने 55 धावांत चार आणि बोल्टने 21 धावा देत तीन बळी घेतले.