Athiya Shetty-KL Rahul Wedding – आज शुभमंगल सावधान, लग्नाबद्दल जाणून घ्या सर्व काही

Athiya Shetty-KL Rahul Wedding - कॉक्टेल पार्टीने दोघांच्या लग्नाचे विधी सुरु झाले. या पार्टीमध्ये कुटुंबातील सदस्य आणि जवळचा मित्र परिवार सहभागी झाला होता. आज 23 जानेवारीला दोघे विवाहबंधनात अडकतील.

Athiya Shetty-KL Rahul Wedding - आज शुभमंगल सावधान, लग्नाबद्दल जाणून घ्या सर्व काही
KL Rahul and Athiya Shetty
Image Credit source: Instagram
| Updated on: Jan 23, 2023 | 8:58 AM

Athiya Shetty KL Rahul Wedding – बॉलिवूड अभिनेत्री आथिया शेट्टी आणि भारतीय क्रिकेटपटू केएल राहुल यांची रिलेशनशिप मागच्या काही वर्षांपासून चर्चेत होती. अलीकडे त्यांच्या लग्नाची चर्चा सुरु झाली होती. अखेर आज तो लग्नाचा दिवस आलाय. मागच्या दोन-तीन दिवसांपासून दोघांच्या घरचे फोटो, व्हिडिओ समोर येत आहेत. यात लग्नाची तयारी सुरु असल्याच स्पष्ट दिसतय. आज 23 जानेवारीला दोघे जन्मो-जन्मीसाठी विवाहबंधनात अडकतील, आम्ही तुम्हाला दोघांच्या वेडिंग फंक्शनबद्दल सर्व माहिती देणार आहोत.

कॉक्टेल पार्टीने सुरुवात

आथिया शेट्टीचे वडिल आणि बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टी यांचं खंडाळा येथे आलिशान फार्म हाऊस आहे. आथिया आणि केएसल राहुल यांचं लग्न याच फार्म हाऊसवर होणार आहे. रिपोर्ट्सनुसार, काल कॉक्टेल पार्टीने दोघांच्या लग्नाचे विधी सुरु झाले. या पार्टीमध्ये कुटुंबातील सदस्य आणि जवळचा मित्र परिवार सहभागी झाला होता.

हळद आणि मेहेंदी फंक्शन

काल हळद आणि मेहंदी फंक्शन झालं. सप्तपदी घेण्याआधी खंडाळा फार्म हाऊसवर हळद आणि मेहंदी सेरेमनी आयोजित करण्यात आली होती. आज 23 जानेवारीला दोघे विवाहबंधनात अडकतील. कुटुंबातील जवळचे सदस्य आणि मित्रपरिवार यावेळी उपस्थित असेल.


लग्नात मेन्यू काय ?

रिपोर्ट्सनुसार, लग्न सोहळ्यात सहभागी होणाऱ्या लोकांच्या राहण्याची व्यवस्थात फार्म हाऊसच्या जवळ असलेल्या एका हॉटेलवर करण्यात आली आहे. लग्नाला येणाऱ्या पाहुण्यासाठी साऊथ इंडियन जेवणाची व्यवस्था आहे. या लग्नात परंपरेच पालन करण्यात येईल. केळीच्या पानावर जेवण वाढण्यात येईल.

रिसेप्शनला किती हजार लोक येणार?

मीडिया रिपोर्ट्सुनार आज आथिया शेट्टी आणि केएल राहुलच खंडाळ्यात लग्न होईल. त्यानंतर मुंबई भव्य रिसेप्शनचा कार्यक्रम होणार आहे. यावेळी वधु-वरांना आशिर्वाद देण्यासाठी फिल्म इंडस्ट्री आणि स्पोर्ट्स विश्वातील व्यक्ती उपस्थित असतील. त्याशिवाय बिझनेस आणि राजकीय क्षेत्रातील लोकही या रिसेप्शनला दिसू शकतात. रिसेप्शन खूप ग्रँड असेल. यात 3 हजारपेक्षा जास्त लोक सहभागी होतील. आथिया आणि केएल राहुलच्या लग्नाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे.