Kuldeep Yadav : कुलदीप यादवचा धमाका, पहिल्याच सामन्यात मोठा कारनामा

| Updated on: Jan 12, 2023 | 5:44 PM

कुलदीप यादवचा (Kuldeep Yadav) श्रीलंका विरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात युजवेंद्र चहलच्या (Yuzvendra Chahal) जागी समावेश करण्यात आला.

Kuldeep Yadav : कुलदीप यादवचा धमाका, पहिल्याच सामन्यात मोठा कारनामा
Image Credit source: BCCI
Follow us on

Kuldeep Yadav, IND vs SL, 2nd ODI : टीम इंडियाने श्रीलंकेला दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात 40 ओव्हरआधीच 215 धावांवर रोखलं. टीम इंडियाच्या गोलंदाजांपुढे श्रीलंकेने शरणागती पत्कारली. टीम इंडियाचा चायनामॅन गोलंदाज कुलदीप यादवने 3 विकेट्स घेत मिळालेल्या संधीचं सोनं केलं. तसेच यासह कुलदीपने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनोखं द्विशतक पूर्ण केलं. (chinaman bowler kuldeep yadav take 3 wickets and complete 200 international wickets ind vs sl 2nd odi eden garden kolkata)

कुलदीपला एकदिवसीय संघात प्लेइंग इलेव्हनमध्ये 1 महिन्याने संधी मिळाली. कुलदीपने अखेरची वनडे मॅच 10 डिसेंबर 2022 मध्ये बांगलादेश विरुद्ध खेळला होता. मात्र या दरम्यानच्या काळात कुलदीपने नेट्समध्ये कसून सराव केला. या सरावाचा कुलदीपला चांगला फायदा झाला.

कुलदीपने श्रीलंका विरुद्धच्या दुसऱ्या वनडेत आपल्या कोट्यातील 10 ओव्हरमध्ये 51 धावा देत 2 विकेट्स घेतल्या. 200 आंतरराष्ट्रीय विकेट्स पूर्ण केल्या. कुलदीप 200 विकेट्स घेणारा 23 वा भारतीय गोलंदाज ठरला.

हे सुद्धा वाचा

कुलदीपने 200 पैकी सर्वाधिक 122 विकेट्स या वनडे क्रिकेटमध्ये घेतल्या आहेत. कुलदीपने फक्त 72 डावांमध्ये 122 विकेट्स घेतल्या आहेत. यामध्ये 2 हॅटट्रिकचा समावेश आहे. तसेच कसोटीतील 14 डावात 34 आणि टी 20 मधील 24 इनिंग्समध्ये 44 विकेट्स पटकावल्या आहेत.

कुलदीपने टीम इंडियाकडून 25 मार्च 2017 मध्ये कसोटी पदार्पण केलं होतं. तर त्याच वर्षात काही महिन्यांनी अनुक्रमे वनडे आणि टी 20 डेब्यू केलं.

दरम्यान टीम इंडियाला दुसऱ्या सामन्यासह मालिका जिंकण्यासाठी 216 धावांचं आव्हान मिळालं आहे. श्रीलंकेकडून नुवानिदू फर्नाडोने श्रीलंकेकडून सर्वाधिक 50 धावा केल्या. तर कुसल मेंडिस आणि दुनिथ वेलालागेने अनुक्रमे 34 आणि 32 रन्स केल्या.

श्रीलंका प्लेइंग इलेव्हन : दसून शनाका (कॅप्टन), कुसल मेंडिस, अविष्का फर्नांडो, चारित असलांका, धनंजय डी सिल्वा, नुवानिदु फर्नांडो, वानिंदु हसरंगा, चामिका करुणारत्ने, दुनिथ वेलेज, लाहिरू कुमारा आणि कसुन रजिता.

टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन : रोहित शर्मा (कॅप्टन) , शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी आणि उमरान मलिक.