Wtc Final 2023 | वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलआधी टीम इंडियासाठी सर्वात मोठी गूडन्यूज

टीम इंडिया ऑस्ट्रेलिया विरुद्ध 7 ते 11 जून दरम्यान वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल खेळणार आहे. याआधी टीम इंडियासाठी सर्वात मोठी बातमी समोर आली आहे.

Wtc Final 2023 | वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलआधी टीम इंडियासाठी सर्वात मोठी गूडन्यूज
wtc team india
Follow us
| Updated on: May 01, 2023 | 5:01 PM

लंडन | टीम इंडियाला 2013 पासून आयसीसीची कोणतीही ट्रॉफी जिंकता आलेली नाही. टीम इंडियाला सातत्याने आयसीसी ट्रॉफी जिंकण्यात अपयश येत आहे. मात्र आता टीम इंडियाच्या खेळाडूंना आगामी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल जिंकून हा डाग पुसून काढण्याची संधी आहे. टीम इंडिया 2021 नंतर यंदा दुसऱ्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल सामना खेळणार आहे. टीम इंडियासमोर ऑस्ट्रेलियाचं आव्हान असणार आहे. टीम इंडियाचं 2021 मध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन होण्याचं स्वप्न न्यूझीलंडमुळे भंग केलं होतं. मात्र आता पुन्हा एक संधी मिळाली आहे.

हा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल महामुकाबला द ओव्हलमध्ये खेळवण्यात येणार आहे. या सामन्याचं आयोजन हे 7 ते 11 जून दरम्यान करण्यात आलं आहे. तर 12 जून हा राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. दोन्ही संघांची महामुकाबल्यासाठी घोषणाही करण्यात आली आहे. रोहित शर्मा टीम इंडियाचं आणि पॅट कमिन्स ऑस्ट्रेलियाचं नेतृत्व करणार आहे. या अंतिम सामन्याला अजून 1 महिना शिल्लक आहे. मात्र त्याआधी टीम इंडियासाठी आनंदाची बातमी समोर आली आहे.

चेतेश्वर पुजारा, टीम इंडियाचा तारणहार आणि राहुल द्रविड याचा क्रिकेटमधील वारसदार. चेतेश्वर पुजारा याला वॉल 2 असंही म्हणतात. चेतेश्वर पुजारा हा इंग्लंडमध्ये काउंटी चॅम्पियनशीप खेळतोय. या स्पर्धेत पुजारा जबरदस्त कामगिरी करतोय.

पुजारा या स्पर्धेत ससेक्स संघाचं नेतृत्व करतोय. पुजारा स्पर्धेत खोऱ्याने धावा करतोय. पुजाराने ब्रिस्टल इथील काउंटी ग्राउंडमध्ये ग्लॉस्टरशायर विरुद्ध या मोसमातील दुसरं शतक ठोकलंय. पुजाराचं हे 11 सामन्यांमधील ससेक्स टीमसाठीचं 7 वं आणि प्रथम श्रेणीतील एकूण 58 वं शतक ठरलं.

पुजाराने या शतकी खेळीत 238 बॉलमध्ये 151 धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान पुजाराने 20 चौकार आणि 2 सिक्स ठोकले. पुजाराने केलेल्या या खेळीमुळे निश्चितच टीम इंडिया मॅनेजमेंटचा आनंद द्विगुणित झाला असेल.

WTC Final साठी टीम इंडिया

रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, केएल राहुल, आर. अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, केएस भरत, शार्दुल ठाकुर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव आणि जयदेव उनाडकट.

WTC Final साठी टीम ऑस्ट्रेलिया

पॅट कमिन्स (कॅप्टन), स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर, स्कॉट बोलँड, ॲलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, मार्कस हॅरिस, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लायन , मिचेल मार्श, टॉड मर्फी, मिचेल स्टार्क आणि मॅथ्यू रेनशॉ.

Non Stop LIVE Update
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच.
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?.
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती.
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा.
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?.