AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दिग्गज क्रिकेटरचं लेस्बियन महिलेसोबत अफेअर? थेट फोटो समोर आल्याने खळबळ!

मोनिकाने केलेल्या दाव्यानुसार अ‍ॅशले गार्डनर हिचे ऑस्ट्रेलियाची महिला क्रिकेटर जॉर्जिया वोल हिच्यासोबत अफेअर चालू आहे. जॉर्जिया वोल अवघ्या 22 वर्षांची आहे. मोनिकाने आपल्या इन्स्टाग्राम पोस्टवर एक स्टोरी ठेवली आहे.

दिग्गज क्रिकेटरचं लेस्बियन महिलेसोबत अफेअर? थेट फोटो समोर आल्याने खळबळ!
monica wright ashleigh gardnerImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 13, 2026 | 4:49 PM
Share

Ashleigh Gardner : ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटर अ‍ॅशले गार्डनर ही लेस्बियन आहे. तिने एप्रिल 2025 मध्ये आपल्या लाँग टाईम पार्नटर मोनिका राईट हिच्याशी लग्न केलं होतं. दरम्यान, आता 29 वर्षीय अ‍ॅशले सध्या एका वैयक्तिक आणि अजब कारणामुळे चर्चेत आहे. अ‍ॅशले गार्डनरवर पत्नी मोनिका राईट हिला धोका दिल्याचा आरोप केला जातोय. अ‍ॅशले आणि मोनिका बऱ्याच दिवसांपासून वेगवेगळ्या राहात आहेत. गेल्या वर्षी मोनिका आणि अ‍ॅशले गार्डनर यांच्या नात्यात वितुष्ट निर्माण झालं होतं. आता तर मोनिकाने थेट सोशल मीडियावरच अ‍ॅशलेने नेमका काय धोका दिला? आणि तिचे कोणासोबत अफेअर चालू आहे, याबाबत खळबळजनक माहिती दिली आहे.

जॉर्जिया वोलसोबत आहे अफेअर?

मोनिकाने केलेल्या दाव्यानुसार अ‍ॅशले गार्डनर हिचे ऑस्ट्रेलियाची महिला क्रिकेटर जॉर्जिया वोल हिच्यासोबत अफेअर चालू आहे. जॉर्जिया वोल अवघ्या 22 वर्षांची आहे. मोनिकाने आपल्या इन्स्टाग्राम पोस्टवर एक स्टोरी ठेवली आहे. या स्टोरीमध्ये तिने जॉर्जिया वोलचा फोटो पोस्ट केला आहे. सोबतच या पोस्टमध्ये तिने याच व्यक्तीच्या सोबतीने माझी बायको मला धोका देत आहे, असा मोठा दावा तिने केला आहे. मोनिकाने थेट जॉर्जिया वोलचा फोटो पोस्ट केल्याने ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट विश्वात मोठी खळबळ उडाली आहे.

अ‍ॅशले गार्डनर अद्याप काहीही बोलली नाही

मोनिकाच्या या दाव्यानंतर अ‍ॅशले गार्डनर तसेच जॉर्जिया या दोघींनीही अद्याप कोणतेच स्पष्टीकरण दिलेले नाही. ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेटनेदेखील यावर अद्याप कोणतेही भाष्य केलेले नाही. रिपोर्टमनुसार मोनिका आणि अ‍ॅशले गार्डनर यांचे लग्न झाल्यानंतर अवघ्या दोन महिन्यातच त्यांच्यात वेगवेगळ्या कारणांवरून भांडण होऊ लागले. अ‍ॅशले गार्डनर तेव्हा भारताच्या दौऱ्यावर एकदिसवयी विश्वचषक स्पर्ध 2025 मध्ये खेळत होती.

मिळालेल्या माहितीनुसार अ‍ॅशले गार्डनर आणि मोनिका या दोघींनी मूल जन्माला घालण्याचाही विचार केला होता. त्यासाठी त्यांनी फर्टिलीटी सेंटरशी संपर्कही केला होता. परंतु नात्यात सतत खटके उडत असल्याने त्यांनी हा विचार पुढे ढकलला. दरम्यान, आता या प्रकरणात नेमकं काय होणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Follow Us
सुनेत्रा पवारांच्या पुणे पालकमंत्री पदावर रोहित पवारांचा सवाल, थेट...
Rohit Pawar : सुनेत्रा पवारांच्या पुणे पालकमंत्री पदावर रोहित पवारांचा सवाल, थेट म्हणाले...
रायगड किल्ला उजळणार सौर ऊर्जेने! राज्यातील 11 ऐतिहासिक गडांवरही...
रायगड किल्ला उजळणार सौर ऊर्जेने! राज्यातील 11 ऐतिहासिक गडांवरही राबवणार विशेष मोहीम
रोहित पवारांच्या वक्तव्यावर माधुरी मिसाळ संतापल्या; म्हणाल्या, राजकारण
रोहित पवारांच्या 'त्या' वक्तव्यावर माधुरी मिसाळ संतापल्या; म्हणाल्या, 'राजकारणात इतका उतावळेपणा कशासाठी?'
सुनेत्रा पवारांचा राष्ट्रवादीच्या सर्व मंत्र्यांना तातडीने बैठकीचे...
सुनेत्रा पवारांचा राष्ट्रवादीच्या सर्व मंत्र्यांना तातडीने बैठकीचे आदेश, देवगिरी बंगल्यावर मोठ्या घडामोडी!
ठाणे महापालिकेला धमकीचा ई-मेल; कर्मचारी आणि नागरिक सावध...
Thane : ठाणे महापालिकेला धमकीचा ई-मेल; कर्मचारी आणि नागरिक सावध
मोठी बातमी! तामिळनाडू सरकारचा ऐतिहासिक निर्णय; पुरुष कर्मचाऱ्यांनाही..
मोठी बातमी! तामिळनाडू सरकारचा ऐतिहासिक निर्णय; पुरुष कर्मचाऱ्यांनाही मिळणार पितृत्व रजा
संविधान दिनी नागपूर-मुंबईत आंदोलन! CJP-काँग्रेसची संविधान बचाव रॅली...
संविधान दिनी नागपूर-मुंबईत आंदोलन! CJP-काँग्रेसची संविधान बचाव रॅली, भाजपविरोधात जोरदार घोषणाबाजी
पुणे पाठोपाठ नाशिक जिल्हा न्यायालयालाही धमकीचा मेल; सहावा मजला टार्गेट
पुणे पाठोपाठ नाशिक जिल्हा न्यायालयालाही धमकीचा मेल; सहावा मजला टार्गेट, पोलीस यंत्रणा सतर्क!
अंबडमध्ये पोलिसांचा मोठा दणका! गुन्हेगारांनी हडपलेल्या जमिनीवरील शेडवर
अंबडमध्ये पोलिसांचा मोठा दणका! गुन्हेगारांनी हडपलेल्या जमिनीवरील शेडवर बुलडोझर
दादांसारखा वचकच नाही! रोहित पवारांचा पुण्याच्या पालकमंत्र्यांना टोला
Rohit Pawar : अजित दादांसारखा वचकच नाही! रोहित पवारांचा पुण्याच्या पालकमंत्र्यांना टोला