भारतीय संघाचं प्रशिक्षक पद सोडताच रवी शास्त्रींकडे नवी कामगिरी, लवकरच दिसणार नव्या भूमिकेत

| Updated on: Nov 15, 2021 | 6:32 PM

रवी शास्त्री टी20 विश्वचषकानंतर टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षक पदावरुन दूर होणार असल्याचे यापूर्वीच जाहीर झाले आहे. त्यांच्याजागी राहुल द्रविडची नियुक्ती केली जाणार असल्याचंही आता समोर आलं आहे. त्यामुळे रवी शास्त्री आता नेमकं काय करणार? याकडे अनेकाचं लक्ष आहे.

भारतीय संघाचं प्रशिक्षक पद सोडताच रवी शास्त्रींकडे नवी कामगिरी, लवकरच दिसणार नव्या भूमिकेत
रवी शास्त्री
Follow us on

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपुष्टात आला आहे. यूएईत पार पडलेल्या टी-20 विश्वचषकानंतर शास्त्री राजीनामा देणार होते. दरम्यान आता ही स्पर्धा संपली असून पुढील स्पर्धांसाठी भारताचा मुख्य प्रशिक्षक म्हणून माजी क्रिकेटपटू राहुल द्रविड काम पाहणार आहे. दरम्यान आता रवी शास्त्री काय करणार आहेत? असे प्रश्न मागील दिवसांपासून समोर येत आहेत. याचं उत्तरही आता समोर आलं आहे.

शास्त्री हे लेजेंड्स लीग क्रिकेट (Legends League Cricket) या जागतिक क्रिकेट लीगचे आयुक्त अर्थात कमिशनर म्हणून काम पाहणार आहेत. या लीगमध्ये जगातील माजी दिग्गज खेळाडू पुन्हा एकदा मैदानावर आमने-सामने येऊन खेळताना दिसणार आहे. आता या लीगचा कर्ता-धर्ता म्हणून शास्त्रींवर मुख्य जबाबदारी पडणार असल्याचं संबधित लीगतर्फे सांगण्यात आलं आहे. त्यांनी त्यांच्या ट्विटरवरुन याबाबतची माहिति दिली.

काय म्हणाले रवी शास्त्री?

याबद्दल बोलताना शास्त्री म्हणाले, ”पुन्हा एकदा क्रिकेट या खेळाबरोबर जोडण्याची संधी मिळत आहे, तेही दिग्गज खेळाडूंसोबत ही एक भारी गोष्ट आहे. हे सर्व करताना मजा येणार हेही नक्की. दिग्गज खेळाडू त्यांच्या या सेकंट इनिंगला कसा न्याय देणार हे पाहताना मजा येईल. मी या सर्वाचा एक भाग असल्याने आनंदी आहे.

कधी पार पडतील सामने

तर या लेजेंड्स लीग क्रिकेटचं पहिलं पर्व जानेवारी, 2022 मध्ये गल्फ देशांमध्ये पार पडणार आहे. ज्यामध्ये भारत, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, इंग्लंड अशा काही महत्त्वाच्या देशांचे माजी दिग्गज खेळाडू 3 वेगवेगळ्या संघामध्ये वाटलेले असतील. ज्यानुसार हे सामने पार पडणार आहेत.

इतर बातम्या

T20 WC : डेव्हिड वॉर्नरने कर्णधाराचा शब्द राखला, फिंचने केलेली भविष्यवाणी खरी ठरवली

T20 world cup Final | ऑस्ट्रेलियाची एक चूक अन् ठोकले 10 चौकार, 3 षटकार; पराभवानंतरही केनच्या फलंदाजीची चर्चा

New Zealand vs Australia T20 world cup Final Result: वॉर्नरने पाया रचला, मार्शनं कळस चढवला, ऑस्ट्रेलिया टी 20 चा नवा विश्वविजेता

(Cricketer Ravi shastri will joins Legends League Cricket as Commissioner)