
मुंबई : चेन्नई सुपर किंग्ज संघाचा कर्णधार महेंद्र सिंग धोनीच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. सीएसकेचा उद्या सामना असून त्याआधी संघाचे बॅटींग कोच माइक हसीने धोनीच्या खेळण्याबाबतची मोठी अपडेट दिली आहे. आतापर्यंतच्या सीझनमध्ये खेळताना धोनीला दुखापतीचा त्रास जाणवत होता. याच पार्श्वभूमीवर माइक हसीने मोठी माहिती दिली आहे.
महेंद्रसिंग धोनीचा गुडघा पूर्णपणे तंदुरुस्त नसल्याचे हसीने सांगितलं. तो प्रत्येक सामन्यात खेळत आहे. आत्तापर्यंत धोनीला सर्व सामन्यांमध्ये समस्या जाणवत होती, पण त्यानंतरही तो संघासाठी सतत फलंदाजी करत आहे. प्लेऑफमध्ये न खेळण्याबाबत हसीने कोणतेही वक्तव्य केले नसले तरी धोनीच्या गुडघ्याची दुखापत गंभीर झाल्यास त्याला मैदानाबाहेर राहावं लागू शकतं असं हसी म्हणाला.
IPL 2023 च्या प्रत्येक सामन्यात धोनी फक्त खालच्या क्रमाने फलंदाजी करताना दिसला आहे. यावर माईक हसीने सांगितले की, माहीला धावा करताना काढताना गुडघ्यावर जास्त ताण आणायचा नाही. त्यामुळे खालच्या क्रमावर फलंदाजी येत तो मोठे फटके मारून डाव ‘फिनिश’ करतो. इतकंच नाहीतर हसीने माहीच्या निवृत्तीबाबतही मोठं वक्तव्य केलं आहे.
महेंद्र सिंग धोनी अजूनही पुढील पाच वर्षे क्रिकेट खेळू शकतो. तो सातत्याने चांगली फलंदाजी करत आहे आणि त्याच्या खेळाचा आनंद घेत आहे. त्याचा खेळ पाहता पुढील पाच वर्षे तो मैदानावर दिसत राहिल असं मला वाटत असल्याचंही हसीने सांगितलं आहे.
दरम्यान, सीएसकेचा शनिवारी दिल्लीसोबत सामना असून त्यामध्ये विजय मिळवणं गरजेचं आहे. कारण प्ले-ऑफमध्ये स्थान पक्क करण्यासाठी हा विजय मिळवावाच लागणार आहे. मात्र हसीने धोनीच्या दुखापतीबाबत माहिती देत प्ले-ऑफधीलही सीएसकेच्या अडचणी वाढणार आहेत.