CSK चाहत्यांसाठी धक्कादायक बातमी, जो 15 वर्षांपासून संघासाठी झटला, त्याच दिग्गजाला बाहेरचा रस्ता दाखवला

Chennai Super Kings : चेन्नईच्या संघामधून एक मोठी घडामोड समोर आली आहे. आयपीएलमधील दिग्गज फ्रँचायझीने एका दिग्गज खेळाडूसोबतचं नातं आता कायमच संपवलं आहे. संघामध्ये यापूर्वीच बरेचशे बदल करण्यात आले होते. त्यानंतर आता हा एक निर्णय घेण्यात आला आहे.

CSK चाहत्यांसाठी धक्कादायक बातमी, जो 15 वर्षांपासून संघासाठी झटला, त्याच दिग्गजाला बाहेरचा रस्ता दाखवला
michael Hussey
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Oct 10, 2026 | 3:15 PM

भारतीय क्रिकेटप्रेमीचं लक्ष लागून राहिलेल्या आयपीएलच्या नव्या हंगामाची प्रतिक्षा असतानाच आता एक घडामोड घडली आहे. २०२७ च्या हंगामापूर्वीच अनेक गोष्टी सुरु असून फ्रँचायझींनीही मोठे बदल करण्यास सुरुवात केली आहे. पाचवेळा चॅम्पियन राहिलेल्या चेन्नई सुपर किंग्स यामध्ये सर्वात आघाडीवर आहे. आता समोर आलेल्या ताज्या माहितीनुसार फ्रँचायझीने दिग्गज फलंदाजी कोच माइकल हसीसोबतचे करार संपवले आहेत. त्यामुळे आस्ट्रेलियाच्या या दिग्गज खेळाडूचा चेन्नईसोबतचा गेल्या १५ वर्षांपासून सुरु असलेला प्रवास अखेर संपला आहे.

हसी २०१८ मध्ये सर्वात आधी फ्रँचायझीसोबत जोडला गेला होता. त्याने संघाचे अनेक फलंदाज घडवले. तत्कालिन मुख्य कोच फ्लेमिंग यांच्यासोबत मिळून संघाला अनेक पदकं मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. पण आता चेन्नईच्या फ्रँचायझीने आपला हा निर्णय हसी यांना कळवला असल्याची माहिती आहे. दरम्यान, अशीही चर्चा आहे की, आता हसीला आयपीएलमधील इतर फ्रँचायझीतर्फे पुन्हा संंधी मिळू शकते. परंतू सध्यातरी याबद्दल ठोस अशी माहिती उपलब्ध नाही.

Loading...

त्याचवेळी हसीनंतर चेन्नई नवा फलंदाजी कोच म्हणून कोणाला निवडणार, कोणाच्या नावाची घोषणा करणार याकडे लक्ष लागले आहे. अद्यापतरी संघाने अशा कोणत्याही नावाची घोषणा केलेली नाही. कोचिंग स्टाफमध्ये चेन्नईने मोठे बदल केले आहेत. ज्यामध्ये मुख्य कोच स्टीफन फ्लेमिंग यांच्याजागी आता झहीर खान हा संघाचा हेड कोच म्हणून काम करताना दिसणार आहे. तर माजी वेगवान गोलंदाज मोहित शर्माला गोलंदाजी कोच म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

दरम्यान, कोच म्हणून काम करणाऱ्या माइकल हसीने संघासाठी सामनेही खेळले आहेत. त्याने आयपीएलच्या पहिल्याच हंगामामध्ये टीमसाठी फलंदाजी केली. २००९ ते २०१३ त्याने संघासाठी आक्रमक खेळी केली. यामध्ये तो २०१४ मध्ये मुंबई इंडियन्समध्ये गेला. त्यानंतर परत एकदा २०१५ पासून तो सीएसकेमध्ये परतला. चेन्नईसाठी त्याने फलंदाजल म्हणून ५० सामने खेळले आहेत. त्यामध्ये १७६८ धावा ठोकल्या. त्याचा स्ट्राइक रेट १२३.६४ राहिला होता.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us