CSK vs KKR : केकेआरने टॉस जिंकला, सीएसकेची बॅटिंग, महेंद्रसिंह धोनी खेळणार? पाहा प्लेइंग ईलेव्हन

Chennai Super Kings vs Kolkata Knight Riders Toss and Playing 11 : चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स दोन्ही संघ पॉइंट्स टेबलच्या तळाशी आहेत. त्यामुळे दोन्ही संघांसाठी हा सामना फार महत्त्वाचा आहे.

CSK vs KKR : केकेआरने टॉस जिंकला, सीएसकेची बॅटिंग, महेंद्रसिंह धोनी खेळणार? पाहा प्लेइंग ईलेव्हन
CSK vs KKR Toss
Image Credit source: Social Media
| Updated on: Apr 14, 2026 | 7:44 PM

आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील 22 व्या सामन्यात यजमान चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स आमनेसामने आहेत. उभयसंघातील या सामन्याचं आयोजन हे चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी 7 वाजता टॉस झाला. केकेआरच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला. केकेआरचा कॅप्टन अजिंक्य रहाणे याने फिल्डिंगचा निर्णय घेत होम टीमला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे. आता चेन्नई या स्टेडियममध्ये 200 पार मजल मारणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

दोन्ही संघांचा हा या मोसमातील पाचवा सामना आहे. चेन्नईने आपला शेवटचा सामना जिंकला आहे. तर त्याआधी चेन्नईला सलग 3 सामन्यांमध्ये पराभूत व्हावं लागलं आहे. चेन्नई पॉइंट्स टेबलमध्ये नवव्या स्थानी आहे.  तर केकेआर पॉइंट्स टेबलमध्ये सर्वात शेवटी अर्थात दहाव्या स्थानी आहे.  केकेआरला अद्याप विजयाचं खातं उघडता आलेलं नाही. केकेआरला या मोसमात 3 सामन्यांत पराभूत व्हाव लगलंय. तर केकेआरचा एक सामना पावसाने वाया घालवला. त्यामुळे केकेआरच्या खात्यात 1 गुण आहे.

प्लेइंग ईलेव्हनबाबत अपडेट

चेन्नई सुपर किंग्सने या सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही. तर दुसऱ्या बाजूला केकेआरने एकमेव आणि अपेक्षित बदल केला आहे. प्लेइंग ईलेव्हनमध्ये मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्ती याचं कमबॅक झालं आहे. त्यामुळे वेगवान गोलंदाज नवदीप सैनी याला बाहेर व्हावं लागलं आहे.

धोनीची एन्ट्री नाहीच

दरम्यान चेन्नईचा अनुभवी फलंदाज महेंद्रसिंह धोनी याला दुखापतीमुळे पहिल्या 4 सामन्यांत खेळता आलं नाही. धोनीने केकेआर विरूद्धच्या सामन्याआधी सराव केला. तसेच धोनी फुटबॉलही खेळला. त्यामुळे चाहत्यांना धोनी केकेआर विरूद्धच्या सामन्यातून टीममध्ये परतेल, अशी आशा चाहत्यांना होती. मात्र तसं झालं नाहीय. त्यामुळे धोनीच्या चाहत्यांना त्याच्या कमबॅकची प्रतिक्षा करावी लागणार आहे.

कोलकाता नाइट रायडर्स प्लेइंग ईलेव्हन : अजिंक्य रहाणे (कर्णधार), कॅमरुन ग्रीन, अंगकृष रघुवंशी (विकेटकीपर), रोवमन पॉवेल, रिंकू सिंग, सुनील नारायण, रमणदीप सिंग, अनुकुल रॉय, वरुण चक्रवर्ती, वैभव अरोरा आणि कार्तिक त्यागी.

चेन्नई सुपर किंग्स प्लेइंग ईलेव्हन : संजू सॅमसन (विकेटकीपर), ऋतुराज गायकवाड (कर्णधार), आयुष म्हात्रे, सर्फराज खान, शिवम दुबे, डेवाल्ड ब्रेव्हीस, जेमी ओव्हरटन, नूर अहमद, अंशुल कंबोज, गुरजपनीत सिंग आणि खलील अहमद.

Follow Us