
आयपीएलच्या 18 व्या मोसमातील (IPL 2025) 8 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Bengaluru) आमनेसामने होते. उभयसंघातील या सामन्याचं आयोजन हे चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियममध्ये करण्यात आलं होते. दोन्ही संघांचा हा या हंगामातील दुसरा सामना होता. आरसीबीने या सामन्यात चेन्नईवर 50 धावांनी दणदणीत विजय मिळवला. आरसीबीचा हा या 18 व्या मोसमातील सलग दुसरा विजय ठरला. आरसीबीने चेन्नईला 197 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र चेन्नईला 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून फक्त 146 धावाच करता आल्या. आरसीबीने या विजयासह पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानी झेप घेतली.
आरसीबीने चेन्नईचा चेन्नईत पराभव केला आहे. आरसीबीने चेन्नईला विजयासाठी 197 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र चेन्नईला 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 146 धावाच करता आल्या.
चेन्नईने सातवी विकेट गमावली आहे. आर अश्विन 11 धावांवर कॅच आऊट झाला आहे.
यश दयाल याने एकाच ओव्हरमध्ये चेन्नईला 2 झटके दिले आहेत. यशने रचीन रवींद्र याच्यानंतर शिवम दुबे याला क्लिन बोल्ड करुन मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला आहे.
यश दयाल याने रचीन रवींद्र याला 41 रन्सवर क्लिन बोल्ड केलं आहे. यासह चेन्नईने पाचवी विकेट गमावली आहे. त्यामुळे आता शिवम दुबे आणि रवींद्र जडेजा या ऑलराउंडर जोडीवर मदार आहे.
आरसीबीने चेन्नईला चौथा झटका दिला आहे. सॅम करन 8 धावा करुन आऊट झाला आहे. त्यामुळे चेन्नईचा स्कोअर 8.5 ओव्हरनंतर 4 आऊट 52 असा झाला आहे.
आरसीबीने चेन्नईला तिसरा धक्का दिलाय. दीपक हुड्डा 4 धावा करुन आऊट झाला आहे. भुवनेश्वर कुमारने यासह पहिली विकेट मिळवली आहे.
जोश हेझलवूड याने चेन्नईला एकाच ओव्हरमध्ये 2 झटके दिले आहेत. हेझलवूडने राहुल त्रिपाठी याला 5 धावांवर बाद केलं. त्यानंतर हेझलवूडने ऋतुराज गायकवाडला झिरोवर आऊट केलं.
आरसीबीने चेन्नईला पहिला झटका दिला आहे. जोश हेझलवूड याने राहुल त्रिपाठीला फिल सॉल्ट याच्या हाती 5 धावांवर कॅच आऊट केलं.
चेन्नईच्या बॅटिंगला सुरुवात झाली आहे. चेन्नईकडून रचीन रवींद्र-राहुल त्रिपाठी ओपनिंग जोडी मैदानात आली आहे. आरसीबीने चेन्नईला विजयासाठी 197 धावांचं आव्हान दिलं आहे.
आरसीबीने चेन्नईला विजयासाठी 197 धावांचं आव्हान दिलं आहे. आरसीबीने 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 196 धावा केल्या.
आरसीबीने सहावी विकेट गमावली आहे. कर्णधार रजत पाटीदार 51 धावा करुन आऊट झाला. मथीशा पथीराना याने रजतला आऊट केलं.
खलील अहमद याने जितेश शर्माला रवींद्र जडेजा याच्या हाती कॅच आऊट करत आरसीबीला पहिला झटका दिला आणि वैयक्तिक पहिली विकेट मिळवली. जितेश 12 धावा करुन माघारी परतला.
आरसीबीने चौथी विकेट गमावली आहे. लियाम लिविंगस्टोन याने 9 बॉलमध्ये 10 रन्स करुन मैदानाबाहेरचा रस्ता धरला. नूर अहमद याने लियामला आऊट करत एकूण तिसरी विकेट मिळवली.
चेन्नईने आरसीबीला तिसरा झटका दिला आहे. नूर अहदमने विराटला 31 धावांवर रचीन रवींद्र याच्या हाती कॅच आऊट केलं.
आरसीबीने दुसरी विकेट गमावली आहे. देवदत्त पडीक्कल कॅच आऊट झाला आहे. कर्णधार ऋतुराज गायकवाड याने देवदत्तला आर अश्विनच्या बॉलिंगवर 27 धावांवर कॅच आऊट केलं.
चेन्नईने आरसीबीला पहिला झटका दिला आहे. महेंद्रसिंह धोनी याने नूर अहमद याच्या बॉलिंगवर फिलीप सॉल्ट याला स्टंपिंग केलं आहे. सॉल्ट 16 बॉलमध्ये 32 रन्स करुन आऊट झाला.
चेन्नई-बंगळुरु सामन्याला सुरुवात झाली आहे. आरसीबीकडून विराट कोहली आणि फिल सॉल्ट सलामी जोडी मैदानात आली आहे. चेन्नईेने टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे. दोन्ही संघांचा हा या हंगामातील दुसरा सामना आहे.
चेन्नई सुपर किंग्ज प्लेइंग ईलेव्हन : रचीन रवींद्र, ऋतुराज गायकवाड (कॅप्टन), राहुल त्रिपाठी, दीपक हुडा, सॅम कुरन, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, नूर अहमद, मथीशा पाथीराना आणि खलील अहमद
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू प्लेइंग इलेव्हन : विराट कोहली, फिलिप सॉल्ट, देवदत्त पडिक्कल, रजत पाटीदार (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (विकेटकीपर), टिम डेव्हिड, क्रुणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, जोश हेजलवुड आणि यश दयाल.
चेन्नई सुपर किंग्सने टॉस जिंकला आहे. कर्णधार ऋतुराज गायकवाड याने बंगळुरुविरुद्ध फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. चेन्नई आणि बंगळुरु या दोन्ही संघांचा हा या मोसमातील दुसरा सामना आहे. दोन्ही संघांनी या मोसमात विजयाने सुरुवात केली आहे.
चेन्नई विरुद्ध बंगळुरु यांच्यातील सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी 7 वाजता टॉस होणार आहे. दोघांपैकी कोण टॉस जिंकणार? याची प्रतिक्षा क्रिकेट चाहत्यांना आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ: रजत पाटीदार (कर्णधार), विराट कोहली, यश दयाल, जोश हेझलवूड, फिल साल्ट, जितेश शर्मा, लियाम लिव्हिंगस्टोन, रसिक सलाम, सुयश शर्मा, कृणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, स्वप्नील सिंग, टिम डेव्हिड, रोमारियो शेफर्ड, नुवान तुषारा, मनोज भंडागे, जेकब बेथेल, देवदत्त पडिकल, स्वस्तिक चिखारा, लुंगी एनगिडी, अभिनंदन सिंग, मोहित राठी.
चेन्नई सुपर किंग्ज संघ: ऋतुराज गायकवाड (कर्णधार), एमएस धोनी, रवींद्र जडेजा, शिवम दुबे, मथिशा पाथिराना, नूर अहमद, रविचंद्रन अश्विन, डेव्हॉन कॉनवे, सय्यद खलील अहमद, रचिन रवींद्र, राहुल त्रिपाठी, विजय शंकर, सॅम करन, शेख रशीद, अंशुल कंबोज, मुकेश चौधरी, दीपक हुडा, गुरजनप्रीत सिंग, नाथन एलिस, जेमी ओव्हरटन, कमलेश नागरकोटी, रामकृष्णन घोष, श्रेयस गोपाल, वंश बेदी आणि आंद्रे सिद्धार्थ.
आयपीएलच्या 18 व्या मोसमातील आठव्या सामन्यात चेन्नई विरुद्ध बंगळुरु यांच्यात लढत आहे. दोन्ही संघांचा हा या हंगामातील दुसरा सामना आहे. दोन्ही संघांनी या हंगामात विजयी सुरुवात केली आहे. या सामन्याचं आयोजन हे चेन्नईच्या होम ग्राउंडमध्ये केलं आहे. त्यामुळे बंगळुरुसमोर चेन्नईचा बालेकिल्ला भेदण्याचं आव्हान आहे.