W,W,W,W,W..! क्रिकेट इतिहासात दुर्मिळ विक्रमाची नोंद, पाच चेंडूत पाच विकेट Watch Video

क्रिकेट इतिहासात अनेक दुर्मिळ विक्रमांची नोंद झाली आहे. असे काही विक्रम आहेत जे मोडणं अशक्यप्राय आहे. अशाच एका विक्रमाची नोंद टी20 क्रिकेटमध्ये झाली आहे. या फॉर्मेटमध्ये पहिल्यांदाच एका गोलंदाजाने पाच चेंडूत पाच विकेट घेतल्या आहेत.

W,W,W,W,W..! क्रिकेट इतिहासात दुर्मिळ विक्रमाची नोंद, पाच चेंडूत पाच विकेट Watch Video
W,W,W,W,W..! क्रिकेटच्या इतिहासात दुर्मिळ विक्रमाची नोंद, पाच चेंडूत पाच विकेट Watch Video
Image Credit source: GettyImages
| Updated on: Jul 11, 2025 | 6:32 PM

डब्लिनच्या सँडीमाउंट येथील पेम्ब्रोक क्रिकेट क्लब येथे मुन्स्टर रेड्स आणि नॉर्थ वेस्ट वॉरियर्स यांच्यात सामना पार पडला. आयर्लंडच्या देशांतर्गत क्रिकेट टी20 ट्रॉफी सामन्यात कॅम्परने पाच चेंडूत पाच बळी घेऊन इतिहास रचला. टी20 फॉरमॅटच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या गोलंदाजाने अशी कामगिरी केली आहे. या सामन्यात कॅम्पर मुन्स्टर रेड्सकडून खेळत असून कर्णधार आहे. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर त्याने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यावेळी त्याने फलंदाजी करताना 24 चेंडूत 44 धावा केल्या. त्याच्या या खेळीमुळे मुन्स्टचर रेड्स्ला 188 धावांचा पल्ला गाठता आला. या धावांचा पाठलाग करण्यासाठी नॉर्थ वेस्ट वॉरियर्स मैदानात उतरले होते. 12 षटक सुरू झाल्यानंतर नॉर्थ वेस्ट वॉरियर्सच्या 87 धावा झाल्या होत्या. हे षटक टाकण्यासाठी कर्टिस कॅम्पर मैदानात आला होता. तेव्हा कर्णधार अँडी मॅकब्राइन आणि जारेड विल्सन हे फलंदाजी करत होते.

12 षटकाच्या पाचव्या चेंडूवर कॅम्परने जारेड विल्सनची विकेट काढली. त्याला क्लिन बोल्ड केलं. त्यानंतर या षटकाचा शेवटचा चेंडू खेळण्यासाठी ग्राहम ह्यूम मैदानात आला. त्याला पहिल्याच चेंडूवर पायचीत करून तंबूत पाठवलं. 12 षटकात चमत्कार केल्याने कॅम्पर पुन्हा एकदा 14वं षटक टाकण्यासाठी आला. त्याने पहिल्याच चेंडूवर अँडी मॅकब्राइनची विकेट काढली. तो 26 चेंडूत 29 धावा करून तंबूत परतला. त्याची विकेट काढल्यानंतर हॅटट्रीक पूर्ण झाली. त्यानंतर रॉबी मिलर फलंदाजीसाठी आला. त्याला पहिल्या चेंडूवर तंबूच्या दिशेना चालता केला. या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर जोश विल्सनला क्लिन बोल्ड केलं आणि पाच चेंडूत पाच विकेट घेण्याचा दुर्मिळ विक्रम रचला.

पाच चेंडूत पाच विकेट घेत कॅम्परने क्रिकेट इतिहासात आपलं नाव नोंदवलं आहे. मेन्स टी20 क्रिकेट इतिहासात अद्याप कोणत्याही स्तरावर पाच चेंडूत पाच विकेट घेण्याची किमया केली गेली नाही. त्यामुळे अशी कामगिरी करण्याची ही पहिलीच वेळ आहे. कॅम्परने 202 षटकात 16 धावा देत 5 गडी बाद केले. यासाठी त्याला सामनावीराच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. कॅम्परने यापूर्वी आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये चार चेंडूत चार विकेट घेतल्या होत्या. 2021 मध्ये आबूधाबी येथे झालेल्या टी20 वर्ल्डकप स्पर्धेत त्याने ही किमया साधली होती.