Icc World Cup 2023 आधी Dasun Shanka कॅप्टन्सी सोडणार?

Icc World Cup 2023 Sri Lanka Dasun Shanaka | दासून शनाका याची आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 आधी श्रीलंका टीमच्या कर्णधारपदावरुन हकालपट्टी? जाणून घ्या.

Icc World Cup 2023 आधी Dasun Shanka कॅप्टन्सी सोडणार?
| Updated on: Sep 20, 2023 | 8:25 PM

कोलंबो | आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 स्पर्धेला मोजून 14 दिवस बाकी आहेत. सर्व संघ जोरात तयारी करत आहेत. एका ट्रॉफीसाठी तब्बल 10 संघ भिडणार आहे. या स्पर्धेत एकूण 45 दिवसात 48 सामने पार पडणार आहे. त्यासाठी देशातील विविध 10 शहरांमध्ये सामन्याचं आयोजन करण्यात आलंय. वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया, न्यूझीलंड, इंग्लंड, नेदरलँड, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तानने टीम जाहीर केलीय. तर बांगलादेश पाकिस्तान आणि श्रीलंकाने टीम जाहीर केलेली नाही.

त्याआधी श्रीलंका क्रिकेट टीमच्या गोटातून मोठी बातमी समोर आली आहे. वर्ल्ड कपआधी दासुन शनाका याची कर्णधारपदावरून उचलबांगडी होणार असल्याची चर्चा होती. इतकंच नाही, तर मीडिया रिपोट्सनुसार, शनाकाला कॅप्टन्सी सोडावी लागणार असल्याचा दावा करण्यात आला. मात्र आता या प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. शनाका वर्ल्ड कपमध्ये आता नेतृत्व करणार की नव्या खेळाडूकडे सूत्रं जाणार हे आपण जाणून घेऊयात.

मिळलेल्या माहितीनुसार, दासून शनाका हाच वर्ल्ड कपमध्ये श्रीलंका टीमचं नेतृत्व करेल. श्रीलंका क्रिकेट बोर्डाने शनाकावर विश्वास दाखवला आहे. दासून शनाका याच्या नेतृत्वात श्रीलंका टीमने दिग्गजांच्या गैरहजेरीत आशिया कप फायनलपर्यंत धडक मारली. मात्र टीम इंडियासमोर अंतिम सामन्यात श्रीलंकेने गुडघे टेकले. टीम इंडियाने श्रीलंकेवर 10 विकेट्सने विजय मिळवला. त्यामुळे शनाकाची कर्णधारपदावरुन हकालपट्टी होणार असल्याचं म्हटलं जात होतं.

दासून शनाका हाच कॅप्टन


दासून शनाका याला हटवून त्याजागी वर्ल्ड कपसाठी धनंजय डी सिल्वा याला कर्णधार करणार असल्याचं म्हटलं जात होतं. मात्र तसं काही झालेलं नाही. श्रीलंका टीम मॅनेजमेंटने दासूनवर विश्वास दाखवलेला आहे.

दरम्यान वर्ल्ड कपला 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. पहिला सामना हा इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात होणार आहे. तर श्रीलंका क्रिकेट टीम वर्ल्ड कपमधील आपला पहिला सामना हा 7 ऑक्टोबर रोजी दक्षिण आफ्रिका विरुद्ध खेळणार आहे. या सामन्याचं आयोजन हे राजधानी दिल्लीत करण्यात आलं आहे.