AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

DC vs KKR Live Score, IPL 2021 : दिल्लीची कडवी झुंज अपयशी, केकेआरचा 3 गडी राखून विजय

| Edited By: | Updated on: Sep 28, 2021 | 8:48 PM
Share

शारजाह येथील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर आज आयपीएल 2021 मधील 41 वा सामना खेळवला जात आहे. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स हे दोन संघ भिडतील.

DC vs KKR Live Score, IPL 2021 : दिल्लीची कडवी झुंज अपयशी, केकेआरचा 3 गडी राखून विजय
केकेआर संघाची उत्कृष्ट गोलंदाजी

आयपीएल 2021 मध्ये आज कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात एक महत्त्वाचा सामना खेळवला जात आहे. कोलकाता नाइट रायडर्सचा कर्णधार इऑन मॉर्गनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्याच्या निकालाचा गुणतालिकेवर परिणाम होईल. दिल्ली कॅपिटल्सला पराभूत करुन प्लेऑफच्या दिशेन पाऊल टाकण्याचा निर्धार मॉर्गनच्या संघाने केलेला असणार. केकेआरचा संघ गुणांच्या बाबतीत तीन संघांच्या बरोबरीचा आहे. त्यामुळे पंजाब, मुंबई आणि राजस्थानला मागे टाकण्यासाठी कोलकात्याला आजचा सामना जिंकणं आवश्यक आहे. दरम्यान सामन्यात नाणेफेक जिंकत केकेआरने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. हा निर्णय अगदी बरोबर ठरवत दिल्लीला अवघ्या 127 धावांमध्ये केकेआरने रोखले. ज्यानंतर 128 धावांचे आव्हान केकेआरने सहज पेलत विजय मिळवला. यावेळी शुभमनने (30) उत्तम सुरुवात केली. पण नितिश राणाने शेवटपर्यंत क्रिजवर टिकून नाबाद 36 धावा करत संघाचा विजय पक्का केला.

LIVE Cricket Score & Updates

The liveblog has ended.
  • 28 Sep 2021 07:10 PM (IST)

    केकेआरचा 3 विकेट्सनी विजय

    19 व्या षटकात विजयासाठी दोन धावांची गरज असताना नितीश राणाने चौकार लगावत संघाला तीन विकेट्सनी विजय मिळवून दिला आहे.

  • 28 Sep 2021 07:07 PM (IST)

    विजयासाठी दोन धावांची गरज, टीम साऊदी बाद

    केकेआरला दोन धावांची गरज असताना टीम साऊदी बाद झाला आहे. आवेश खानने त्याला बोल्ड केलं आहे. आता केकेआरला 12 चेंडूत 2 धावांची गरज आहे.

  • 28 Sep 2021 07:01 PM (IST)

    सुनील नारायण बाद

    विजयासाठी अवघ्या 6 धावंची गरज असताना केकेआरची सहावी विकेट पडली आहे. नारायणला नॉर्खियाने अक्षरच्या हाती झेलबाद केलं आहे.

  • 28 Sep 2021 06:53 PM (IST)

    रबाडाची महागडी ओव्हर

    केकेआरला 30 चेंडूत 30 धावांची गरज असताना सुनील नारायणने रबाडाच्या ओव्हरमध्ये धमाकेदार फलंदाजी करत 21 धावा ठोकल्या. आता केकेआरला 24 चेंंडूत 9 धावांची गरज आहे.

  • 28 Sep 2021 06:48 PM (IST)

    दिनेश कार्तिक आऊट

    केकेआरचा माजी कर्णधार दिनेश कार्तिक नितीश राणासोबत संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जात असताना आवेश खानने त्याला बाद केलं आहे. आता केकेआरला 30 चेंडूत 30 धावांची गरज आहे.

  • 28 Sep 2021 06:29 PM (IST)

    मॉर्गन शून्य धावांवर बाद

    केकेआरचा कर्णधार इयॉन मॉर्गन याने पुन्हा आज संघाच्या पदरी निराशा पाडली आहे. तो शून्यावर बाद झाला असून आश्विनच्या चेंडूवर ललितने त्याचा झेल पकडला आहे.

  • 28 Sep 2021 06:28 PM (IST)

    शुभमन गिल बाद

    केकेआरचा डाव एकहाती पुढे नेणारा शुभमन गिल बाद झाला आहे. त्यामुळे राणा आणि गिल यांच्यातील भागिदारीही तुटली आहे. रबाडाने त्याची विकेट घेतली आहे.

  • 28 Sep 2021 06:04 PM (IST)

    आवेशने घेतली राहुलची विकेट

    मागील काही सामने उत्कृष्ट फलंदाजी केलेला राहुल त्रिपाठी आज मात्र 9 धावा करुन बाद झाला आहे. आवेश खानच्या चेंडूवर स्टीव स्मिथने त्याचा झेल घेतला आहे.

  • 28 Sep 2021 05:58 PM (IST)

    सलामीवीर व्यंकटेश अय्यर बाद

    केकेआर संघाची पहिली विकेट पडली आहे. ललित यादवच्या चेंडूवर केकेआरचा सलीमीवीर व्यंकटेश अय्यर त्रिफळाचीत झाला आहे.

  • 28 Sep 2021 05:39 PM (IST)

    128 धावा करण्यासाठी केकेआर मैदानात

    128 धावांचे आव्हान पूर्ण करण्यासाठी केकेआरचे सलामीवर शुभमन गिल आणि व्यंकटेश अय्यर मैदानात आले आहेत.

  • 28 Sep 2021 05:30 PM (IST)

    दिल्लीची 127 धावांपर्यत मजल

    अखेरच्या षटकात पंत, आश्विन आणि आवेश खान यांची विकेट गेल्यानंतर दिल्ली केवळ 127 धावाच स्कोरबोर्डवर लावू शकली आहे. त्यामुळे केकेआरला विजयासाठी 128 धावांचे सोपे आव्हान आहे.

  • 28 Sep 2021 04:55 PM (IST)

    दिल्लीचा सहावा फलंदाज माघारी, अक्षर पटेल शून्यावर बाद

    वेंकटेश अय्यरने दिल्लीला आणखी एक धक्का दिला आहे. त्याने अक्षर पटेलला लोकी फर्ग्युसनकरवी झेलबाद केलं. (दिल्ली 92/6)

  • 28 Sep 2021 04:49 PM (IST)

    89 धावांत दिल्लीचा अर्धा संघ तंबूत, ललित यादव शून्यावर बाद

    89 धावांत दिल्लीचा अर्धा संघ तंबूत परतला आहे. सुनील नारायणने ललित यादवला खातं उघडण्यापूर्वीच पायचित करुन माघारी धाडलं.

  • 28 Sep 2021 04:43 PM (IST)

    दिल्लीला चौथा झटका, हेटमायर 4 धावांवर बाद

    दिल्लीच्या संघाने चौथी विकेट गमावली आहे. वेंकटेश अय्यरने शिम्रन हेटमायरला 4 धावांवर असताना टीम साऊथीकरवी झेलबाद केलं. (दिल्ली 88/4)

  • 28 Sep 2021 04:36 PM (IST)

    दिल्लीला तिसरा झटका, स्टीव्ह स्मिथ 39 धावांवर बाद

    स्टीव्ह स्मिथच्या रुपाने दिल्लीने आपली तिसरी विकेट गमावली आहे. लोकी फर्ग्युसनने त्याला त्रिफळाचित केलं. (दिल्ली 77/3)

  • 28 Sep 2021 04:19 PM (IST)

    9 षटकात दिल्लीचं अर्धशतक

    शिखर धवन आणि श्रेयस अय्यरची विकेट लवकर गमावल्याने दिल्लीचा संघ थोडा दबावात आहे. त्यामुळे हा संघ सुरुवातीच्या 9 षटकांमध्ये केवळ 52 धावा जमवू शकला. स्टीव्ह स्मिथ (22) आणि कर्णधार रिषभ पंत (4) धावांवर खेळत आहेत.

  • 28 Sep 2021 04:04 PM (IST)

    दिल्लीला दुसरा झटका, श्रेयस अय्यर बाद

    दिल्लीने दुसरी विकेट गमावली आहे. सुनील नारायणने श्रेयस अय्यरला (1) त्रिफळाचित केलं. (दिल्ली 40/1)

  • 28 Sep 2021 03:58 PM (IST)

    दिल्लीला पहिला झटका, शिखर धवन 24 धावांवर बाद

    दिल्लीने पहिली विकेट गमावली आहे. लोकी फर्ग्युसनने शिखर धवनला 24 धावांवर असताना वेंकटेश अय्यरकरवी झेलबाद केलं. (दिल्ली 35/1)

  • 28 Sep 2021 03:44 PM (IST)

    शिखरचे सलग दोन चौकार

    तिसऱ्या षटकात शिखर धवनने संदीप वॉरियच्या गोलंदाजीवर हल्ला चढवला, दुसऱ्या आणि तिसऱ्या चेंडूवर दोन खणखणीत चौकार वसूल करत धमाकेदार सुरुवात केली. (दिल्ली 22/0)

  • 28 Sep 2021 03:31 PM (IST)

    दिल्लीच्या डावाला सुरुवात, पृथ्वी शॉ ऐवजी स्टीव्ह स्मिथला संधी

    दिल्लीच्या डावाला सुरुवात झाली आहे. सलामीवीर मैदानात दाखल. दिल्लीने या सामन्यात पृथ्वी शॉ ऐवजी स्टीव्ह स्मिथला संधी दिली आहे.

  • 28 Sep 2021 03:17 PM (IST)

    नाणेफेक जिंकून कोलकात्याचा प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय

    कोलकाता नाइट रायडर्सचा कर्णधार इऑन मॉर्गनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

Published On - Sep 28,2021 3:15 PM

Follow Us
आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू
Aasam Flood | आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू, लाखो नागरिक संकटात
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने दिली थेट अपडेट
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक..
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक काय घडलं?
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू...
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? केंद्रात.... लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू यांच्या बैठीत नेमकं काय ठरलं?
शरद पवारांची पंतप्रधान मोदी यांच्या सोबत बंद दाराआड बैठक; चर्चा काय?
मोठी बातमी! शरद पवारांची पंतप्रधान मोदी यांच्या सोबत बंद दाराआड बैठक; चर्चा काय?
लेकरांपेक्षा पक्षावर प्रेम? मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल
Manoj Jarange Patil | लेकरांपेक्षा पक्षावर प्रेम? दिल्लीला रवाना होताच मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांवर कडाडून हल्लाबोल
लोक म्हणतायत इंग्रज बरे होते! सरकारवर उद्धव ठाकरेंचा घणाघात
Uddhav Thackeray | लोक म्हणतायत इंग्रज बरे होते! ही लोकशाही नाही, हुकूमशाही... सरकारवर उद्धव ठाकरेंचा घणाघात
कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची...
Kalyan | कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची एकाच गेटवर झुंबड
दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
Sunetra Pawar | तुमचा वाढदिवस आता जयंती म्हणून साजरा करताना मन तुटतंय... दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
Mumbai Rain Update | मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही… मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा...

तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही… मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा..

Manoj jaragne patil : जंतर मंतर सोडू नका, वेळ पडली तर मराठा बांधव दिल्लीत येणार, मनोज जरांगेंची घोषणा.

Manoj jaragne patil : जंतर मंतर सोडू नका, वेळ पडली तर मराठा बांधव दिल्लीत येणार, मनोज जरांगेंची घोषणा

मोठी बातमी! ठाकरेंच्या 6 बंडखोर खासदारांना झटका, थेट सुप्रीम कोर्टाची नोटीस.

मोठी बातमी! ठाकरेंच्या 6 बंडखोर खासदारांना झटका, थेट सुप्रीम कोर्टाची नोटीस

Delhi Metro: मोठी बातमी! दिल्लीतील 16 मेट्रो स्टेशन बंद, पुढील आदेशापर्यंत मेट्रोला ब्रेक; बंदोबस्तही वाढला.

Delhi Metro: मोठी बातमी! दिल्लीतील 16 मेट्रो स्टेशन बंद, पुढील आदेशापर्यंत मेट्रोला ब्रेक; बंदोबस्तही वाढला

IND vs ZIM: मॅचच्या 24 तासआधी झिम्बाब्वेने भारतीय संघाला दिलं ओपन चॅलेंज, अचानक मोठा निर्णय घेतला.

IND vs ZIM: मॅचच्या 24 तासआधी झिम्बाब्वेने भारतीय संघाला दिलं ओपन चॅलेंज, अचानक मोठा निर्णय घेतला

मिळेल ते खाल्लं, जागा दिसेल तिथे झोपले, रात्रीपासून पहाटे पर्यंत काय काय घडलं? जंतरमंतरवरचा विशेष Ground Report.

मिळेल ते खाल्लं, जागा दिसेल तिथे झोपले, रात्रीपासून पहाटे पर्यंत काय काय घडलं? जंतरमंतरवरचा विशेष Ground Report