टीम इंडियाच्या एका खेळाडूमुळे बीसीसीआयचं लाखो रुपयांचं नुकसान, खर्च पाहून घेतला कठोर निर्णय

बीसीसीआयने मागच्या काही महिन्यात कठोर निर्णय घेतले आहेत. त्यामुळे दिग्गज खेळाडूही देशांतर्गत क्रिकेट खेळत आहेत. दुसरीकडे, लगेजबाबतही बीसीसीआयने कठोर पाऊल उचललं आहे. खेळाडूंना आता 150 किलोपेक्षा जास्त सामान घेऊन जाण्याची परवानगी नाही. बीसीसीआयने असा निर्णय घेण्यामागे कारण आहे.

टीम इंडियाच्या एका खेळाडूमुळे बीसीसीआयचं लाखो रुपयांचं नुकसान, खर्च पाहून घेतला कठोर निर्णय
Image Credit source: PTI
| Updated on: Feb 14, 2025 | 4:00 PM

टीम इंडियाने ऑस्ट्रेलिया दौऱ्यात निराशाजनक कामगिरी केली होती. कसोटी मालिका 3-1 ने गमावल्याने भारताचं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचं स्वप्नही भंगलं होतं. टीम इंडियाच्या अशा कामगिरीनंतर बीसीसीआयने कठोर पावलं उचलली होती. खेळाडूंसाठी 10 कडक नियम आखून दिले आहेत. त्याचं प्रभाव नुकताच दिसून आला होता. आता भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी दुबईला रवाना होणार आहे. मात्र या दौऱ्यात बरंच काही बदलले दिसणार आहे. कारण ऑस्ट्रेलियानंतर भारताचा हा पहिला विदेश दौऱा आहे. रिपोर्टनुसार, यावेळी खेळाडूंना आपल्या कुटुंबासोबत जाता येणार नाही. बीसीसीआयने हवाई प्रवासासाठीही लगेजशी निगडीत एक नियम तयार केला आहे. पण लगेजशी निगडीत नियम बनवण्याची का गरज भासली? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. याबाबत आता एक खुलासा समोर आला आहे. नियमानुसार, कोणत्याही खेळाडूला 150 किलोपेक्षा जास्त सामान घेऊन जाता येणार नाही. जर अतिरिक्त वजन असल्यास त्याचे पैसे खेळाडूंना भरावे लागतील. यापूर्वी बीसीसीआये खेळाडूंचे पैसे भरत होती. पण आता तसं काही होणार नाही.

मिडिया रिपोर्टनुसार, टीम इंडियाचा एक खेळाडू ऑस्ट्रेलिया दौऱ्यात 27 बॅग आणि ट्रॉली बॅग घेऊन गेला होता. यात क्रिकेटरसह त्याचा खासगी स्टाफ आणि कुटुंबाच्या बॅग होत्या. या खेळाडूच्या लगेजचं वजन 250 किलोच्या आसपास होतं. इतकंच काय तर ऑस्ट्रेलियातही हा खेळाडू हे लगेज घेऊन प्रवासात फिरला होता. त्यामुळे या दौऱ्यातील खेळाडूच्या लगेजचा संपूर्ण खर्च बीसीसीआयला भरावा लागला होता. त्याचं बिल लाखोंच्या घरात होतं. रिपोर्टमधील दाव्यानुसार, या खेळाडूमुळेच बीसीसीआयने हा नियम लागू केला. कारण इतर खेळाडूही त्याचं अनुकरण करत होते.

चॅम्पियन्स ट्रॉफीदरम्यात कोणताही खेळाडू आात पर्सनल स्टाफ घेऊन जाणार नाही. जसं की, शेफ, पर्सनल मॅनेजर, ट्रेनर, सेक्रेटरी किंवा कोणत्याही असिस्टंटला घेऊन जाता येणार नाही. खेळाडूंना सरावादरम्यान एकत्र राहावं लागणार आहे. तसेच ठरलेल्या ठिकाणी एकत्र प्रवास करावा लागणार आहे. इंग्लंड मालिकेतही असंच काहीसं पाहायला मिळालं होतं. या मालिकेदरम्यान सर्वच खेळाडू एकत्र बसमधून प्रवास करत होते. त्यामुळे खेळाडूंमध्ये चांगली बॉण्डिंग होती, असंही सांगितलं जात आहे.