
आयपीएलच्या दहाव्या सामन्यात अक्षर पटेलच्या नेतृत्वाखालील दिल्ली कॅपिटल्सने बलाढ्य समजल्या जाणाऱ्या सनरायझर्स हैदराबादचा 7 धावांनी धुव्वा उडवला. सनरायझर्स हैदराबादने हंगामाची सुरुवात विजयाने केली. पण ऑरेंज आर्मीला उप्पलमध्ये लखनौ सुपर जायंट्सकडून पराभव पत्करावा लागला होता. आता दिल्ली कॅपिटल्सकडून पराभव झाला आहे. तर दिल्ली कॅपिटल्सने सलग दुसऱ्या सामन्यात विजय मिळवला आहे. तसेच गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे.
दिल्ली कॅपिटल्सने सनरायझर्स हैदराबादला 7 गडी राखून पराभूत केलं. यासह स्पर्धेतील सलग दुसरा विजय मिळवला आहे. हैदराबादने विजयासाठी 164 धावांचं आव्हान दिलं होतं. हे दिल्ली कॅपिटल्सने आव्हान 7 गडी राखून पूर्ण केलं. या सामन्यात विजयाचा शिल्पकार ठरला तो मिचेल स्टार्क.. त्याने 35 धावा देत 5 गडी बाद केले.
जीशान अन्सारीने पहिल्या सामन्यात कमाल केली आहे. दिल्लीच्या तीन दिग्गज फलंदाजांना तंबूत पाठवलं आहे. केएल राहुल बाद करत तिसरी विकेट घेतली. केएल राहुल 15 धावा करून बाद झाला.
जीशान अन्सारीने आपल्या फिरकीत दिल्ली कॅपिटल्सच्या दोन फलंदाजांना गुंतवलं. फाफ डुप्लेसिला बाद केल्यानंतर फ्रेजरला बाद केलं.
दिल्ली कॅपिटल्सला फाफ डु प्लेसिसच्या रुपाने पहिला धक्का बसला आहे. फाफने अर्धशतक ठोकल्यानंतर आक्रमक अंदाज दाखवला. पण विकेट देऊन बसला.
दिल्ली कॅपिटल्सचा उपकर्णधार फाफ डु प्लेसिसने अर्धशतक ठोकलं. 163 धावांचा पाठलाग करताना 26 चेंडूत 50 धावा ठोकल्या.
पॉवर प्लेमध्ये दिल्ली कॅपिटल्सने बिनबाद 52 धावा केल्या. फ्रेजर आणि डुप्लेसिस जोडी जमली असून हैदराबादचे गोलंदाज विकेटसाठी आतुर आहेत.
सनरायझर्स हैदराबाद संघ सर्व गडी गमवून 163 धावांपर्यंत मजल मारू शकला. मिचेल स्टार्कने हैदराबादचं कंबरडं मोडलं आणि पाच विकेट घेतल्या. तर कुलदीप यादवने तीन गडी बाद केले. दिल्ली कॅपिटल्ससमोर विजयासाठी आता 164 धावांचं आव्हान आहे.
मिचेल स्टार्कच्या भेदक गोलंदाजीपुढे हैदराबादचा संघ बॅकफूटला गेला आहे. पॉवर प्लेमध्ये तीन विकेट घेतल्या. त्यानंतर डेथ ओव्हरमध्ये आणखी एका विकेटची भर पडली आहे.
सनरायझर्स हैदराबादला अनिकेत वर्माच्या रुपाने आठवा धक्का बसला. त्याने 74 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली.
पॅट कमिन्सची विकेट काढण्यात कुलदीप यादवला यश आलं आहे. पॅटने 7 चेंडूत फक्त 2 धावा केल्या आणि बाद झाला.
सनरायझर्स हैदराबादचा फलंदाजीची दहशत संपली. सहावा गडी तंबूत गेल्याने दिल्ली कॅपिटल्स मजबूत स्थितीत आहे.
सनरायझर्स हैदराबादला पाचवा धक्का बसला असून हेनरिक क्लासेन तंबूत परतला. त्याने आपल्या खेळीतून 32 धावांचं योगदान दिलं.
हैदराबादचे आघाडीचे चार फलंदाज झटपट बाद झाल्यानंतर अनिकेत वर्मा आणि हेनरिक क्लासेन यांनी डाव सावरला. पाचव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली.
पॉवर प्लेमध्ये मिचेल स्टार्कने सनरायझर्स हैदराबादचं कंबरडं मोडलं. अभिषेक शर्मा रनआऊट झाला. तर इतर तिघांना मिचेल स्टार्कने बाद केलं. पॉवर प्लेमध्ये 58 धावांवर 4 गडी बाद झाले.
ट्रेव्हिस हेडच्या रुपाने सनरायझर्स हैदराबादला चौथा धक्का बसला आहे. मिचेल स्टार्कने तिसरी विकेट काढली. ट्रेव्हिस हेड 22 धावा करून तंबूत परतला आहे.
इशान किशनची विकेट गेल्यानंतर नितीश रेड्डीकडून फार अपेक्षा होत्या. मात्र त्याला खातंही खोलता आलं नाही. मिचेल स्टार्कने त्याला चालतं केलं.
मिचेल स्टार्कच्या गोलंदाजीवर इशान किशन चुकी करून बसला. ऑफ साईडला बाहेर टाकलेल्या चेंडूवर फसला आणि स्टब्सच्या हाती झेल देऊन बाद झाला.
सनरायझर्स हैदराबादला अभिषेक शर्माच्या रुपाने पहिला धक्का बसला आहे. ट्रेव्हिस हेड चोरटी धाव घेताना संवाद चुकला आणि अभिषेक शर्माची विकेट गेली. विपराज निगमने डायरेक्ट चेंडू स्टम्पवर मारला आणि त्याला तंबूत पाठवला.
साध्वी प्रज्ञासिंह यांची प्रकृती ठीक नसल्याने त्यांचा दौरा रद्द झाल्याची माहिती दिली जात आहे.मालेगावातील संत संमेलनाला साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर उपस्थित राहणार होत्या. २००८ च्या मालेगाव बॉम्ब स्फोटातील साध्वी प्रज्ञासिंह प्रमुख आरोपी आहेत. रमजानचा महिना सुरू असल्याने मुस्लिम संघटनांनी साध्वी प्रज्ञासिंह यांच्या दौऱ्याला विरोध केला होता.
दिल्ली कॅपिटल्स (प्लेइंग इलेव्हन): जेक फ्रेझर-मॅकगर्क, फाफ डू प्लेसिस, अभिषेक पोरेल (विकेटकीपर), केएल राहुल, अक्षर पटेल (कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, विप्रज निगम, मिचेल स्टार्क, कुलदीप यादव, मोहित शर्मा, मुकेश कुमार.
सनरायझर्स हैदराबाद (प्लेइंग इलेव्हन): ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, इशान किशन, नितीश कुमार रेड्डी, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अनिकेत वर्मा, अभिनव मनोहर, पॅट कमिन्स (कर्णधार), झीशान अन्सारी, हर्षल पटेल, मोहम्मद शमी
पॅट कमिन्सने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम फलंदाजी स्वीकारली आहे. तर नाणेफेक जिंकलो असतो तर प्रथम फलंदाजीच केली असती असं अक्षर पटेल याने सांगितलं. तसचे कमी धावांवर रोखण्याचा प्रयत्न करू असं अक्षर पटेल म्हणाला.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांची आज गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर, मुंबईतील शिवाजी पार्कमध्ये सभा आयोजित केली आहे. त्यासाठी शंभर ते दीडशे गाड्यांच्या ताफ्यात हजारो मनसैनिक मुंबईकडे रवाना झाले आहेत. मनसेच्या पाडव्या मेळाव्याचा इगतपुरी तालुक्यातील मनसैनिकांमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे. राज ठाकरे काय बोलणार याची मनसैनिकांमध्ये उत्सुकता पाहायला मिळत आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांची आज गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर, मुंबईतील शिवाजी पार्कमध्ये सभा आयोजित केली आहे. ही सभा संध्याकाळी ५ ते १० या वेळेत होणार आहेत. या सभेला महाराष्ट्रातील कोनाकोपऱ्यातून मनसैनिक हजेरी लावतात. त्यामुळे शिवाजी पार्क परिसरात वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी यासाठी प्रशासनाने रॅलीदरम्यान वाहतूक वळविण्याच्या सूचना दिल्या आहेत. विशेषत: माहीम कॉजवे ते शिवाजी पार्क हा मार्ग दुपारी 1 नंतर वळवण्यात आला आहे. त्याचप्रमाणे तुळशी पाईप रोड, दादर कबुतरखानाकडून येणाऱ्या मार्गावरही दिशा बदलण्यात आली आहे.
दोन्ही संघात एकूण २४ सामने झाले असून दिल्ली कॅपिटल्सने ११ सामन्यात विजय मिळवला आहे. तर सनरायझर्स हैदराबादने १३ सामन्यात दिल्लीला लोळवलं आहे.२०२१ पासून या संघात एकूण ६ सामने झाले. यात दिल्लीने ४, तर हैदराबादने २ सामने जिंकले आहेत. विशाखापट्टणम येथे दोन्ही संघ दोनवेळा आमनेसामने आले आहेत. दोन्ही सामन्यात दिल्लीने विजय मिळवला आहे.
दिल्ली कॅपिटल्स: जेक फ्रेझर-मॅकगर्क, फाफ डू प्लेसिस, अभिषेक पोरेल, केएल राहुल, अक्षर पटेल, ट्रिस्टन स्टब्स, आशुतोष शर्मा, विप्रज निगम, मिचेल स्टार्क, कुलदीप यादव, मोहित शर्मा, मुकेश कुमार
सनरायझर्स हैदराबाद : ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, इशान किशन, नितीश रेड्डी, हेनरिक क्लासेन, अनिकेत वर्मा, अभिनव मनोहर, पॅट कमिन्स, हर्षल पटेल, मोहम्मद शमी, सिमरजीत सिंग, ॲडम झम्पा
दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील सामन्याचा टॉस भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजता होईल. दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 3.30 वाजता सुरू होईल.