विराटच्या मुलीला धमकावणारा होणार गजाआड, दिल्ली पोलिसांनी कसली कंबर

| Updated on: Nov 02, 2021 | 9:10 PM

पाकिस्तानविरुद्ध पराभवानंतर मोहम्मद शमीवर अनेक चूकीच्या टीका करण्यात आल्या. यावेळी कर्णधार विराट त्याच्या पाठिशी खंबीरपणे उभा राहिला. ज्यानंतर विराटच्या अवघ्या 10 महिन्याच्या चिमुरडीवर अत्याचार करण्याच्या धमक्या विराटला मिळाल्याचा धक्कादायक आणि अत्यंत किळसवाणा प्रकार समोर आला आहे.

विराटच्या मुलीला धमकावणारा होणार गजाआड, दिल्ली पोलिसांनी कसली कंबर
विराटचं कुटुंब
Follow us on

मुंबई: टी20 विश्वचषकात (T20 World Cup) भारतीय संघाला कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध पराभवानंतर अनेक टीका सहन कराव्या लागल्या. गोलंदाज मोहम्मद शमीवर त्याच्या धर्मावरुन चूकीच्या टीका झाल्यानंतर कर्णधार म्हणून विराट त्याच्या पाठिशी उभा राहिला. पण त्यांनंतर अज्ञाक माथेफिरुने विराटच्या अवघ्या 10 महिन्यांच्या चिमुरडीला बलात्काराच्या धमक्या दिल्या असल्याचा लज्जास्पद प्रकार समोर आला आहे. यावर कडक कारवाई करण्यासाठी दिल्ली महिला आयोगाने (DCW) मंगळवारी दिल्ली पोलिसांना नोटिस पाठवली असून दिल्ली महिला आयोगाने थेट पोलिस उपायुक्त (सायबर सेल)  यांच्याशी संपर्क साधला आहे. यानंतर दिल्ली पोलिसांनीही वेगात कारवाई सुरु केली आहे.

नोटिशीमध्ये लिहिल्याप्रमाणे टी20 विश्वचषकात पाकविरुद्ध पराभवानंतर कर्णधार विराट कोहलीच्या मुलीवर बलात्कारा करण्याची धमकी अज्ञात व्यक्तीने ऑनलाइन दिली आहे. याबद्दल आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल म्हणाल्या,’मोहम्मद शमीला त्याच्या धर्मावरुन ट्रोल केलं असता त्याच्या समर्थनार्थ आलेल्या कोहलीला आणि कुटुंबाला अशा धमक्या मिळणं धक्कादायक आहे. यावर त्वरीत आणि कठोर कारवाई होणं गरजेचं आहे.’ दरम्यान एका वरिष्ठ दिल्ली पोलिस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार याप्रकाराबद्दल आम्हाला कोणती तक्रार आलेली नाही. पण आयोगाने दिलेल्या नोटिशीनुसार आम्ही तपास सुरु केला आहे. संबधित ट्विटर हँडलचा शोध सुरु आहे.

का झाली होती शमीवर टीका?

टी-20 विश्वचषकात भारताचा पाकिस्तानकडून 10 गडी राखून पराभव झाला. टी20 विश्वचषकाच्या इतिहासात पाकिस्तानने पहिल्यांदाच भारताचा पराभव केला होता. ज्यामुळे चाहत्यांचा राग सोशल मीडियाद्वारे खेळाडूंवर  उफाळून आला.  दरम्यान पाकिस्तानच्या हातून झालेल्या पराभवानंतर भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद शमीला टीकांचा धनी व्हावं लागलं होतं. कारण शमीने 3.5 षटकात 43 धावा दिल्या आणि एकही विकेट घेतली नाही. मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर पाकिस्तानच्या सलामीवीरांनी 6 चौकार, एक षटकार ठोकला. या खराब कामगिरीनंतर लोकांनी मोहम्मद शमीला सोशल मीडियावर ट्रोल केले आणि त्याच्यावर उलट-सुलट आरोप केले होते. ज्यानंतर सेहवागपासून विराटपर्यंत तसेच अनेक परदेशी क्रिकेटपटूही शमीच्या समर्थनार्थ उभे राहिले होते.

इतर बातम्या

India vs New zealand 2021: न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी विराट, रोहित नव्हे दुसऱ्याच खेळाडूकडे संघाची धुरा?

T20 World Cup 2021: अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात ‘राशिद’ नावाचा खतरा, दिग्गज भारतीय खेळाडूंनाही फुटतो घाम

T20 World Cup 2021: श्रीलंकेविरुद्ध विजयामुळे मॉर्गनने तोडला धोनीचा रेकॉर्ड, इंग्लंड सेमीफायनलमध्ये दाखल

(Delhi commission for Women issued notice to delhi police over online rape threats to the daughter of virat kohli)