रनमशिन विराट कोहलीच्या श्रीलंकेतील फ्लॉप शोवर दिनेश कार्तिकचं थेट मत, म्हणाला…

श्रीलंका दौऱ्यातील वनडे मालिकेत भारताला पराभवाची धूळ चाखावी लागली. श्रीलंकेने भारताला 2-0 ने पराभूत करत मालिका खिशात घातली. या मालिकेत विराट कोहली फेल ठरला. आता त्याच्या खेळीवर काही जणांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. दिनेश कार्तिकने नेमकं काय सांगितलं ते जाणून घ्या

रनमशिन विराट कोहलीच्या श्रीलंकेतील फ्लॉप शोवर दिनेश कार्तिकचं थेट मत, म्हणाला...
| Updated on: Aug 12, 2024 | 10:14 PM

दिग्गज खेळाडूंसह भारताचा श्रीलंका दौरा फेल ठरला. वनडे मालिकेतून कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली यांनी कमबॅक केलं होतं. पण या मालिकेत दिग्गज खेळाडूंचा भरणा असूनही पराभवाचं तोंड पाहावं लागलं. टी20 वर्ल्डकपनंतर दिग्गज खेळाडू मैदानात उतरल्याने क्रीडाप्रेमींना अपेक्षा होत्या. पण क्रीडाप्रेमींचा अपेक्षाभंग झाला. कोलंबाच्या प्रेमदासा स्टेडियममध्ये भारताच्या वाटेला पराभव आला. दरम्यान या तिन्ही सामन्यात विराट कोहलीचा फ्लॉप शो पाहायला मिळाला. तिन्ही सामन्यात विराट कोहली पायचीत झाला. पहिला वनडे सामना 2 ऑगस्ट खेळला गेला यात विराट कोहलीने 24 धावा केल्या. दुसरा वनडे सामना 4 ऑगस्टला खेळला गेला यात विराट 14 धावा करून बाद झाला. तिसरा वनडे सामना 7 ऑगस्टला खेळला गेला यात 20 धावा करून बाद झाला. जेव्हा विराट कोहलीकडून अपेक्षा तेव्हाच त्याने नांगी टाकल्याने क्रीडाप्रेमींनी संताप व्यक्त केला आहे. एकदिवसीय मालिकेत खेळल्या गेलेल्या तीन डावांमध्ये विराट कोहलीला 19.57 च्या सरासरीने केवळ 58 धावा करता आल्या. दरम्यान, माजी क्रिकेटपटू दिनेश कार्तिकला विराट कोहलीच्या फलंदाजी आणि एलबीडब्ल्यू आऊट होण्याबाबत प्रश्न विचारला गेला. तेव्हा त्याने सांगितलं की, विराट कोहलीला डिफेंड नाही करत, पण चिंतेचं काही कारण नाही.

दिनेश कार्तिकने सांगितलं की, ‘या मालिकेत फिरकीपटूंना खेळणं खूपच कठीण होतं. सर्वात पहिलं आपण ही बाब मान्य केली पाहीजे. मग तो विराट कोहली असो की रोहित शर्मी की आणखी कोणी.. 8 ते 30 षटकांच्या मध्ये सेमी न्यू बॉलचा सामना कठीण होतं. यात चिंता करण्याचं कोणतंच कारण नाही. बहुतांश खेळपट्ट्या अशा नसतात. पण फिरकीपटूंना खेळण्यासाठी एक कठीण खेळपट्टी होती. मी येथे विराट कोहलीचा बचाव करत नाही. पण मी एक गोष्ट सांगू शकतो की फिरकीपटूंना खेळणं कठीण होतं.’

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या दृष्टीने ही मालिका खूपच महत्त्वाची होती. कारण यानंतर थेट पुढच्या वर्षी टीम इंडिया वनडे मालिका खेळणार आहे. त्यामुळे खेळाडूंची चाचपणी करण्यापासून रणनिती आखण्यासाठी ही मालिका महत्त्वाची होती. आता टीम इंडिया थेट फेब्रुवारीमध्ये इंग्लंडविरुद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे. त्यानंतर थेट चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेत उतरणार आहे. कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वा टीम इंडिया खेळणार असल्याचं आधीच जाहीर केलं आहे.