Dinesh Karthik ला त्याच्याच टीमने केलेल्या 506 धावा, एका बॅट्समनची डबल सेंच्युरी पटली नाही?

Dinesh Karthik ने मग असं टि्वट का केलं?

Dinesh Karthik ला त्याच्याच टीमने केलेल्या 506 धावा, एका बॅट्समनची डबल सेंच्युरी पटली नाही?
Dinesh Karthik
Image Credit source: ANI
| Updated on: Nov 21, 2022 | 5:39 PM

चेन्नई: तामिळनाडूचा फलंदाज नारायण जगदीशनने सोमवारी एक नवीन वर्ल्ड रेकॉर्ड केला. त्याने सलग पाच शतकं झळकावली. कुठल्याही क्रिकेटरला अशी कामगिरी शक्य झालेली नाही. त्याने श्रीलंकेचा महान क्रिकेटपटू कुमार संगकाराला मागे टाकलं. 2015 वर्ल्ड कपध्य संगकाराने सलग चार शतकं झळकावली होती.

रन्सचा नवीन विक्रम

विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत तामिळनाडू विरुद्ध अरुणाचल प्रदेश सामन्यात जगदीशनने हा रेकॉर्ड केला. त्याने 141 चेंडूत 271 धावा फटकावल्या. सलामीला आलेल्या साई सुदर्शनने 102 चेंडूत 154 धावा फटकावल्या. तामिळनाडूने या मॅचमध्ये विशाल लक्ष्य उभारले. त्यांनी 50 ओव्हर्समध्ये 2 बाद 506 धावांचा डोंगर उभारला.

कार्तिकने कौतुक केलं, पण….

तामिळनाडूचा नियमित कॅप्टन दिनेश कार्तिक विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत खेळत नाहीय. या मॅचनंतर दिनेश कार्तिकने लागोपाठ टि्वट करुन वर्ल्ड रेकॉर्ड रचणाऱ्या जगदीशनला शुभेच्छा दिल्या. कार्तिकने कौतुक केलं. पण त्याचवेळी विजय हजारे ट्रॉफीच्या फॉर्मेटवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.

कार्तिकचे मुद्दे काय?

ईशान्येकडच्या राज्यातील टीम लीग स्टेजमध्ये बलाढ्य टीमविरुद्ध खेळणार असेल, तर त्याला अर्थ आहे का? असा कार्तिकचा मुद्दा आहे. या अशा मॅचेसमुळे टीम्सच्या रन रेटवर कसा परिणाम होतोय, सामने पावसामुळे रद्द झाले, तर काय होतं? ते कार्तिकने लक्षात आणून दिलय. या टीम्सना दुसऱ्या ग्रुपमध्ये ठेवता येणार नाही का? असा कार्तिकचा मुद्दा आहे.

ईशान्येकडच्या टीम्सची स्पर्धेतील कामगिरी काय?

विजय हजारे ट्रॉफीमध्ये राऊंड रॉबिन पद्धतीने सामने सुरु आहेत. एकूण 38 टीम्स आहेत. पाच एलिट ग्रुप्समध्ये त्यांची विभागणी करण्यात आलीय. प्रत्येक गुपमध्ये ईशान्येकडच्या राज्यातील एक टीम आहे. चालू स्पर्धेत ईशान्यकडच्या एकाही टीमला विजय मिळवता आलेला नाही. आपआपल्या ग्रुप्समध्ये या टीम्स तळाला आहेत. अरुणाचलची टीम ग्रुप सी मध्ये आहे. चार सामने ते खेळले. चारही मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला.