द्रविडनं दिली मोठी अपडेट, बुमराह टी-20 विश्वचषकात…

राहुल द्रविडनं बुमराहविषयी मोठी अपडेट दिली आहे. जाणून घ्या...

द्रविडनं दिली मोठी अपडेट, बुमराह टी-20 विश्वचषकात...
Jasprit Bumrah
Image Credit source: social
| Updated on: Oct 01, 2022 | 10:45 PM

नवी दिल्ली : जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू असलेल्या तीन सामन्यांच्या टी-20 (T20) मालिकेतून बाहेर पडला आणि यानंतर त्याची खरी चर्चा सुरु झाली. पाठदुखीच्या गंभीर समस्येमुळे तो एनसीएमध्ये गेलाय. याठिकाणी तो आता बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली आहे. बुमराह विश्वचषक संघासह ऑस्ट्रेलियाला जाणार का किंवा विश्वचषक स्पर्धेत भाग घेणार हे, अद्याप स्पष्ट झालेलं नाही.  बीसीसीआयकडून (BCCI) कोणतेही अधिकृत विधानंही करण्यात आलेलं नाही. पण, सध्या याविषयी चांगलीच चर्चा रंगली आहे.

 संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडनं जसप्रीत बुमराहवर मोठं विधान केलंय. जोपर्यंत बुमराह अधिकृतपणे वर्ल्डकपमधून बाहेर पडत नाही तोपर्यंत ऑस्ट्रेलियाला जाण्याच्या त्याच्या आशा आहेत, असं द्रविड म्हणतो.

यापूर्वी पण बुमराहवर भाष्य करण्यात आलं होतं. बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुलींनी सांगितलं होतं की, बुमराह अद्याप विश्वचषकातून बाहेर नाही, पुढे काय होते ते पाहू. बुमराह ऑस्ट्रेलियाला जाणार की नाही याचा निर्णय दोन-तीन दिवसांत घेतला जाऊ शकतो, असं गांगुले म्हणाले होते.

बुमराहनं ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या T20 मालिकेत दोन T20 खेळले पण दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतील पहिला सामना खेळण्यासाठी तो तिरुवनंतपुरमला गेला नाही. रवींद्र जडेजानंतर बुमराह हा दुसरा भारतीय खेळाडू आहे. याचं विश्वचषकात खेळणं कठीण जात आहे. जडेजा गुडघ्याच्या ऑपरेशनमधून बरा झाला आहे.

द्रविड पत्रकार परिषदेत म्हणाला की, ‘जोपर्यंत मला अधिकृत पुष्टी मिळत नाही तोपर्यंत तो T20 विश्वचषकातून बाहेर आहे, असंही द्रविड म्हणाला. ‘आत्तापर्यंत तो केवळ अधिकृतपणे मालिकेतून बाहेर आहे. पुढील काही दिवसांत काय होते ते आम्ही पाहू आणि एकदा आम्हाला काही अधिकृत माहिती मिळाली की आम्ही ती सर्वांना सांगू, असंही द्रविड म्हणाला.