हर्षा भोगले-बेन स्टोक्समध्ये ट्विटरवॉर, या कारणानं वादंग…

हर्षा भोगले-बेन स्टोक्समध्ये ट्विटरवॉर रंगला असून नेमकं काय झालं, जाणून घ्या....

हर्षा भोगले-बेन स्टोक्समध्ये ट्विटरवॉर, या कारणानं वादंग...
हर्षा भोगले-बेन स्टोक्समध्ये ट्विटरवॉर
Image Credit source: social
शुभम कुलकर्णी

|

Oct 01, 2022 | 9:12 PM

नवी दिल्ली :  भारत आणि इंग्लंड (Ind vs Eng) महिला संघांमध्ये तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली गेली. या मालिकेतील शेवटच्या सामन्यात भारताच्या दीप्ती शर्मानं (Deepti Sharma) इंग्लंडच्या चार्लीला धावबाद केलं होतं. ती चेंडू टाकायच्या आधीच धावली. भारतानं (India) मांकाडिंगनं हा सामना जिंकला आणि क्रिकेटचा हा इतका साधा नियम इंग्लंडच्या खेळाडूला पाळता न आल्यानं इंग्लंडची नाचक्की झाली. मात्र, इंग्लंडकडून वेगळाच आव आणल्या गेला आणि त्यानंतर काय झालं, हे अवघ्या जगानं पाहिलं. आता यात आणखी एक नवं ट्विस्ट आलंय.

आता या सगळ्यात समालोचक हर्षा भोगलेंनी उडी घेतली आहे. काल या वादावर हर्षा भोगले यांनी ट्विट केलं होतं. आपल्या मोठ्या पोस्टमध्ये त्यांनी इंग्लंडच्या खेळाडूंच्या विचारसरणीवर आणि त्यांच्या संस्कृतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. त्यांचं हे ट्विट प्रचंड व्हायरल होतंय.

हे ट्विट पाहा

आता इंग्लंडचा कसोटी कर्णधार बेन स्टोक्सनं समालोचक हर्षा भोगलेंना प्रत्युत्तर दिलं आणि वादाला आणखी सुरुवात झाली. हर्षा भोगलेंच्या ट्विटला उत्तर देताना त्यानं म्हटलंय. हर्षा मांकाडिंगवर लोकांनी दिलेल्या मतावर तुम्ही संस्कृती आणत आहात.

हे ट्विट पाहा

स्टोक्स पुढे लिहितो, ‘हर्षा 2019 वर्ल्ड कप दोन वर्षांपूर्वी संपला. आजही मला भारतीय चाहत्यांकडून याबाबतचे संदेश येतात. हे तुम्हाला त्रास देते का?’

हे ट्विट पाहा

बेन स्टोक्सनं म्हटलंय की, जगभरातील लोक मांकाडिंगवर कमेंट करत आहेत.संस्कृतीचा विषय आहे का? अजिबात नाही, मला ओव्हर थ्रो बद्दल जगभरातील लोकांकडून संदेश मिळतात. केवळ इंग्रजच नव्हे तर जगभरातील लोक मांकाडिंग यांच्यावरही आपलं मत मांडतायत.’

हर्षा भोगलेंचं उत्तर

भोगले म्हणतात, ‘बरं, तुझा काही दोष नव्हता त्यामुळे मी तुझ्यासोबत आहे. नॉन-स्ट्रायकरसाठी इंग्लंडकडून मिळालेल्या बॅक-अप प्रतिसादावर. मला वाटते की जेव्हा तुम्ही खेळ शिकता आणि संस्कृतीचा भाग असता तेव्हा तुम्हाला तेच सांगितले जाते. जर तुमच्याकडे वेळ असेल तर एक दिवस याबद्दल बोलणे चांगले होईल.’

हे ट्विट पाहा

भोगलेंनी दीप्ती शर्माला चूक ठरवणाऱ्यांवर टीका केली. त्यांना उत्तरही दिलं. भोगलेंनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय की, क्रिकेट जिथून सुरू झाले तेथून ते आपली विचारसरणी इतरांवर लादण्याचा प्रयत्न करत आहेत.’

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें