Duleep Trophy Final 2023 | दुलीप ट्रॉफीच्या फायनलमध्ये साऊथ झोन विजयी, सूर्या, पुजारा, शॉ फेल!

South Zone vs West Zone Final Match : दुलीप ट्रॉफीच्या फायनल सामन्यामध्ये वेस्ट झोनचा पराभव झाला आहे. सूर्यकुमार यादव, पृथ्वी शॉ, चेतेश्वर पुजारासारखे खेळाडू संघात असतानाही फायनलमध्ये वेस्ट झोनला पराभव स्वीकारावा लागला आहे.

Duleep Trophy Final 2023 | दुलीप ट्रॉफीच्या फायनलमध्ये साऊथ झोन विजयी, सूर्या, पुजारा, शॉ  फेल!
| Updated on: Jul 16, 2023 | 4:27 PM

मुंबई : दुलीप ट्रॉफीच्या वेस्ट झोन विरुद्ध साऊथ झोन (South Zone vs West Zone Duleep Trophy Final 2023) यांच्यात झालेल्या फायनल सामन्यामध्ये साऊथ झोनने विजय मिळवला आहे. (Duleep Trophy Final 2023) टीम इंडिसाठी खेळणारे एकापेक्षा एक फलंदाजांचा भरणा असतानाही वेस्ट झोनला पराभव स्वीकारावा लागला आहे. सूर्यकुमार यादव, चेतेश्वर पुजारा, पृथ्वी शॉ आणि सरफराज खानसारखे तगडे खेळाडू असतानाही संघाचा पराभव झाल्याने क्रीडा वर्तुळात जोरदार चर्चा आहे.

दुलीप ट्रॉफी फायनल सामन्याचा आढावा

फायनल सामन्यामध्ये वेस्ट झोन संघाने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या साऊथ झोन संघाचा पहिला डाव 213 धावांवर आटोपला होता. यामध्ये कर्णधार हनुमा विहारीने सर्वाधिक 63 धावा केल्या होत्या आणि तिलक वर्माने 40 धावा केलेल्या. त्यावेळी शम्स मुलानीने 3 विकेट घेतल्या होत्या.

वेस्ट झोन फलंदाजीला उतरल्यावर त्यांचा पहिला डाव अवघ्या 146  धावांवर गुंडाळला. यामध्ये चेतेश्वर पुजारा 9 धावा, सूर्यकुमार यादव 8 धावा आणि सरफराज खान शून्यावर बाद झालेला. पूथ्वी शॉने एकट्याने सर्वाधिक 65 धावा केल्या होत्या.

साऊथ झोनकडे 67 धावांची आघाडी होती त्यानंतर दुसऱ्या डावात 230 धावा केल्या होत्या. त्यामध्ये कर्णधार हनुमा विहारीने 42 धावा, मयंक अग्रवाल 35 धावा रिकी भुई आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी प्रत्येकी 37 धावा केल्या होत्या.

 

दरम्यान, वेस्ट झोनचा संघ आव्हान सहज पार करेल असं  वाटलं होतं. मात्र दुसऱ्य़ा डावातही स्टार खेळाडू संघाला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरले. कर्णदार प्रियांक पांचाल 95 धावा आणि सरफराज खान 48 धावांवर बाद झाले. यांच्या व्यतिरिक्त कोणत्याही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही.

वेस्ट झोन (प्लेइंग इलेव्हन): रविकुमार समर्थ, मयंक अग्रवाल, हनुमा विहारी (C), रिकी भुई (W), तिलक वर्मा, वॉशिंग्टन सुंदर, रविश्रीनिवासन साई किशोर, सचिन बेबी, विद्वथ कवेरप्पा, विजयकुमार विशक, वासुकी कौशिक

साऊथ झोन (प्लेइंग इलेव्हन): पृथ्वी शॉ, प्रियांक पांचाळ (C), चेतेश्वर पुजारा, सूर्यकुमार यादव, सर्फराज खान, धर्मेंद्रसिंह जडेजा, हार्विक देसाई (W), चिंतन गजा, अरझान नागवासवाला, अतित शेठ, शम्स मुलानी