
लखनौ : गौतम गंभीर असं काय बोलला की, ज्यामुळे भर मैदानातच विराट कोहली भडकला. काइल मेयर्स आणि विराट कोहली दरम्यान काय बोलण चाललेल? ज्यामुळे गंभीरने मेयर्सला विराट कोहलीपासून लांब केलं. मॅच संपल्यानंतर मैदानात गंभीर आणि कोहलीमध्ये झालेल्या वादाचा मुद्दा तापला आहे. दोघांच्या भांडणाचा व्हिडिओ सुद्धा व्हायरल झालाय. पण या भांडणाची सुरुवात कधी झाली? हे कोणालाच माहित नाहीय.
मेयर्स आणि कोहली बोलत असताना या वादाची सुरुवात झाली. भांडणाचा विषय समजल्यानतंर या पेक्षा शाळकरी मुल परवडली, असं तुम्हाला वाटेल. लखनौ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोरमध्ये आयपीएल 2023 चा 43 वा सामना खेळला गेला.
तू मला का ठसन दिली?
बँगलोरने 18 रन्सनी ही मॅच जिंकली. मॅचनंतर मेयर्स आणि कोहली परस्परांशी बोलत होते. लखनौच्या मेयर्सने कोहलीला विचारल की, तू सतत माझ्याबद्दल अपशब्द का वापरत होतास? कोहलीने त्याला उलट सवाल केला. तू मला का ठसन दिली?
गंभीरने बोलण्यापासून त्याला रोखलं
याआधी अमित मिश्राने अंपायरकडे विराट कोहलीबद्दल तक्रार केली होती. विराट नवीनबद्दल सातत्याने अपशब्द वापरत होता, असं अमित मिश्राने अंपायरला सांगितलं. गंभीरमध्ये आला, त्याने मेयर्सला आपल्याकडे ओढलं. कोहलीसोबत बोलू नकोस असं त्याला सांगितलं. यानंतर कोहली काहीतरी बोलला व दोघांमध्य लहान मुलांसारखं भांडण सुरु झालं.
विराट आणि गंभीरमध्ये झालेलं भांडण जसच्या तसं
गंभीर – काय बोलतोयस, बोल?
विराट – मी तुला काही बोललोच नाही. का मध्ये पडतोस?
गंभीर – तू माझ्या खेळाडूला बोललास म्हणजे, माझ्या फॅमिलीला शिवी दिलीस,
कोहली – मग, तू तुझ्या फॅमिलीला संभाळून ठेवं.
गंभीर – आता तू मला शिकवणार
दोघांना चुकवावी लागली किंमत
विराट आणि गंभीर शब्दांनी परस्परांना भिडत होते, त्यावेळी अन्य खेळाडू दोघांना लांब घेऊन गेले. या भांडणांची त्यांना किंमत सुद्धा चुकवावी लागली. दोघांची 100 टक्के मॅच फी कापण्यात आली. कोहलीच कोटीच, तर गंभीरच लाखांच नुकसान झालं. दोघांमध्ये 2013 मध्ये सुद्धा असाच वाद झाला होता.