AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Naveen Ul Haq Fights : विराटला नडणाऱ्या नवीनला जाणूनबुजून पंगे घेण्याची सवय, एकदा VIDEO बघा, सगळं समजेल

Naveen Ul Haq Fights : विराट कोहलीसोबतच भांडण हा नवीन उल हकचा पहिला वाद नाहीय. याआधी दुसऱ्या लीगमध्ये सुद्धा हा खेळाडू दुसऱ्या प्लेयरसोबत भांडलाय. चक्क मारामारीपर्यंत विषय पोहोचलेला. पहा VIDEO

Naveen Ul Haq Fights : विराटला नडणाऱ्या नवीनला जाणूनबुजून पंगे घेण्याची सवय, एकदा VIDEO बघा, सगळं समजेल
ipl 2023 virat kohli-naveen ul haqImage Credit source: BCCI/IPL
| Updated on: May 03, 2023 | 12:05 PM
Share

नवी दिल्ली : IPL 2023 मध्ये सोमवार-मंगळवार हे दोन दिवस विशेष चर्चेत राहिले. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी रॉयल चॅलेंजर्स बँगलोर आणि लखनौ सुपर जांयट्समध्ये झालेला सामना वादांमुळे गाजला. RCB चा प्लेयर विराट कोहली एकाचवेळी लखनौ सुपर जायंट्सच्या तीन खेळाडूंना भिडला. मैदानावर भरपूर हमरी-तुमरी झाली. या सर्व वादाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

विराटचा लखनौचा मेंटॉर गौतम गंभीर, नवीन उल हक आणि अमित मिश्रा या तिघांबरोबर वादावादी झाली. विराट कोहली आणि नवीन उल हकमध्ये हात मिळवताना भांडण झालं. नवीन उल हकची मैदानावर वाद घालण्याची ही पहिली वेळ नाहीय. भांडणाचा त्याचा इतिहास जुना आहे.

आणखी कुठे भाडंण केलीयत त्याने?

नवीन उल हक आयपीएलमध्ये खेळण्याआधी लंका प्रीमियर लीग, बिग बॅश लीगमध्ये खेळलाय. या लीगमध्ये सुद्धा नवीन उल हकची अनेक सीनियर खेळाडूंबरोबर वादावादी झाली होती. कोहलीसोबत झालेलं हे चौथ भांडण आहे.

पाकिस्तानच्या दोन खेळाडूंना भिडला

नवीन उल हक 2020 यावर्षी लंका प्रीमियर लीगच्या पहिल्या सीजनमध्ये सहभागी झाला होता. नवीन या लीगमध्ये कँडी टस्कर्सकडून खेळत होता. त्यांचा सामना गॉल ग्लेडिएटर्स विरुद्ध होता. मॅच नंतर ग्लॅडिएटर्सचा वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिर बरोबर नवीनच वाजलं. त्यानंतर शाहीद आफ्रिदी यामध्ये आला. नवीनने त्याच्यासोबत सुद्धा वाद घातला. दोन्ही टीम्सच्या खेळाडूंनी वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. पण पुन्हा भांडण वाढलं.

बिग बॅश लीगमध्ये कोणाबरोबर राडा?

नवीन उल हक वर्ष 2022 मध्ये बिग बॅश लीगमध्ये खेळण्यासाठी गेला होता. त्यावेळी डी आर्की शॉर्ट बरोबर भांडण झालं होतं. नवीन सिडनी सिक्सर्सकडून खेळत होता. शॉर्ट होबर्ट हरीकॅन्सकडून खेळत होता. नवीन गोलंदाजी करत होता. शॉर्टने त्याचा चेंडू खेळला व धाव घेण्यासाठी पळाला. या दरम्यान दोघे धडकले. नवीन तिथेच पडला. त्यावरुन दोघे भिडले.

हा खेळाडू नवीनला मारण्यासाठी धावला होता

लंका प्रीमियर लीगमध्ये नवीन यावर्षी सुद्धा खेळला. तिथे सुद्धा त्याचं भांडण झालं. यावेळी श्रीलंकेच्या थिसारा परेरा बरोबर त्याचा वाद झाला. परेराने नवीनचा चेंडू खेळला व धाव घेतली. दुसरी धाव घेताना नवीन, परेराच्या मार्गात आला. त्यावरुन दोघांमध्ये भांडण झालं. परेरा खूप रागात होता. तो नवीनला मारण्यासाठी पळाला. अखेर अंपायरनी मध्यस्थी करुन दोघांना लांब केलं.

समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस
समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस.
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते.
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!.
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली.
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा.
कराडमध्ये ड्रग्जप्रकरणी डीआरआयची मोठी कारवाई
कराडमध्ये ड्रग्जप्रकरणी डीआरआयची मोठी कारवाई.
पद्म पुरस्कारांची घोषणा! रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड यांचा होणार गौरव
पद्म पुरस्कारांची घोषणा! रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड यांचा होणार गौरव.
बिहार भवनाला विरोध, हा राऊतांचा दुटप्पीपणा; नवनाथ बन यांची टीका
बिहार भवनाला विरोध, हा राऊतांचा दुटप्पीपणा; नवनाथ बन यांची टीका.
मुख्यमंत्री फडणवीस नांदेडमध्ये श्री गुरुग्रंथ साहिबांच्या दर्शनाला
मुख्यमंत्री फडणवीस नांदेडमध्ये श्री गुरुग्रंथ साहिबांच्या दर्शनाला.
हिरव्या आणि भगव्या रंगाचा वाद पेटला, अंधारे आणि बन यांच्यात जुंपली
हिरव्या आणि भगव्या रंगाचा वाद पेटला, अंधारे आणि बन यांच्यात जुंपली.