ENG A vs IND A : केएल-अभिमन्यूची कडक खेळी, इंडिया ए टीमकडे 184 धावांची आघाडी

England Lions vs India A 2nd Unofficial Test Day 3 Highlights : इंग्लंड लायन्स विरुद्ध इंडिया ए यांच्यातील 4 दिवसीय दुसऱ्या अनऑफिशियल कसोटी सामन्यातील 3 दिवसांचा खेळ संपला आहे. इंडिया ए या सामन्यात आघाडीवर आहे.

ENG A vs IND A : केएल-अभिमन्यूची कडक खेळी, इंडिया ए टीमकडे 184 धावांची आघाडी
England lions vs india a 2nd match day 3
Image Credit source: Social Media
| Updated on: Jun 09, 2025 | 9:16 AM

इंडिया ए टीम विरुद्ध इंग्लंड लायन्स यांच्यात दुसरा अनऑफिशियल सामना नॉर्थम्पटनमधील काउंटी ग्राउंडमध्ये खेळवण्यात येत आहे. या सामन्यातील 3 दिवसांचा खेळ संपला आहे. इंडिया ए टीमने दुसऱ्या डावात 33 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 163 धावा केल्या आहेत. इंडिया ए टीमने इंग्लंड लायन्सला पहिल्या डावात 327 धावांवर रोखलं होतं. त्यामुळे इंडिया एकडे 21 धावांची आघाडी होती. इंडिया ए टीमने तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 184 धावांची मजबूत आघाडी घेतली आहे. इंडिया ए टीमसाठी दुसऱ्या दिवशी कर्णधार अभिमन्यू इश्वरन आणि पहिल्या डावात शतक करणाऱ्या केएल राहुल या दोघांनी सर्वाधिक धावांचं योगदान दिलं.

अभिमन्यू इश्वरन याने 92 बॉलमध्ये 10 फोरसह 80 धावा केल्या. इश्वरनला शतक करण्याची संधी होती. मात्र इश्वरन अपयशी ठरला. तर केएल राहुल याने 51 चेंडूत 9 चौकारांच्या मदतीने 51 धावांची अर्धशतकी खेळी केली. या दोघांनी केलेल्या खेळीमुळे इंडिया ए टीमला 150 पेक्षा अधिक धावांची आघाडी घेण्यात यश आलं. तर ध्रुव जुरेल (6) आणि नितीश कुमार रेड्डी (1) ही जोडी नाबाद परतली.

खलील अहमदचा चौकार

इंडिया ए टीमने केएल राहुल याच्या शतकी खेळीच्या जोरावर पहिल्या डावात 300 पार धावा केल्या. इंडिया ए टीमने ऑलआऊट 348 रन्स केल्या. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडला आघाडी घेण्यापासून रोखलं. इंडिया ए टीमने इंग्लंड लायन्सला 327 रन्सवर ऑलआऊट केलं. त्यामुळे इंडिया ए टीमला 21 धावांची आघाडी मिळाली. इंडिया ए टीमसाठी खलील अहमद याने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या.

इंडिया ए टीमची दुसरी इनिंग

यजमानांना ऑलआउट केल्यानंतर इंडिया ए टीमची निराशाजनक सुरुवात राहिली. ओपनर यशस्वी जयस्वाल 5 रन्स करुन आऊट झाला. त्यानंतर अभिमन्यू आणि केएल राहुल या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 88 रन्सची पार्टनरशीप केली. टीम इंडियाने केएल राहुल याच्या रुपात दुसरी विकेट गमावली. केएल 51 धावा करुन माघारी परतला. केएल आऊट झाल्यानंतर अभिमन्यू आणि करुण नायर या दोघांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात काही यश आलं नाही. करुण 15 धावांवर बाद झाला.

दुसऱ्या बाजूला अभिमन्यूने एक बाजू लावून धरली होती. अभिमन्यू शतक करेल, असं वाटत होतं. मात्र अभिमन्यू शतक करण्यात अपयशी ठरला. अभिमन्यूने 92 चेंडूत 80 धावांची खेळी केली. अभिमन्यूने या खेळीत 10 चौकार लगावले. अभिमन्यू पहिल्या डावात 11 रन्स केल्या होत्या. तर त्याआधी पहिल्या सामन्यात अभिमन्यूने अर्धशतकी खेळी केली होती.