ENG Lions vs India A : इंग्लंड लायन्स 327 रन्सवर ऑलआऊट, भारताला 21 धावांची आघाडी
England Lions vs India A 2nd Unofficial Test : इंग्लंड ए टीमने इंडिया ए विरुद्ध दुसऱ्या अनऑफीशियल टेस्ट मॅचमधील पहिल्या डावात 327 धावा केल्या. भारताला या सामन्यात मोठी आघाडीची संधी होती. मात्र तसं होऊ शकलं नाही.

इंडिया ए टीमने अभिमन्यू इश्वरन याच्या नेतृत्वात दुसऱ्या अनऑफीशियल टेस्ट मॅचमधील तिसऱ्या दिवशी इंग्लंड लायन्सला 89 ओव्हरमध्ये 327 रन्सवर ऑल आऊट केलं आहे. त्यामुळे इंडियाला 21 धावांची आघाडी मिळाली आहे. इंडियाने पहिल्या डावात ऑलआऊट 348 रन्स केल्या होत्या. त्या प्रत्युत्तरात इंग्लंडने 327 धावांपर्यंत मजल मारली. इंडियाला आणखी मोठी आघाडी घेण्याची संधी होती. मात्र इंग्लंडच्या फलंदाजांनी 10 व्या विकेटसाठी 48 धावांची भागीदारी केली. त्यामुळे भारताला मोठी आघाडी मिळाली नाही.
दहाव्या विकेटसाठी 48 धावांची भागीदारी
नितीश रेड्डी याने फरहान अहमद याला 24 धावांवर आऊट करत इंग्लंडला नववा झटका दिला. इंग्लंडने 279 धावावंर नववी विकेट गमावली. त्यामुळे टीम इंडियाला सहज 50 पेक्षा अधिक धावांची आघाडी मिळण्याची शक्यता होती. मात्र जोश टंग आणि एडवर्ड जॅक या जोडीने तसं होऊ दिलं नाही. या जोडीने दहाव्या विकेटसाठी 48 धावा जोडल्या. अंशुल कंबोज याने ही जोडी फोडली. अंशुलने एडवर्ड जॅक याला 16 रन्सवर बोल्ड केलं आणि इंग्लंडचा डाव आटोपला. तसेच जोश टंग याने नाबाद 36 धावांचं योगदान दिलं.
इंग्लंडसाठी एमिलियो गे याने सर्वाधिक 71 धावांचं योगदान दिलं. ओपनर टॉम हेन्स याने 54 रन्स केल्या. जॉर्डन कॉक्स याने 45 रन्स केल्या. तर इतरांना भारताच्या गोलंदाजांसमोर फार काही करता आलं नाही. भारताकडून खलील अहमद याने सर्वाधिक विकेट्स मिळवल्या. खलीलने 4 विकेट्स मिळवल्या. अंशुल कंबोज आणि तुषार देशपांडे या जोडीने प्रत्येकी 2-2 विकेट्स मिळवल्या. तर तनुष कोटीयन आणि नितीश रेड्डी या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.
भारताचा पहिला डाव
दरम्यान भारताने पहिल्या डावात 89.3 ओव्हरमध्ये 348 धावा केल्या. भारतासाठी केएल राहुल याने सर्वाधिक 116 रन्स केल्या. तर ध्रुव जुरेल याने अर्धशतकांची हॅटट्रिक लगावली. ध्रुवने 52 धावा केल्या. करुण नायर याने 40 धावांचं योगदान दिलं. तर नितीश रेड्डीने 34 रन्स केल्या. तर इतरांनी दिलेल्या योगदानामुळे भारताला 300 पार पोहचता आलं.
इंडिया ए प्लेइंग ईलेव्हन : यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, अभिमन्यु ईश्वरन (कर्णधार), करुण नायर, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), नीतीश कुमार रेड्डी, शार्दूल ठाकुर, तनुष कोटीयन, अंशुल कंबोज, तुषार देशपांडे आणि खलील अहमद.
इंग्लंड लायन्स प्लेइंग ईलेव्हन : टॉम हेन्स, बेन मॅककिनी, एमिलियो गे, जॉर्डन कॉक्स, जेम्स र्यू (कॅप्टन आणि विकेटकीपर), मॅक्स होल्डन, जॉर्ज हिल, ख्रिस वोक्स, फरहान अहमद, जोश टंग आणि एडवर्ड जॅक.
