Shubman Gill : द्विशतकानंतर आता तडाखेदार शतक, कॅप्टन शुबमनचा एकाच सामन्यात ऐतिहासिक कारनामा, ठरला दुसरा भारतीय

Shubman Gill Hundred : भारतीय कसोटी संघाचा कर्णधार युवा शुबमन गिल याने इंग्लंड विरूद्धच्या दुसऱ्या सामन्यात शतक ठोकून इतिहास घडवला आहे. शुबमनने यासह महारेकॉर्डची बरोबरी केली आहे.

Shubman Gill : द्विशतकानंतर आता तडाखेदार शतक, कॅप्टन शुबमनचा एकाच सामन्यात ऐतिहासिक कारनामा, ठरला दुसरा भारतीय
Shubman Gill Hundred ENG vs IND 2nd Test
Image Credit source: PTI
| Updated on: Jul 05, 2025 | 10:03 PM

टीम इंडियाचा कॅप्टन शुबमन गिल याला रोखणं इंग्लंडसाठी अवघड झालं आहे. शुबमनने इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या कसोटीतील पहिल्या डावात ऐतिहासिक द्विशतक ठोकलं आणि असंख्य विक्रम उद्धवस्त केले. त्यानंतर आता शुबमनने दुसऱ्या डावात तडाखेदार शतक करत इतिहास रचला आहे. शुबमन एका कसोटी सामन्यात द्विशतक आणि शतक करणारा एकूण नववा तर दुसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. शुबमनने यासह भारताचे माजी फलंदाज सुनील गावसकर यांच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. शुबमनने 129 बॉलमध्ये 77.52 च्या स्ट्राईक रेटने शतक पूर्ण केलं. शुबमनने या शतकी खेळीत 3 षटकार आणि 8 चौकार लगावले. शुबमनच्या कसोटी कारकीर्दीतील हे आठवं शतक ठरलं.

शुबमनने 129 बॉलमध्ये 77.52 च्या स्ट्राईक रेटने शतक पूर्ण केलं. शुबमनने या शतकी खेळीत 3 षटकार आणि 8 चौकार लगावले. शुबमनच्या कसोटी कारकीर्दीतील हे आठवं शतक ठरलं. शुबमनने शतकानंतर गिअर बदलला आणि जोरदार फटकेबाजी केली. शुबमनने दीडशतक झळकावलं. शुबमनने दुसऱ्या डावात 162 बॉलमध्ये एकूण 161 रन्स केल्या. शुबमनने 99.38 च्या स्ट्राईक रेटने ही खेळी केली. शुबमनने या खेळीत 8 षटकार आणि 13 चौकार झळकावले.

पहिल्या डावात द्विशतकी धमाका

शुबमनने त्याआधी या सामन्यातील पहिल्या डावात ऐतिहासिक द्विशतकी खेळी केली. शुबमन इंग्लंडमध्ये द्विशतक करणारा पहिला भारतीय कर्णधार ठरला. तसेच शुबमनने भारतासाठी एकदिवसीय आणि कसोटी या दोन्ही फॉर्मटेमध्ये द्विशतक करणारा भारताचा सर्वात युवा फलंदाज हा बहुमान मिळवला. शुबमनने वयाच्या 25 व्या वर्षी ही कामगिरी करुन दाखवली.

शुबमनने पहिल्या डावात मैदानातील प्रत्येक बाजूला फटकेबाजी करत इंग्लंडच्या गोलंदाजांची जोरदार धुलाई केली. शुबमनने केलेल्या द्विशतकी खेळीमुळे भारताला पहिल्या डावात 587 धावा करता आल्या. शुबमनने 387 चेंडूत 30 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 269 धावा केल्या.

शुबमनचं ऐतिहासिक शतक आणि महारेकॉर्डची बरोबरी

दिग्गज गावसकरांच्या विक्रमाची बरोबरी

शुबमनने द्विशतक आणि शतकासह लिटील मास्टर अर्थात सुनील गावसकर यांच्या 54 वर्षांआधीच्या विक्रमाची बरोबरी केली. गावसकरांनी 1971 साली वेस्ट इंडिज विरुद्ध पहिल्या डावात शतक आणि दुसऱ्या डावात द्विशतक केलं होतं. गावसकरांनी पहिल्या डावात 124 तर दुसऱ्या डावात 220 धावांची खेळी केली होती.