ENG vs IND : इंग्लंड दुसऱ्या दिवशी वरचढ, मँचेस्टरमध्ये 225 धावा, टीम इंडिया मोठी आघाडी घेण्यापासून रोखणार?

England vs India 4th Test Day 2 Stumps : यजमान इंग्लंडने टीमने दुसऱ्या दिवसाचा खेळ आपल्या नावावर केला आहे. इंग्लंडने भारताला 92 धावांच्या मोबदल्यात 6 झटके देत गुंडाळलं. त्यानंतर इंग्लंडने 2 विकेट्स गमावून 225 धावा केल्या आहेत.

ENG vs IND : इंग्लंड दुसऱ्या दिवशी वरचढ, मँचेस्टरमध्ये 225 धावा, टीम इंडिया मोठी आघाडी घेण्यापासून रोखणार?
Anhsul Kamboj Team India
Image Credit source: Bcci x Account
| Updated on: Jul 24, 2025 | 11:40 PM

इंग्लंड विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील चौथ्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. भारताने पहिल्या डावात सर्वबाद 358 धावा केल्या. इंग्लंडने प्रत्युत्तरात खेळ संपेपर्यंत 2 विकेट्स गमावून 225 धावा केल्या आहेत. ओली पोप आणि जो रुट ही जोडी नाबाद परतली आहे. तर भारताकडून रवींद्र जडेजा आणि डेब्यूटंट अंशुल कंबोज या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली. इंग्लंड अजूनही 133 धावांनी पिछाडीवर आहे. त्यामुळे भारतीय गोलंदाजांसमोर तिसऱ्या दिवशी इंग्लंडला झटपट गुंडाळून मोठी आघाडी घेण्यापासून रोखण्याचं आव्हान असणार आहे.

दुसऱ्या दिवशी काय झालं?

टीम इंडियाने 83 ओव्हरमध्ये 4 आऊट 264 रन्सपासून दुसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात केली. रवींद्र जडेजा आणि शार्दूल ठाकुर या ऑलराउंडर जोडीने खेळाला सुरुवात केली. भारताला 400 धावांपर्यंत पोहचण्याची संधी होती. मात्र इंग्लंडच्या गोलंदाजांनी कमाल केली आणि भारताला 360 धावांपर्यंतही पोहचू दिलं नाही. भारताला पहिल्या डावात दुसऱ्या दिवशी 6 विकेट्सच्या मोबदल्यात 92 धावाच जोडता आल्या. अशाप्रकारे भारताचा डाव हा 358 धावांवर आटोपला.

टीम इंडियासाठी साई सुदर्शन याने सर्वाधिक 61 धावा केल्या. यशस्वी जैस्वाल याने 58 रन्स केल्या. तर ऋषभ पंत याने 54 धावांची खेळी केली. या व्यतिरिक्त इतरांनाही चांगली सुरुवात मिळाली. मात्र त्यांना त्या खेळीचं मोठया आकड्यात रुपांतर करता आलं नाही. इंग्लंडसाठी कर्णधार बेन स्टोक्स याने सर्वाधिक 5 विकेट्स मिळवल्या. तर जोफ्रा आर्चर याने तिघांना बाद करत भारताला रोखण्यात प्रमुख भूमिका बजावली.

इंग्लंडचा पहिला डाव

त्यानंतर इंग्लंडच्या सलामी जोडीने अप्रतिम सुरुवात केली. बेन डकेट आणि झॅक क्रॉली या जोडीने दीडशतकी भागीदारी केली. भारतासाठी ही जोडी डोकेदुखी ठरत होती. त्यामुळे टीम इंडिया पहिल्या विकेटच्या शोधात होती. रवींद्र जडेजाने झॅक क्रॉली याला आऊट करत ही जोडी फोडली. क्रॉलीने 113 बॉलमध्ये 84 रन्स केल्या.

दुसऱ्या दिवसाचा गेम ओव्हर

त्यानंतर अंशुल कंबोज याने कसोटी कारकीर्दीतील पहिलीवहिली विकेट घेत बेन डकेट याला नर्व्हस नाईंटीचा शिकार केला. अंशुलने डकेटला 100 चेंडूत 13 चौकारांच्या मदतीने 94 धावा केल्या. तर ओली पोप आणि जो रुट ही जोडी खेळ संपेपर्यंत नाबाद परतली. पोप 20 तर रुट 11 धावांवर नाबाद आहेत. आता तिसऱ्या दिवशी भारतीय गोलंदाजांच्या कामगिरीकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.