AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ENG vs IND : इंग्लंड विरूद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी महिला ब्रिगेड सज्ज, पहिला सामना कोण जिंकणार?

England Women vs India Women 1st ODI Live Streaming : यजमान इंग्लंडला टी 20I मालिकेत लोळवल्यानंतर टीम इंडियाची महिला ब्रिगेड आता एकदिवसीय मालिकेसाठी सज्ज झाली आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यासाठी दोन्ही संघांनी जोरदार सराव केला आहे.

ENG vs IND : इंग्लंड विरूद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी महिला ब्रिगेड सज्ज, पहिला सामना कोण जिंकणार?
ENG vs IND Harmanpreet Kaur Team IndiaImage Credit source: Bcci
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Jul 16, 2025 | 4:09 PM
Share

वूमन्स इंडिया क्रिकेट टीम सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. टीम इंडियाने हरमनप्रीत कौर हीच्या नेतृत्वात इंग्लंड विरुद्ध 5 सामन्यांची टी 20I मालिका जिंकली. भारतीय महिला संघाने क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच इंग्लंडमध्ये टी 20I मालिका जिंकण्याची कामिगरी केली. भारताने ही मालिका 3-2 अशा फरकाने आपल्या नावावर केली. त्यानंतर आता उभयसंघात एकदिवसीय मालिकेचा थरार रंगणार आहे.

इंग्लंड वूमन्स विरुद्ध इंडिया वूमन्स यांच्यात 16 ते 22 जुलैदरम्यान एकूण 3 एकदिवसीय सामने खेळवण्यात येणार आहेत. हरमनप्रीत कौर भारतीय संघाचं नेतृत्व करणार आहे. तर नॅट सायव्हर ब्रँट दुखापतीनंतर इंग्लंडचं नेतृत्व करणार आहे. नॅटला टी 20I मालिकेदरम्यान दुखापत झाली होती. त्यामुळे नॅटला त्या मालिकेतील शेवटच्या 3 सामन्यांना मुकावं लागलं होतं. उभयसंघातील पहिल्या एकदिवसीय सामना कुठे आणि कधी होणार? हे सविस्तर जाणून घेऊयात.

इंग्लंड विरुद्ध इंडिया वूमन्स पहिला एकदिवसीय सामना कधी?

इंग्लंड विरुद्ध इंडिया वूमन्स पहिला एकदिवसीय सामना बुधवारी 16 जुलै रोजी होणार आहे.

इंग्लंड विरुद्ध इंडिया वूमन्स पहिला एकदिवसीय सामना कुठे?

इंग्लंड विरुद्ध इंडिया वूमन्स पहिला एकदिवसीय सामना द रोझ बाउल, साउथम्पटन येथे आयोजित करण्यात आला आहे.

इंग्लंड विरुद्ध इंडिया वूमन्स पहिल्या एकदिवसीय सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

इंग्लंड विरुद्ध इंडिया वूमन्स पहिल्या एकदिवसीय सामन्याला भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 5 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 5 वाजता टॉस होईल.

इंग्लंड विरुद्ध इंडिया वूमन्स पहिला एकदिवसीय सामना टीव्ही आणि मोबाईलवर कुठे पाहायला मिळेल?

इंग्लंड विरुद्ध इंडिया वूमन्स पहिला एकदिवसीय सामना टीव्हीवर सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल. तर लाईव्ह मॅच मोबाईलवर सोनी लिव्ह एपवर पाहता येईल.

एकदिवसीय मालिकेत कोण देणार विजयी सलामी?

कोण करणार विजयी सुरुवात?

दरम्यान आता टी 20I नंतर एकदिवसीय मालिकेत टीम इंडियाचा विजयी सुरुवात करण्यासाठी सज्ज आहे. तर यजमान इंग्लंड टीम इंडियाला रोखण्याच्या प्रयत्न करणार आहे. त्यामुळे मालिकेत कोणता संघ विजयी सलामी देतो याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल