
आयसीसी टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील सुपर 8 फेरीत 27 फेब्रुवारीच्या सामन्यात इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड आमनेसामने आहेत. दोन्ही संघांचा हा सुपर 8 फेरीतील तिसरा आणि अंतिम सामना आहे. इंग्लंडने या फेरीतील पहिले आणि सलग 2 सामने जिंकून उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला आहे. तर न्यूझीलंडचा पहिला सामना पावसामुळे रद्द झाला. तर न्यूझीलंडने दुसऱ्या सामन्यात विजय मिळवला. आता दोन्ही संघ कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियममध्ये आमनेसामने आहेत. न्यूझीलंडला उपांत्य फेरीत पोहचण्यासाठी हा सामना जिंकणं महत्त्वाचं आहे. न्यूझीलंडने या सामन्यात इंग्लंडसमोर 160 धावांचं आव्हान ठेवलं आहे. अशात आता न्यूझीलंडला सेमी फायनलमध्ये पोहचण्यासाठी इंग्लंडला किती धावांवर रोखावं लागणार? हे जाणून घेऊयात.
न्यूझीलंडला सेमी फायनलमध्ये पोहचण्यासाठी इंग्लंड विरुद्ध फक्त विजय मिळवणं महत्त्वाचं आहे. न्यूझीलंडसाठी इंग्लंडला अमूक धावांवर रोखण्याची कोणतीही अट नाही. न्यूझीलंडचा सुपर 8 फेरीतील पाकिस्तान विरुद्धचा सामना हा पावसामुळे रद्द झाला. तर न्यूझीलंडने दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेवर मात केली. त्यामुळे न्यूझीलंडच्या खात्यात 3 गुण आहेत. न्यूझीलंडने आता इंग्लंडला पराभूत केलं तर त्यांचे एकूण 5 गुण होतील. मात्र इंग्लंडने हे आव्हान कमीत कमी चेंडूत पूर्ण केलं तर न्यूझीलंडच्या अडचणीत वाढ होऊ शकते.
न्यूझीलंडचा मोठ्या फरकाने पराभव झाल्यास पाकिस्तानची सेमी फायनलमध्ये पोहचण्याची आशा कायम राहिल. मात्र न्यूझीलंडने हा सामना कमी फरकाने गमावला तरी ते उपांत्य फेरीत पोहचतील. त्याचं कारण म्हणजे न्यूझीलंडचा पाकिस्तानपेक्षा चांगला असलेला नेट रनरेट. न्यूझीलंडने हा सामना कमी फरकाने गमावला आणि पाकिस्तानने त्यांचा शेवटचा सुपर 8 चा सामना जिंकला तरीही किवींना काहीही फरक पडणार नाही. त्याचं कारण म्हणजे नेट रनरेट. त्यामुळे आता इंग्लंड-न्यूझीलंड सामन्याच्या निकालाकडे क्रिकेट विश्वाचं लक्ष लागून राहिलं आहे.
कर्णधार मिचेल सँटनर याने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. न्यूझीलंडने 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 159 धावा केल्या. न्यूझीलंडसाठी ग्लेन फिलिप्स याने सर्वाधिक 39 धावा केल्या. ओपनर टीम सायफर्ट याने 39 तर फिन एलेन याने 29 धावांचं योगदान दिलं. त्या व्यतिरिक्त एकालाही 20 पार पोहचता आलं नाही. इंग्लंडसाठी आदिल रशीद, विल जॅक्स आणि रेहान अहमद या तिघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स मिळवल्या.