
इंग्लंड क्रिकेट टीमने मायदेशात वेस्ट इंडिज विरुद्ध एकदिवसीय मालिका एकतर्फी फरकाने जिंकली. इंग्लंडने विंडीजचा 3 सामन्यांच्या मालिकेत 3-0 अशा फरकाने धुव्वा उडवला. त्यानंतर 6 जूनपासून उभयसंघातील टी 20I मालिकेला सुरुवात झाली. इंग्लंडने या 3 सामन्यांच्या टी 20I मालिकेत विजयी सलामी दिली. इंग्लंडने पहिल्या सामन्यात विंडीजवर मात करत 1-0 अशा फरकाने आघाडी घेतली. त्यामुळे इंग्लंडसमोर दुसरा सामना जिंकून मालिका जिंकण्याची दुहेरी संधी आहे. त्यामुळे या दुसऱ्या सामन्यात कोण बाजी मारणार? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेतील निराशाजनक कामगिरीनंतर जोस बटलर याने इंग्लंडच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर हॅरी ब्रूक याची इंग्लंडच्या वनडे आणि टी 20i संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती केली. हॅरीने कर्णधार म्हणून शानदार सुरुवात केली आणि इंग्लंडला पदार्पणातील मालिका क्लीन स्वीपने जिंकून दिली. तर त्यानंतर इंग्लंडने 6 जून रोजी विंडीज विरुद्ध पहिल्या टी 20i सामन्यात 21 धावांनी विजय मिळवला. इंग्लंडचा हा हॅरी ब्रूक याच्या नेतृत्वातील विंडीज विरुद्धचा सलग चौथा विजय मिळवला.
त्यामुळे आता इंग्लंडकडे विंडीज विरुद्ध सलग पाचवा सामना जिंकून टी 20i मालिका जिंकण्याची संधी आहे. तर दुसऱ्या बाजूला विंडीजसाठी दुसरा सामना हा करो या मरो असा आहे. विंडीजला या मालिकेतील आव्हान कायम राखण्यासाठी विजय मिळवणं बंधनकारक आहे. त्यामुळे विंडीज दुसऱ्या टी 20i सामन्यात मैदान मारणार का? याकडे चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडीज यांच्यात आतापर्यंत टी 20i क्रिकेटच्या इतिहासात एकूण 36 टी 20i सामने खेळवण्यात आले आहेत. या 36 पैकी सर्वाधिक सामन्यांमध्ये विंडीजचा वरचष्मा राहिला आहे. विंडीजने इंग्लंडविरुद्ध 36 पैकी सर्वाधिक 18 सामने जिंकले आहत. तर इंग्लंडनेही 17 सामने जिंकले आहेत. तर एका सामन्याचा निकाल लागला नाही.
इंग्लंड विंडीज विरुद्ध सलग दुसरी मालिका जिंकण्यासाठी सज्ज
Back to it in Bristol! 🏏
Another series win in our sights 🎯#ENGvWI | #EnglandCricket pic.twitter.com/TlHWo4ZiOw
— England Cricket (@englandcricket) June 8, 2025
इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडीज यांच्यातील दुसरा सामना हा रविवारी 8 जून रोजी खेळवण्यात येणार आहे. सामन्याला संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे. सामना टीव्हीवर सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल. तर मोबाईलवर सोनी लिव्ह एपवर लाईव्ह मॅच पाहता येईल.