
इंग्लंड विरुद्ध इंडिया यांच्यातील 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेची काही दिवसांपूर्वीच सांगता झाली. भारतीय संघाने इंग्लंडला त्यांच्याच घरात मालिका जिंकण्यापासून रोखलं. भारताने पाचव्या आणि अंतिम कसोटी सामन्यात 6 धावांनी थरारक विजय मिळवत मालिका 2-2 ने बरोबरीत सोडवली. त्यानंतर टीम इंडिया यूएईमध्ये आशिया कप 2025 स्पर्धेसाठी मैदानात उतरणार आहे. तर दुसऱ्या बाजूला इंग्लंड मायदेशात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडे आणि टी 20i मालिका खेळणार आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने या एकूण 2 मालिकांमधील 6 सामन्यांसाठी संघ जाहीर केला आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती दिली आहे.
इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात वनडे आणि टी 20i या दोन्ही मालिकांमध्ये प्रत्येकी 3-3 सामने होणार आहेत. या दोन्ही मालिकेत हॅरी ब्रूक इंग्लंडचं नेतृत्व करणार आहे. जोस बटलर याने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मधील निराशाजनक कामगिरीनंतर कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर हॅरी ब्रूक याला व्हाईट बॉल कॅप्टन करण्यात आलं.
इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात 2 ते 7 सप्टेंबर दरम्यान एकदिवसीय मालिकेचा थरार रंगणार आहे. तर 10 ते 14 सप्टेंबरमध्ये टी 20i मालिकेचं आयोजन करण्यात आलं आहे.
पहिला सामना, मंगळवार, 2 सप्टेंबर, लीड्स
दुसरा सामना, गुरुवार, 4 सप्टेंबर, लंडन
तिसरा सामना, रविवार, 7 सप्टेंबर, साउथम्पटन
इंग्लंड दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या आव्हानासाठी सज्ज
Our 16-player IT20 squad v SA 🙌
Who will shine in this series? ⭐🏟 Sophia Gardens, Cardiff
🏟 Emirates Old Trafford, Manchester
🏟 Trent Bridge, Nottingham pic.twitter.com/XDNdtvpgmD— England Cricket (@englandcricket) August 15, 2025
पहिला सामना, बुधवार, 10 सप्टेंबर, कार्डीफ
दुसरा सामना, शुक्रवार, 12 सप्टेंबर, मँचेस्टर
तिसरा सामना, रविवार, 14 सप्टेंबर, नॉटिंघम
दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या वनडे सीरिजसाठी इंग्लंड टीम : हॅरी ब्रुक (कर्णधार), रेहान अहमद, जोफ्रा आर्चर, सन्नी बेकर, टॉम बँटन, जेकब बेथेल, जोस बटलर, ब्रायडन कार्स, बेन डकेट, विल जॅक्स, साकिब महमूद, जेमी ओवरटन, आदिल राशिद, जो रूट आणि जेमी स्मिथ.
दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या टी20 सीरिजसाठी इंग्लंड टीम : हॅरी ब्रुक (कर्णधार), रेहान अहमद, जोफ्रा आर्चर, टॉम बँटन, जेकब बेथेल, जोस बटलर, ब्रायडन कार्स, लियाम डॉसन, बेन डकेट, विल जॅक्स, साकिब महमूद, जेमी ओवरटन, आदिल राशिद, फिल सॉल्ट, जेमी स्मिथ आणि ल्यूक वुड.