
मुंबई : वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील सातवा सामना इंग्लंड आणि बांगलादेश यांच्यात पार पडला. या सामन्यात बांगलादेशने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण हा निर्णय चुकला असंच म्हणावं लागेल. कारण इंग्लंडच्या फलंदाजांनी बांगलादेशी गोलंदाजांना सळो की पळो करू सोडलं. 50 षटकात 9 गडी 364 धावा केल्या आणि विजयासाठी 365 धावांचं आव्हान दिलं. बांगलादेशचा संघ 227 धावा करू शकला. त्यामुळे इंग्लंडला दोन गुणांसह नेट रनरेटमध्ये जबरदस्त फायदा झाला. त्यामुळे इंग्लंडचा संघ गुणतालिकेत शेवटच्या स्थानावरून थेट पाचव्या स्थानावर पोहोचला आहे. त्यामुळे येत्या काही सामन्यात जबरदस्त चुरस पाहायला मिळणार आहे.
जॉनी बेयरस्टो आणि डेविड मलान या जोडीने पहिल्या गड्यासाठी 115 धावांची भागीदारी केली. जॉनी बेयरस्टो शाकिब अल हसनच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. त्यानंतर मलानला जो रूटची जबरदस्त साथ मिळाली. या दोघांनी 151 धावांची भागीदारी केली. डेविड मलान याने 107 चेंडूत 16 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने 140 धावा केल्या. तर जो रूट याने 68 चेंडूत 82 धावांची खेळी केली. बांगलादेशकडून महेदी हसन याने 4, शोरिफुल इस्लाम याने 3 विकेट घेतल्या. तर तस्किन अहमद आणि शाकिब अल हसन याने प्रत्येकी एक गडी बाद केला.
बांगलादेशची सुरुवात अडखळत झाली असंच म्हणावं लागेले. तान्झिद हसन, नजमुल होस्सेन शांतो, शाकिब अल हसन आणि महेदी हसन स्वस्तात बाद झाले. पण लिट्टन दास आमि मुशफिकुर रहिम यांनी मोर्चा सांभाळला. लिट्टन दासने 66 चेंडूत 76 धावा केल्या. यात 7 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश होता. तर शोरिफुलने 64 चेंडूत 51 धावा केल्या. तर तोहिद हृदय याने 39 धावा करत संघाच्या धावसंख्येत भर पाडली. रीस टोपले याने सर्वाधिक 4 गडी बाद केले. ख्रिस वोकने 2 गडी टिपले. तर लियाम लिव्हिंगस्टोन,सॅम करन, मार्क वूड आणि अदिल रशिद यांना प्रत्येकी एक गडी बाद करण्यात यश आले.
बांग्लादेश प्लेईंग ईलेव्हन | शाकीब अल हसन (कर्णधार), लिट्टन दास, नजमुल होसेन शांतो, तानझीद हसन, तौहीद, महमदुल्लाह रियाद, मुशाफिकूर रहिम (विकेटकीपर), मेहेंदी हसन, तंझीम साकीब, नासुम अहमद, शोरीफुल इस्लाम, हसन महमूद, तस्कीन अहमद आणि मुस्तफीझूर रहमान.
इंग्लंड प्लेईंग ईलेव्हन | जॉनी बेयरस्टो, डेविड मलान, जो रूट, हॅरी ब्रूक, मोईन अली, जोस बटलर (कॅप्टन आणि विकेटकीपर), लियाम लिव्हिंगस्टोन, सॅम करन, ख्रिस वोक्स, आदिल रशीद, मार्क वुड, बेन स्टोक्स, गस ऍटकिन्सन, डेव्हिड विली आणि रीस टोपली.