
इंग्लंड विरुद्ध इंडिया यांच्यातील 3 संघांमध्ये व्हाईट आणि रेड बॉलचा थरार क्रिकेट चाहत्यांना अनुभवयाला मिळत आहे. अंडर 19, वूमन्स आणि मेन्स टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यावर आहेत. मेन्स टीम इंडिया इंग्लंड विरुद्ध कसोटी मालिका खेळत आहे. तर अंडर 19 टीम इंडिया 5 मॅचच्या यूथ वनडे सीरिजमध्ये 2-1 ने आघाडीवर आहे. तर हरमनप्रीत कौर हीच्या नेतृत्वात भारतीय महिला संघाने 5 सामन्यांच्या टी 20 मालिकेत सलग 2 सामने जिंकले आहेत. भारताने यासह 2-0 अशा फरकाने आघाडी घेत मालिका विजयाचा दावा मजबूत केला आहे. अशात आता मोठी बातमी समोर आली आहे. कर्णधाराला दुखापतीमुळे आगामी सामन्याला मुकावं लागणार आहे.
इंग्लंड वूमन्स टीमची कॅप्टन आणि ऑलराउंडर नॅट सायव्हर-ब्रंट हीला दुखापतीमुळे तिसऱ्या टी 20i सामन्याला मुकणार आहे. त्यामुळे इंग्लंडला मोठा झटका लागला आहे. इंग्लंड आधीच मालिकेत पिछाडीवर आहे. त्यात कॅप्टन तिसऱ्या सामन्यात खेळणार नसल्याने इंग्लंडच्या डोकेदुखीत वाढ झाली आहे. नॅटला डाव्या मांडीला दुखापत झाल्यामुळे तिसऱ्या सामन्यातून माघार घ्यावी लागली आहे. याबाबतची माहिती आयसीसीनं एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन दिली आहे.
नॅटला गुरुवारी 3 जुलै रोजी दुखापत झाल्याची माहिती इंग्लंड क्रिकेट बोर्डाकडून देण्यात आली. त्यामुळे नॅट तिसर्या सामन्यात खेळणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. तसेच तिला उर्वरित 2 सामन्यात खेळता येणार की नाही? याबाबतचा निर्णय मेडीकल रिपोर्ट आल्यानंतरच घेतला जाणार आहे. त्यामुळे नॅटला संपूर्ण मालिकेतून दुखापतीमुळे बाहेर व्हावं लागल्यास इंग्लंडसाठी तो मोठा झटका असेल.
नॅटच्या अनुपस्थितीत टीम इंडिया विरूद्धच्या तिसऱ्या टी 20i सामन्यात टॅमी ब्यूमोंट इंग्लंडचं नेतृत्व करणार आहे. तर तिसऱ्या सामन्यासाठी नॅटच्या जागी Maia Bouchie हीचा समावेश करण्यात आला आहे.
मालिकेत बॅकफुटवर असलेल्या इंग्लंडला मोठा झटका
England will be led by a new captain for the third T20I against India following an injury to Nat Sciver-Brunt.https://t.co/8Iu0rocpww
— ICC (@ICC) July 3, 2025
दरम्यान उभयसंघातील तिसरा सामना हा शुक्रवारी 4 जुलै रोजी केनिंग्टन ओवल, लंडनमध्ये होणार आहे. या सामन्याला भारतीय वेळेनुसार रात्री 11 वाजून 5 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. भारताकडे हा सामना जिंकून मालिका आपल्या नावावर करण्याची सुवर्णसंधी आहे.