पाकिस्तानची नाचक्की सुरुच! न्यूझीलंडनंतर इंग्लंडकडूनही दौरा रद्द

| Updated on: Sep 20, 2021 | 10:13 PM

पाकिस्तानच्या भूमीत तब्बल 16 वर्षानंतर इंग्लंडचा संघ क्रिकेट मालिका खेळण्यासाठी येणार होता. पण न्यूझीलंडने काही दिवसांपूर्वी मालिका रद्द करताच इंग्लंडनेही दौरा रद्द केला आहे.

पाकिस्तानची नाचक्की सुरुच! न्यूझीलंडनंतर इंग्लंडकडूनही दौरा रद्द
पाकिस्तान क्रिकेट बोर्ड
Follow us on

लंडन: पाकिस्तान क्रिकेटला (Pakistan Cricket) आणखी एक झटका बसला आहे. काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानच्या दौऱ्यावर आलेल्या न्यूझीलंडने सामना सुरु होण्यासाठी 20 मिनीटं शिल्लक असताना दौरा रद्द केला होता. त्यानंतर आता इंग्लंड क्रिकेट बोर्डाने (England Cricket Board) देखील पाकिस्तानचा दौरा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. न्यूझीलंडने सुरक्षेची कारणं देत दौरा रद्द केला होता. त्यानंतर इंग्लंड क्रिकेटनेही हा निर्णय घेतला आहे.

इंग्लंड क्रिकेट टीम (England Cricket Team)  ऑक्टोबरमध्ये दोन टी-20 सामने खेळण्याकरता पाकिस्तानमध्ये येणार होती. 13 आणि 14 ऑक्टोबर रोजी हे सामने खेळवले जाणार होते. सोबतच इंग्लंडची महिला क्रिकेट टीमही यावेळी दोन टी20 आणि तीन वनडे सामने खेळण्यासाठी येणाकर होती. पण या दोन्ही संघाचे हे आगामी दौरे रद्द झाल्यांच नुकतचं समोर आलं आहे. इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डाकडून नुकतीच ट्विटरवर एक पोस्ट करत ही माहिती देण्यात आली आहे.

‘खेळाडूंवर तणाव नको, म्हणून दौरा रद्द’ – इसीबी

इंग्लंड क्रिकेट बोर्डाने दिलेल्या माहितीत त्यांनी म्हटलं आहे की, ‘आमच्यासाठी खेळाडूं आणि सपोर्ट स्टाफचं मानसिक आणि शाररिक आरोग्य सर्वात महत्त्वाचं आहे. सध्याची परिस्थिती पाहता कोणत्याही प्रकारचा प्रवास धोक्याचाच आहे. त्यात त्या भागात दौऱ्यासाठी जाण्याने खेळाडूंवर ताण वाढेल. त्यात कोरोनासंबधी नियम आणि एकदरीत तणावामुले आगामी टी-20 विश्वचषकासाठी आमच्या टी-20 संघावरही याचा परिणाम होईल. या सर्वामुळे आम्ही हा निर्णय़ घेत आहोत.’

ऑस्ट्रेलियाचा दौराही धोक्यात

न्यूझीलंड दौरा रद्द झाल्याने इंग्लंडच नाही तर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला मागील बराच काळापासून आशा असणाऱ्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याचं भविष्यही धोक्यात आलं आहे.  या दौऱ्यात टेस्ट, वनडे आणि टी20 अशा सर्व प्रकारचे सामने खेळवण्यात येणार होते. ही मालिका फेब्रुवारी, मार्च 2022 दरम्यान खेळवली जाणार होती. ऑस्ट्रेलिया संघ जवळपास  24 वर्षांपासून पाकिस्तान दौऱ्यावर गेलेली नाही.

हे ही वाचा

पाकिस्तानची नाचक्की! टॉसच्या अर्धा तास आधी न्यूझीलंडकडून सा्मना रद्द, पाकिस्तानविरोधात न खेळातच तातडीनं मायदेशी परतणार, नेमकं कारण काय?

(england cricket board called off tour to pakistan after new zealand abandon tour of Pakistan due to security reason)