IND vs ENG : सामना अनिर्णीत सुटल्यानंतर इंग्लंडचा कर्णधार जो रुट म्हणतो, आणखी 40 ओव्हर मिळाले असते तर…

| Updated on: Aug 09, 2021 | 2:31 PM

पावसाच्या व्यत्ययामुळे भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला कसोटी सामना अनिर्णीत सुटला आहे. भारताला अखेरच्या दिवशी विजयासाठी केवळ 157 धावांचे आव्हान असताना 9 विकेटही हातात होत्या.

IND vs ENG : सामना अनिर्णीत सुटल्यानंतर इंग्लंडचा कर्णधार जो रुट म्हणतो, आणखी 40 ओव्हर मिळाले असते तर...
जो रुट
Follow us on

IND vs ENG : भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यात सुरु असलेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत पहिला सामना नुकताच पार पडला. मूळात सामना पार पडला असे म्हणण्यापेक्षा तो अधुरा राहिला म्हटलेलंच बरं. पहिल्या सामन्यातील अखेरच्या दिवशी भारताला अवघ्या 157 धावांची गरज असताना पावसामुळे खेळ झालाच नाही. ज्यामुळे अखेर सामना अनिर्णीत घोषिच करण्यात आला. दोन्ही संघाना अर्धे अर्धे गुण वाटण्यात आले. दरम्यान सामन्यानंतर इंग्लंडचा कर्णधार जो रूटने (Joe Root) दिलेल्या प्रतिक्रियेत तो म्हटला, ‘अखेरच्या दिवशी आम्हाला आणखी 40 ओव्हर टाकायला मिळाल्या असत्या, तर आम्ही भारतीय फलंदाजाना बाद करु शकलो असतो.’

नॉटिंघमच्या ट्रेंट ब्रिज मैदानात खेळवण्यात आलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात सुरुवातीपासूनच पावसाचा लपंडाव सुरु होता. पण पाचव्या दिवशी पाऊस इतका होता की, एक ओव्हरतर सोडा साधा एक चेंडूही फेकता आला नाही. इंग्लंडच्या 209 धावांचे आव्हान पूर्ण करताना भारत 52 धावांवर एक विकेट गमावून चांगल्या स्थितीत होता. दरम्यान सामन्यानंतर पत्रकार परिषदेत जो रुट म्हणाला, ‘‘आमच्या बाजूने विचार केला असता अजून 40 ओव्हर फेकायला मिळाल्या असत्या तर मैदानाची स्थिती आणि आमच्या बोलर्सचा फॉर्म पाहता आम्ही यश मिळवू शकलो असतो. पण पावसामुळे एका रोमहर्षक सामन्याचा अखेरचा दिवसाला आपण सारेच मुकलो.’’

सामन्याचा लेखाजोखा

पहिल्या डावात इंग्लंडला 183 धावांमध्ये रोखल्यानंतर भारताने पहिल्या डावात 278 धावांपर्यंत मजल मारली होती. त्यानंतर दुसऱ्या डावात इंग्लंडने 303 धावा जमवल्या. पहिल्या डावात भारताला 95 धावांची आघाडी मिळाली होती. त्यामुळे दुसऱ्या डावात भारताला 121 षटकांमध्ये 209 धावांचं लक्ष्य मिळालं. या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी काल (सामन्याच्या चौथ्या दिवशी) भारतीय संघ मैदानात उतरला. चौथ्या दिवसअखेर भारताने 1 बाद 52 धावा केल्या होत्या. पहिल्या डावात दमदार खेळी करणाऱ्या लोकेश राहुलला स्टुअर्ट ब्रॉडने बाद करत इंग्लंडला पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर चौथ्या दिवसअखेर सलामीवीर रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजारा प्रत्येकी 12 धावांवर नाबाद होते. आज भारताला 98 षटकांमध्ये 157 धावा करण्याचे लक्ष्य होते. परंतु पावसामुळे आजच्या दिवसाचा खेळ सुरु करता आला नाही. परिणामी उभय संघांमध्ये पहिली कसोटी अनिर्णित राहिली आहे.

इतर बातम्या

IND vs ENG : भारताचा हातातोंडाशी आलेला विजय पावसाने हिरावला, पाचव्या दिवसाचा खेळ रद्द, पहिली कसोटी अनिर्णित

एबी डिव्हिलियर्सवर रबाडाबरोबर वांशिक भेदभाव केल्याचा आरोप, खुद्द एबीडीचं स्पष्टीकरण, म्हणतो…

IND vs ENG : 24 तासांच्या खेळात सिराजची इंग्लंडच्या खेळाडूंशी दुसऱ्यांदा वादावादी, कोहलीच्या मध्यस्थीनंतर सिराज शांत, VIDEO

(England cricket team captain Joe root reaction after India vs England First test drawn)