AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एबी डिव्हिलियर्सवर रबाडाबरोबर वांशिक भेदभाव केल्याचा आरोप, खुद्द एबीडीचं स्पष्टीकरण, म्हणतो…

दक्षिण अफ्रिकेचा माजी कर्णधार एबी डिव्हिलियर्सवर वेगवान गोलंदाज कागिसो रबाडाबरोबर वांशिक भेदभावाचा आरोप झाला आहे.

एबी डिव्हिलियर्सवर रबाडाबरोबर वांशिक भेदभाव केल्याचा आरोप, खुद्द एबीडीचं स्पष्टीकरण, म्हणतो...
AB-de-Villiers
| Edited By: | Updated on: Aug 07, 2021 | 7:26 AM
Share

मुंबई : दक्षिण अफ्रिकेचा माजी कर्णधार एबी डिव्हिलियर्सवर (AB Devilliers) वेगवान गोलंदाज कागिसो रबाडाबरोबर (Kagiso Rabada) वांशिक भेदभावाचा आरोप झाला आहे. करिअरच्या सुरुवातीला रबाडाला राष्ट्रीय टीमपासून दूर करावं, अशी डिव्हिलिर्सची अपेक्षा होती, असा एबीडीवर आरोप आहे. आपल्यावरती लावलेल्या या आरोपांचं एबीडीने खंडन केलं आहे. माझा सल्ला संघाच्या भल्यासाठी होता. डिव्हिलियर्सचं स्पष्टीकरण दक्षिण अफ्रिकेच्या सामाजिक न्याय आणि राष्ट्र-निर्माणाच्या सुनावणीवेळी दक्षिण अफ्रिकेचे माजी सिलेक्टर हुसेन मनेक यांच्या आरोपानंतर आले.

मानेकने डिव्हिलियर्सवर वांशिक आधारावर निर्णय घेतले गेल्याचा आरोप लावला. आरोपांना उत्तर देताना डिव्हिलियर्सने रबाडाला क्रिकेटच्या दुनियेतील सर्वोत्तम बोलर्स म्हटलं. डिव्हिलियर्सने ईएसपीएन क्रिकइन्फोशी बोलताना म्हटलं “मला कधीच असं वाटलं नाही की रबाने राष्ट्रीय संघाबाहेर रहावं किंवा जावं. हा विचारच मुळात हास्यास्पद आहे. तो जागतिक क्रिकेटमधील एक गुणी आणि सर्वोत्तम बोलर आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण

रबाडाला 2015 च्या भारत दौऱ्यात एकही मॅच खेळायला मिळाली नाही. मी एक दिवस अगोदर प्रॅक्टिससाठी गेलो होतो. कायल एबॉट आणि हार्डस विलजोएमन यांच्यापैकी कुणाला खेळवायचं, अशी चर्चा तेव्हा सुरु होती. त्यावेळी रबाडाला वगळलं जावं, असं टीम मॅनेजमेंटने सांगितलं.

तेव्हा त्याला कोणत्या आधारावर बाहेर बसवायचं, असं मी विचारलं. तर त्याच्या हातून योग्य प्रकारे बॉल सुटत नसल्याचं सांगितलं गेलं. त्यावेळी रबाडा 20 वर्षांचा होता. एक दर्जेदार खेळाडू म्हणून त्यावेळी त्याने आपलं त्यावेळी कमवलं नव्हतं.

रबाडाचं आंतरराष्ट्रीय करिअर कसं आहे?

आपल्या डेब्यूच्या सहा वर्षांनंतर, रबाडाने स्वत:ला तिन्ही फॉरमॅटमध्ये दक्षिण अफ्रिकाचा विकेट टेकर बोलर म्हणून सिद्ध केलं आहे. रबाडाने 47 टेस्ट, 79 एकदिवसीय आणि 32 टी 20 इंटरनॅशनलमध्ये अनुक्रमे 213, 122 आणि 96 विकेट घेतल्या आहेत. रबाडाने दक्षिण अफ्रिकेसाठी आंतरराष्ट्रीय करियरमध्ये 1000 पेक्षा अधिक रन्स देखील केले आहेत.

(AB de Villiers says I never Wanted Kagiso Rabada Drop From team)

हे ही वाचा :

Khel Ratna Award: खेलरत्न पुरस्काराचं नाव बदललं, आता राजीव गांधींऐवजी मेजर ध्यानचंद यांच्या नावाने पुरस्कार!

पदक नाही म्हणून काय झालं, तुमच्या कर्तृत्वाची प्रेरणा लाखमोलाची, नरेंद्र मोदींशी बोलताना महिला हॉकी टीम गहिवरली

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.