AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ben Stokes : बेन स्टोक्स क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याच्या तयारीत! नाईटक्लबमध्ये नेमकं काय घडलं?

इंग्लंडचा कसोटी कर्णधार बेन स्टोक्स नाईटक्लब वादात अडकला आहे. त्यामुळे त्याच्यामागे इंग्लंड क्रिकेट बोर्डाच्या चौकशीचा ससेमिरा लागला आहे. असं असताना बेन स्टोक्स आता क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याच्या शक्यतेवरून सोशल मीडियावर रान उठलं आहे.

Ben Stokes : बेन स्टोक्स क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याच्या तयारीत! नाईटक्लबमध्ये नेमकं काय घडलं?
Ben Stokes : बेन स्टोक्स क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याच्या तयारीत! नाईटक्लबमध्ये नेमकं काय घडलं?Image Credit source: GETTY IMAGES
| Updated on: Jun 09, 2026 | 10:17 PM
Share

इंग्लंडचा कसोटी कर्णधार बेन स्टोक्स वादात अडकल्याने अडचणीत वाढ झाली आहे. न्यूझीलंडविरुद्ध पहिला कसोटी सामना जिंकल्यानंतर नाईक्लबमध्ये जल्लोष केला होता. इतकंच काय तिथे मारहाणही केली. आता असं वागणं त्याच्या अंगलट येण्याची शक्यता आहे. कारण नाईटक्लबमध्ये जाणं आणि तिथे वाद घातल्याप्रकरणी इंग्लंड क्रिकेट बोर्डाने तपास सुरू केला आहे. . इंग्लंडच्या मिडियामध्ये मागच्या 24 तासांपासून स्टोक्स आणि एटकिन्सन यांनी नाइटक्लबमध्ये मारहाण केल्याचा मुद्दा चांगलाच गाजला आहे. या मुद्द्यामुळे संघाच्या वागण्यावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. यावेळेस खुद्द कर्णधार बेन स्टोक्स अडकला आहे. असं असताना इंग्लंडचा कर्णधार फक्त कर्णधारपद नाही तर क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे

नेमका वाद काय?

ईएसपीएन क्रिकइन्फोच्या रिपोर्टनुसार, स्टोक्स दोषी आढळल्यास त्याला कर्णधारपद गमवावं लागू शकतं. इतकंच काय तर पुढच्या सामन्यातून किंवा संपूर्ण मालिकेला मुकावं लागू शकते. मिडिया रिपोर्टनुसार, नाईटक्लबमध्ये सुरक्षारक्षकाला मारहाण केल्याने त्याला गंभीर दुखापत झाली असून टाके पडले आहे. दुसरीकडे, स्टोक्स आणि एटकिन्सला कोणतीही दुखापत झालेली नाही. या प्रकरणाची इंग्लंड क्रिकेट बोर्डाने चौकशी सुरू केली आहे. इंग्लिश क्रीडा वेबसाइट टॉकस्पोर्टने एका अहवालात दावा केला आहे की, स्टोक्स केवळ कर्णधारपदच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटही सोडू शकतो.

वृत्तानुसार, इंग्लंडचा कर्णधार स्टोक्स आणि पाच बळी घेणारा वेगवान गोलंदाज एटकिन्सन हे 7 जून रोजी कसोटी सामना जिंकल्यानंतर त्या रात्री उशिरा एका नाईटक्लबमध्ये आनंद साजरा करत होते. तिथेच इंग्लिश रग्बी क्लबचे खेळाडू हंगाम संपल्यानंतर आनंद साजरा करत होते. एका मुद्द्यावरून त्यांच्यात वाद झाला आणि त्याचं रुपांतर मारहाणीत झालं. दरम्यान, इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना 17 जूनपासून ओव्हल येथे होणार आहे. या सामन्यात बेन स्टोक्स आणि गट एटकिन्सन हे नसतील असं बोललं जात आहे.

पहिल्या कसोटी सामन्यात काय झालं?

कसोटी सामन्यात प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडचा संघ 140 धावांवर बाद झाला होता. त्यानंतर न्यूझीलंडला 113 धावांवर रोखलं. त्यामुळे 27 धावांची आघाडी मिळाली आणि दुसऱ्या डावात इंग्लंडने 226 धावा केल्या. विजयासाठी 253 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान गाठताना न्यूझीलंडचा संघ 138 धावांवर बाद झाला. हा सामना इंग्लंडने 115 धावांनी जिंकला आणि तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 आघाडी घेतली आहे.

Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार