T20 World Cup मध्ये प्रत्येक वेळी भारताची पाकिस्तानवर सरशी, जाणून घ्या भारत-पाक सामन्यांचा आजवरचा इतिहास

| Updated on: Oct 19, 2021 | 12:21 PM

टी - 20 वर्ल्डकपमध्ये भारत आणि पाकिस्तान हे दोन कट्टर प्रतिस्पर्धी आतापर्यंत 5 वेळा भिडले आहेत. विशेष म्हणजे प्रत्येक वेळी पाकिस्तानला भारताच्या हातून पराभूत व्हावे लागले आहे.

1 / 5
टी - 20 वर्ल्डकपमध्ये भारत आणि पाकिस्तान हे दोन कट्टर प्रतिस्पर्धी आतापर्यंत 5 वेळा भिडले आहेत. विशेष म्हणजे प्रत्येक वेळी पाकिस्तानला भारताच्या हातून पराभूत व्हावे लागले आहे. 2007 च्या टी - 20 विश्वचषकापासून हा ट्रेंड अविरत सुरु आहे. या बाबतीत भारताची पाकिस्तानवर 5-0 ने आघाडी आहे. यावेळी टीम इंडिया विजयाचा षटकार लगावू पाहत आहे.

2 / 5
2007 टी -20 विश्वचषक, ग्रुप मॅच, भारत विरुद्ध पाकिस्तान : डरबनमध्ये खेळवलेला हाय व्होल्टेज सामना बरोबरीत संपला. पाकिस्तानला भारताच्या 141 धावांचा पल्ला गाठता आला नाही. मग बॉल आऊटद्वारे निर्णय घेण्यात आला, ज्यामध्ये भारताने पाकिस्तानचा पराभव केला.

3 / 5
2012 टी -20 विश्वचषक, सुपर 8, भारत विरुद्ध पाकिस्तान : यावेळी दोन्ही कट्टर प्रतिस्पर्धी सुपर 8 मध्ये भिडले, ज्यामध्ये भारताने पाकिस्तानचा 8 गडी राखून पराभव केला. श्रीलंकेत खेळवल्या गेलेल्या या स्पर्धेत भारताने पाकिस्तानला 128 धावांत गुंडाळले. प्रत्युत्तरादाखल विराट कोहलीने 61 चेंडूत 78 धावांची नाबाद खेळी खेळून भारताला सामन्यात विजय मिळवून दिला.

4 / 5
2014 टी - 20 विश्वचषक, सुपर 10, भारत विरुद्ध पाकिस्तान : प्रथम खेळताना पाकिस्तानने 20 षटकांत 7 गड्यांच्या बदल्यात 130 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल भारताने 3 गड्यांच्या बदल्यात 9 चेंडूं राखून हा सामना जिंकला.

5 / 5
2016 टी - 20 विश्वचषक, सुपर 10, भारत विरुद्ध पाकिस्तान : कोलकाताच्या ईडन गार्डन्समध्ये खेळवण्यात आलेल्या सामन्यातही निकला बदलला नाही. पावसामुळे हा सामना 18-18 षटकांचा खेळवण्यात आला होता. पाकिस्तानने 118 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताच्या 3 विकेट्सही लवकर पडल्या. पण विराट कोहली पाकिस्तानला भिडला. त्याने 37 चेंडूत 55 धावांची खेळी खेळत सामना 6 गडी राखून जिंकला.