Team India Fans : टीम इंडियाच्या चाहत्यांची कमाल, तीन दिवसात छोटं YouTube चॅनल फेमस, हा रिपोर्ट पाहून शॉक व्हाल!

| Updated on: Jun 26, 2022 | 12:20 PM

क्वचितच कोणत्याही व्हिडिओला एक लाख व्ह्यूज मिळायचे. पण टीम इंडियाच्या सराव सामन्याचे लाइव्ह स्ट्रीमिंग 5 मिलियन व्ह्यूजवर पोहोचले आहे. पहिल्या दिवशी 4.6 दशलक्ष,  दुस-या दिवशी 3.7 दशलक्ष आणि तिसर्‍या दिवशी 5 दशलक्ष व्ह्यूज पाहिले गेले. 

Team India Fans : टीम इंडियाच्या चाहत्यांची कमाल, तीन दिवसात छोटं YouTube चॅनल फेमस, हा रिपोर्ट पाहून शॉक व्हाल!
तीन दिवसात छोटं YouTube चॅनल फेमस
Image Credit source: social
Follow us on

मुंबई :  माणसं त्यांची माणुसकी दाखवतात असं म्हटलं जातं. मग क्रिकेटप्रेमी (Cricket Lover) त्यांचं जोस दाखवून खेळाडूंचा उत्साह वाढवत असतात. तो खेळाडूंना आणखी खेळण्यासाठी ऊर्जा देण्याचं काम करतो. खेळाडूंचं प्रोत्साहन वाढवण्यासाठी क्रिकेटप्रेमी जल्लोष करताना दिसतात. एका हिंदू दैनिकानं यासाठी फॅन्सी हा शब्द वापरला आहे. तुम्ही याआधी हा शब्द ऐकला नसेल. कारण, तो शब्दकोशात सापडणार नाही, पण क्रिकेटप्रेमींच्या प्रेमापोटी हा शब्द त्या हिंदी साईटनं वापरला आहे. टीम इंडियाच्या (Team India Fans) चाहत्यांचागी जोशची देखील नेहमी चर्चा होत असते. हा जोश असा दिसतो की ते दगडाला हिऱ्यात बदलू शकतो आणि कागदावर लिहिलेल्या खेळाडूचे नाव चमकता तारा बनवू शकतो. तुम्हाला आज अशाच एका रिपोर्टची माहिती आम्ही देणार आहोत. त्यामध्ये टीम इंडियाच्या (Team India) चाहत्यांनी तीन दिवसात एका छोट्या YouTube चॅनलला स्टार बनवलंय.

टीम इंडिया सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. टीमला एक टेस्ट मॅच, तीन टी-20 आणि तितकेच एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने खेळायचे आहेत. कसोटी सामन्यापूर्वी भारतीय संघ सराव सामन्यात लीसेस्टरशायरशी भिडणार आहे. लीसेस्टर विरुद्ध भारत चार दिवसीय सामन्याचा तिसरा दिवस संपला आहे. या तीन दिवसांमध्ये लीसेस्टरशायर क्रिकेट क्लबचे YouTube चॅनेल फेमस झालंय.

हे सुद्धा वाचा

तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की ज्या यूट्यूब चॅनलचे सराव सामन्यापूर्वी 50 हजार सबस्क्राइबर्स नव्हते. आज त्या चॅनलचे 1.5 लाखांहून अधिक सब्सक्राइबर आहेत. हे दुसरं तिसरं काही नसून टीम इंडियाच्या चाहत्यांची जादू आहे. त्यांचा हा उत्साह आहे. जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात कोणत्याही व्यासपीठावर आपल्या खेळाडूंना पाहायला प्रत्येकाला आवडतं. ते लीसेस्टरशायरच्या यूट्यूब चॅनेल फॉक्स टीव्हीवर तूम्ही पाहू शकतात.

लाईव्ह स्ट्रीमिंग 5 मिलियन व्ह्यूजवर

यापूर्वी लीसेस्टर संघाच्या या यूट्यूब चॅनलवर 885 हून अधिक व्हिडिओ अपलोड करण्यात आले होते.  क्वचितच कोणत्याही व्हिडिओला एक लाख व्ह्यूज मिळायचे. पण टीम इंडियाच्या सराव सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग 5 मिलियन व्ह्यूजवर पोहोचले आहे. पहिल्या दिवशी 4.6 दशलक्ष,  दुस-या दिवशी 3.7 दशलक्ष आणि तिसर्‍या दिवशी 5 दशलक्ष व्ह्यूज पाहिले गेले.

काही दिवसांत स्टार

विशेष म्हणजे जेव्हा हा सराव सुरू झाला नव्हता (21 जून 2022) तोपर्यंत Foxes TV च्या सदस्यांची संख्या 47 हजारच्या जवळपास होती. पण 26 जून 2022 पर्यंत या YouTube चॅनेलच्या सदस्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. यावरून भारतीय क्रिकेट चाहत्यांमध्ये त्यांच्या आवडत्या खेळाडूंचा सामना पाहण्याची क्रेझ दिसून येते. एका छोट्या YouTube चॅनेलला काही दिवसांत स्टार बनवलं.